Total Pageviews

Sunday 7 April 2013

मराठवाडा मुस्लिम मानस- ऍड. गोविंद पुरुषोत्तम नांदापूरकर-साम ना ०७/०४/२०१३

विसाव्या शतकाच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या दशकात जन्मलेल्या आणि स्वातंत्र्याच्या चळवळीने लढा समक्ष अनुभवलेल्या तरुणांचे प्रतिनिधित्व करणार्‍या पिढीने इतिहासाची भयंकर स्थित्यंतरे अनुभवली आहेत. पुन्हा एकदा नव्याने जे संशोधन सुरु झालंय त्या पार्श्‍वभूमीवर...आज साठ किंवा पासष्टीच्या आसपास असलेली पिढी स्वराज्यात जन्माला आलेली आहे. मराठवाड्यातील या पिढीस निजामी राजवटीतील हुकूमशाही, कट्टर मुस्लिम धार्जिणेपणा त्यामुळे रयतेस सोसावे लागलेले दु: आणि दैन्य, जाच त्रास यांची पुसटशीही कल्पना नाही म्हणून भाग्यवान म्हटली पाहिजे. ही पिढी सभा, संमेलन, भाषण स्वातंत्र्य, संस्था, धार्मिक संस्था काढण्याचे स्वातंत्र्य तसेच राजकीय संस्था काढण्याचे स्वातंत्र्य वगैरे घटनेच्या १९() प्रमाणे दिलेले अधिकार हक्क यात वावरणारी आहे. या पिढीस १९४६ साली झालेल्या कोलकाता येथील दंगली, मोठ्या प्रमाणावरील नोखाली येथील मनुष्यसंहार, त्रिपुरा, बिहार त्यातून उद्भवलेल्या मुंबई येथील दंगलीचा विसर पडणे साहजिक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर ३१ ऑगस्टच्या हिंदू मुस्लिम दंगली त्यातून उद्भवलेली जाळपोळ लूट, हिंदुस्थानच्या फाळणीनंतर उद्भवलेल्या हिंदू- मुस्लिम दंगली हा इतिहास नवीन पिढीकरिता पडद्याआड गेला आहे. इतिहासाचा विसर हा आपला स्थायीभाव आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादच्या निजामाच्या हुकमतीखाली असलेला मराठी भाषकांचा मराठवाडा, हैदराबाद संस्थान, तेलंगणा, कर्नाटक मराठवाडा या तीन भाषिक लोकांच्या प्रांतातील सन १२९४ पासून असलेली मुस्लिम राजवट १७ सप्टेंबर १९४८ रोजी संपुष्टात आली. जवळजवळ ६५० वर्षे हा भाग इस्लामी राजवटीखाली राहिला. निजामीच्या हुकुमशाही, सरंजामशाहीखाली हा भाग निजामाच्या सात पिढ्यांच्या अधिपत्याखाली अंदाजे २५० वर्षे राहिला. .. १९१४ साली मीर उस्मानअली हुजूर पुरनूर हिज एक्झाल्टेड हायनेस सत्तेवर आला. बहुसंख्य हिंदू समाज त्याकाळी कष्ट, दारिद्य्र, दु:, जुलूम अज्ञानाने ग्रासलेला होता. निजाम अनियमित सत्तेचा भोक्ता होता. तसेच मुसलमानी संस्कृतीचा संरक्षक म्हणून अधिराज्य गाजवणारा धूर्त शासक होता. सर्वच क्षेत्रात इस्लामिक संस्कृतीचे प्रभुत्व मुस्लिम धर्मीयांविषयी वर्चस्व निर्माण करण्यापोटी निजाम इतर धर्मीयांविषयी असहिष्णु वृत्तीचा हुकूमशहा होता. राजनिष्ठा पाळावी लागलेल्या जनतेला कुठलेही मूलभूत अधिकार उरले नव्हते. लेखण, मुद्रण स्वातंत्र्यावर अघोषित बंदी लादली गेली होती. मोगलाई या शब्दाशी संबंध असलेल्या सर्व संकल्पना निजामाच्या राज्यात अस्तित्वात होत्या.असे असले तरी निजामाने उर्दू भाषेस राजभाषेचे स्थान दिले संपूर्ण मुस्लिमधर्मीय समाज सुरक्षित करण्यात त्यास यश आले. सर्व स्तरावरील शिक्षण उर्दू भाषेत दिले जाई. मुस्लिम विद्यार्थ्यांकरिता शिक्षणात दिनियात (मुस्लिम धर्मशास्त्र) या विषयाचे शिक्षण दिले जाई. राज्यकारभार उर्दू भाषेत असे. १९१८ मध्ये उर्दू माध्यमाची उस्मानिया विद्यापीठाची स्थापना केली, तर मराठवाड्यात १९२७ ला संभाजीनगर येथे इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना झाली.एका बाजूला उर्दूला प्रोत्साहन तर मराठी भाषेवर रोष. हैदराबाद संस्थानमध्ये सरकारी नोकर्‍यांमध्ये ११ टक्के असलेल्या मुस्लिम धर्मीयांना ७५ टक्के नोकर्‍या दिल्या जात असत. मराठवाड्यातील मुस्लिम धर्मीयांची जडण-घडण हिंदुस्थानमधील इतर भागातील मुस्लिम धर्मीयांपेक्षा वेगळी आहे. निजामाने घडविलेली ही धार्मिक मानसिक, आर्थिक शैक्षणिक परिस्थिती वेगळी असून स्वातंत्र्यानंतरही ती परंपरा टिकवण्यामध्ये अल्पसंख्याक या मथळ्याखाली जोपासण्यात आली येत आहे... १८७० च्या सुमारास त्याकाळचे निजामाचे (महबूब पाशाचे) मुख्यमंत्री सर सालारजंग (प्रथम) याने नव्याने जिल्हाबंदी करून मराठी भाषकांचा संभाजीनगर