Total Pageviews

Friday, 5 April 2013

बांगलादेशी घुसखोरांना पोसले केंद्रीय कृषिमंत्री तारीक अन्वर, खासदार अब्दुल मन्नान व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने -सामना

मुंबई, दि. (प्रतिनिधी)-बांगलादेशी घुसखोरांवर आज महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगानेच कठोर भूमिका घेतली. बांगलादेशी घुसखोरांना पोसू नका, त्यांना शोधा आणि त्यांच्या देशात हाकलून द्या अशी जोरदार मागणी आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी आज केली. गेल्या २५ डिसेंबर रोजी वसईतील वाळीव पोलिसांनी नायगाव पूर्वेला रश्मी बिल्डरच्या बांधकाम साइटवर काम करणार्‍या २६ कामगारांना ते बांगलादेशी असल्याच्या संशयावरून अटक केली होती. हे कामगार पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद या आपल्या मतदारसंघातील असल्याचा दावा करत खासदार अब्दुल मन्नान यांनी केंद्रीय कृषिमंत्री तारीक अन्वर यांच्याकडे तक्रार केली होती. अन्वर यांनी यासंदर्भात अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हकीम यांना कळवले होते. आयोगाने स्थानिक कार्यकर्ते गोविंद गुंजाळकर आणि वकिलांच्या सहकार्याने न्यायालय पोलिसांकडे या कामगारांची बाजू मांडली. न्यायालयाने २४ जणांना निर्दोष मुक्त केले. या कामगारांनी मुनाफ हकीम तसेच पत्रकारांची आज भेट घेतली.

No comments:

Post a Comment