Total Pageviews

Tuesday 12 June 2012

काय ही दुर्दशा!हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचे, रुपयाचे जगभर धिंडवडे निघत असतानाच आणखी एक नामुष्की देशावर ओढवली आहे. गुंतवणूक करण्याचे हिंदुस्थानचे मानांकन हिरावून घेतले जाऊ शकते, असा इशारास्टँडर्ड ऍण्ड पुअर्स’ या संस्थेने दिला आहे. ब्राझील, रशिया, हिंदुस्थान आणि चीन या गुंतवणुकीसाठी अनुकूल असलेल्या देशांच्या यादीतून हिंदुस्थानचे नाव वगळले जाईल, अशी गंभीर परिस्थिती असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. देशातीलनिर्नायकी’, प्रभावहीन राजकीय नेतृत्व आणि आर्थिक निर्णयांचा अभाव यामुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस रसातळाला जात असल्याचा निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कुचकामी नेतृत्वच या आर्थिक संकटाला कारणीभूत आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याऐवजी राष्ट्रपती भवनात कोणाला पाठवायचे, यावरच राजधानीत खलबते सुरू आहेत हे देशाचे दुर्दैवच म्हणायला हवे. जगभरातील देशांची आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमकीपत’ काय आहे याचे वेळोवेळी निरीक्षण करून तसे अहवाल सादर करण्याचे कामएस ऍण्ड पी’ अर्थात स्टँडर्ड ऍण्ड पुअर्स ही संस्था करीत असते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्योगसमूह आणि तमाम बडे देश या अहवालाची दखल घेऊन त्यानुसार आपल्या आर्थिक धोरणांमध्ये बदलही घडवत असतात. हिंदुस्थान सरकार मात्र जागचे हलायला तयार नाही. दिवसेंदिवस अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ लागली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या तिजोर्‍यांतही खडखडाट झाला आहे देशवासीयांच्या बोडक्यावर लाखो कोटी रुपयांचे कर्ज सरकारने करून ठेवले आहे ते वेगळेच... पुन्हा डॉलरच्या तुलनेत रुपया रोज धडाधड कोसळतो आहे, तरीही केंद्रातील मनमोहन सरकार डोळ्यावरील झापडे हटवायला तयार नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधण्याऐवजी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीएस ऍण्ड पी’चा हा अहवालच धुडकावून लावला आहे. सरकारची अबू्र झाकण्यासाठी मुखर्जींनी ही वकिली केली असली तरी ही धूळफेक आहे. त्यातच आता औद्योगिक उत्पादनाचा दर केवळ . टक्क्यांवर येऊन पोहोचल्याची ताजी आकडेवारी समोर आली आहे. हिंदुस्थान आर्थिक मंदीच्या दुष्टचक्रात वेगाने झेपावत असल्याचेच हे लक्षण आहे. ‘एस ऍण्ड पी’सारख्या संस्थेचा हा इशारा वाचल्यानंतर विदेशातील कोणते गुंतवणूकदार हिंदुस्थानात येण्याचे धाडस दाखवतील! उलट ज्या विदेशी कंपन्यांनी हिंदुस्थानात भरमसाट गुंतवणूक केली आहे, तेही गाशा गुंडाळून पळण्याचा प्रयत्न करतील. बुडणार्‍या जहाजात येऊन बसण्याचा मूर्खपणा कोण करेल? विदेशी गुंतवणूकदारांचे ठीक आहे हो, ते जातील पळून. पण या देशातील १२० कोटी जनतेचे काय? त्यांनी कुठे जावे? भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाने सारा देश बरबटला आहे, महागाईच्या राक्षसाने सामान्य जनतेचे जिणे हराम केले आहे. याच हिंदुस्थानात कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात...जहॉं डाल डाल पर सोने की
चिडिया करती है बसेरा...असे वर्णन ज्या देशाचे व्हायचे त्या हिंदुस्थानची कॉंग्रेजी सरकारने काय दुर्दशा केली आहे पहा! जनतेनेच आता यापत’ घाल्या सरकारचे बखोट धरून या दुर्दशेचा जाब विचारायला हवा

No comments:

Post a Comment