सुभा निर्माण करून त्यास मराठवाडा असे नामाधीकरण केले. आज मराठवाडा हा भाग महाराष्ट्राचा प्रादेशिक घटक आहे ते नाव आजतागायत कायम आहे. नोव्हेंबर १९५६ ला हैदराबाद स्टेट (निजाम स्टेट)चे विभाजन होऊन मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला. .. १२९४ पासून ते १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत असलेली मुस्लिम, मोगल राजवट संपुष्टात आली. त्या जागी सेक्युलर विचारसरणीची राजसत्ता उदयास आली. विलीन झाल्यावर येथील बहुसंख्य मराठी माणसांचा निजामाच्या काळात झालेल्या जाचाचा, त्रासाचा विचारच केला नाही, दुर्लक्ष केले. मराठवाड्यातील मागासलेपणाचा विचारच झाला नाही. संकोचलेल्या या मोठ्या समाजाचा विचार करण्याऐवजी व्होट बँकेचे राजकारण करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे मराठवाड्यातील मुस्लिम समाज जो की, साधारण सुशिक्षित होता तो पुन्हा अल्पसंख्याकाच्या नावाखाली इतर सवलती पदरात पाडून घेण्यात यशस्वी झाला जागृत झाला आहे.मराठवाड्यातील मुस्लिम समाज शैक्षणिक राजकीय तसेच आर्थिकदृष्ट्या जागृत आहे त्यांना निजामी राजवटीचा मुळीच विसर पडला नाही, हे हैदराबादच्या अकबरोद्दीन ओवेसीच्या भाषणावरून दिसून येते. अशा प्रकारचे भडकावू भाषण कासीम रझवी, बहादुरयार जंगचेही असायचे. आमच्या पिढीत तर असे भडकावू भाषण ऐकण्याची सवयच जडली आहे. मजलीसच्या कित्येक नेत्यांचे तसेच उस्मानिया विद्यापीठातील काही प्राध्यापकांची भडकावू भाषणे स्मरणातून जात नाहीत.
११ ऑगस्ट २०१२ रोजी मुंबई येथे रजा ऍकॅडमी या मुस्लिम संघटनेने एक फतवा काढून पन्नास हजार मुस्लिमांना एकत्रित केले. असे सांगण्यात येते की, ही सभा म्यानमार आसाममधील दंगली मृत्युमुखी पडलेल्या त्यांच्या मुस्लिम बांधवास त्यांच्या आत्म्यास शांती मिळण्याकरिता होती. शांतीच्या नावाखाली भडकावू भाषणे, जाळपोळ, पोलिसांवर हल्ले केले, त्यांची शस्त्रे हिसकावून नेली. महिला पोलिसांची छेडखानी केली. अमर ज्योतीची तोडफोड केली. या घटनेचा आपणास विसर पडला. रझाकारी चळवळ मुंबईसारख्या राजधानीच्या ठिकाणी झाली.पोलिसी ऍक्शननंतर रझाकारी चळवळ इत्तेहाद मुसलमीन नेस्तनाबूत झाली, असा समज होता; परंतुओवेसी ब्रदर्स’च्या कारवायांमुळे ही पिलावळ अजून जिवंत आहे आणि या चळवळीने पुन्हा डोके वर काढले आहे, असे दिसून येते. आता तर लोकशाही सेक्युलॅरीझमच्या मोकळ्या स्वच्छ हवेमुळे एमआयएम तगडी झाली आहे. त्याचा प्रत्यय नांदेडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून आला. मुस्लिम इत्तेहाद मुसलमीनने (एमआयएम) ११ जागांवर विजय मिळविला. एकूण ८१ नगरसेवकांपैकी २४ नगरसेवक मुस्लिम समाजाचे आहेत. मराठवाड्यात फय्याज कागजी नावाच्या अतिरेक्याने बनविलेली फौज पुण्याच्या जर्मन बेकरी आणि साखळी बॉम्बस्फोटात वापरण्यात आली. लष्कर--तोयबाचा फय्याज कागजी याने मराठवाड्यात गेल्या दहा वर्षांत किमान १०० जणांची जिहादी फौज बनविली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे. पुण्याच्या फिरोज, संभाजीनगरच्या जमशीद नांदेडचा इम्रान वजीदखान, नांदेड जिल्ह्यातील सय्यद मकबुल या संशयितांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. जिल्ह्यातील यापैकी मकबुल हा (श्घ्श्) चा पदाधिकारी असल्याचे उघड झाले आहे. मुंबईतील २६/११ च्या घटनेत बीडचा अबू जिंदाल याचा हात असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. मराठवाड्यातील नागरिक जितका निजामाच्या राज्यात असुरक्षित होता तितका आज असुरक्षित नसेल; परंतुएमआयएम’रूपी रझाकारामुळे मराठवाड्यातल्या नव्हे तर देशभरातील हिंदूंची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे एमआयएमला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. निजामी राजवट, बहादूरजंग, कासीम रझवीचा मराठवाडा-महाराष्ट्रातील हिंदू जनतेला आणि सरकारलाही विसर पडला असला तरी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते हे सत्य विसरून चालणार नाही.

No comments:

Post a Comment