Total Pageviews

Monday 11 June 2012

मुस्लिम मतपेढीची ‘पोलादी भिंत’ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन यांनी दै. ‘सामना’च्या ७ व २१ मे २०१२ च्या अंकात लिहिलेले दोन लेख १) हिंदुस्थानचा आगामी राष्ट्रपती मुसलमानच का? २) हिंदुस्थानात बनवले जातेय मुगलिस्तान हे वाचण्यात आले. मुझफ्फर हुसेन यांनी या लेखांतून दिलेली मुस्लिम पोलादी व्होट बँकेची वाढलेली टक्केवारी आणि दहशतवादी जिहादींच्या हिंदुस्थानच्या अंतर्गत वाढलेल्या देशद्रोही कारवायांची सविस्तर माहिती ही धक्कादायक आहे.
मुस्लिम धर्मांध आक्रमणाला विरोध करणे हे आजच्या केंद्रीय सरकारच्या धोरणात बसत नाही आणि इतर राजकीय पक्ष ‘मुस्लिम व्होट बँक’ आपल्याचकडे वळवावी यातच मश्गुल आहेत. निवडणुका आणि सत्तेचे राजकारण यासाठी मुस्लिम व्होट बँक अशीच फोफावू लागली तर २३ टक्के ही संख्या पुढील २० ते ३० वर्षांत कितीतरी जास्त होऊ शकते. कारण धर्मांध मुस्लिम त्या दृष्टीने योजनाबद्ध पावले उचलीत आहेत. यामुळे आज पोलादी भिंत असलेली मुस्लिम व्होट बँक २० ते ३० वर्षांत किती शक्तिशाली होईल याची आणि तिच्या संभाव्य धोक्याची घंटाच या लेखाद्वारे वाजवली आहे. ही ‘मुस्लिम पोलादी व्होट बँक’ १९४७ पूर्वीच्या मुस्लिम लीगचे नवीन रूपडे घेऊन नवीन पाकिस्तानची मागणी करू शकते. मुस्लिम मतदारांची टक्केवारी. ही टक्केवारी एक पोलादी भिंत मुस्लिम म्हणून एकजुटीने संघटित आहे. हिंदू मतदार अनेक जाती, पोटजाती, पंथ, प्रांत, भाषा यांमध्ये विभागून आपसांतच भांडत आहेत. आज सर्वच राजकीय पक्षांच्या नेतृत्वांनी आणि राजकीय विचारवंतांनी धोका ओळखून देशाची दुसरी फाळणी रोखण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम गंभीरपणे आखून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. तरच देश अखंड राहील. मुस्लिम महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, मुस्लिमांना कुटुंबनियोजन सक्तीचे करणे, राष्ट्रीय विचाराच्या मुस्लिम नेत्यांना, मुस्लिम समाजसुधारकांना प्रोत्साहन देऊन संरक्षण दिल्यास जात्यंध मुल्लामौलवींचा पगडा मुस्लिम तरुणांवर कमी प्रमाणात राहील, इ. उपाय करता येतील. समान नागरी कायदा लागू करणे, त्या दृष्टीने मुस्लिम समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. नवतरुण मुस्लिमांना वेळीच जात्यंध मुस्लिम संघटनांपासून परावृत्त करणे यासाठी उपाय योजले पाहिजेत.
- एकनाथ उमराणीकर

No comments:

Post a Comment