Total Pageviews

Tuesday, 26 June 2012

मराठवाड्यातील
पाकिस्तान’!सामना अ ग्र ले ख
हिंदुस्थानात सध्या सर्वच क्षेत्रांत मंदीबाईचे वारे वाहात असले तरी एक गोष्ट मात्र भलतीच तेजीत आहे. ती म्हणजे इस्लामी दहशतवाद! त्यातही महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात बाकी पीकपाण्याच्या नावाने तशी बोंबच असली तरी धर्मांध शक्तींचे हिरवे पीक मात्र जोमाने वाढते आहे. ‘आतून’ आणिबाहेरून’ही जिहादी शक्तींचे मुबलक खतपाणी मिळत असल्यामुळे इस्लामी दहशतवादाचे हे पीक मराठवाड्यात तरारून वर आले आहे. अतिरेक्यांचा सुळसुळाट एवढा वाढला कीसंतांची भूमी’ अशी ओळख असणार्‍या मराठवाड्याचे वर्णन आताअतिरेक्यांची भूमी’ असे होऊ लागले आहे. हे सगळे सांगण्याचे कारण असे की, मुंबईवरील२६/११’ च्या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार असलेल्या सैतानी खोपडीला दिल्ली पोलिसांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. जबिउद्दीन अन्सारी हे त्याचे नाव. मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील गेवराईचा रहिवासी असलेल्या जबिउद्दीनचे घर बीड शहरात आहे. जबिउद्दीन हे खरे नाव सोडून अबू जिंदाल ऊर्फ अबू हमजा ऊर्फ रियासत अली अशा एक ना दोन २६ टोपणनावांनी तो वावरत होता. बीडच्या या अतिरेक्यानेच मुंबईवर हल्ला करणार्‍या अजमल कसाब आणि त्याच्या पाकिस्तानी टोळीला हिंदी भाषेचे प्रशिक्षण दिले. एवढेच नाही तर ज्या दिवशी मुंबईवर हल्ला झाला त्या दिवशी पाकिस्तानातील कराची येथील कंट्रोल रूममध्ये बसून कसाब आणि त्याच्या साथीदारांना तो मार्गदर्शन करत होता. सॅटेलाइट फोनवरून एकेक मिनिटाला सूचना देत होता. मुंबईवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला हे जगाला कळू नये यासाठीही त्याने शक्कल लढवली. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी न्यूज चॅनल्सशी बोलावे आणि आपण हिंदुस्थानीच असल्याचे सांगावे, असा आदेश त्याने पाकिस्तानात बसून दिला. हैदराबादच्या टोळीचौकातील दख्खन मुजाहिद्दीन आहोत असे जाहीर करा, असे तो कसाब आणि त्याच्या टोळीला वारंवार सांगत होता. त्यांच्यातील हा संवाद सुरक्षा यंत्रणांनीटेप’ केला. तेव्हापासून क्रूरकर्मा जबिउद्दीन अन्सारी सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. बीडमध्ये त्याचे घर असलेल्या हत्तीखाना गल्लीत एटीएस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांची पथके अनेक वेळा धडकली, पण तो कधीच हाती लागला नाही. लागणार तरी कसा? तो केव्हाच पाकिस्तानला पळाला होता. मुंबईच नव्हे तर देशभरातील सहा दहशतवादी हल्ल्यांमध्ये जबिउद्दीन अन्सारीचा हात होता. त्याला दिल्लीत अटक केली की सौदी अरेबियात, यावरून सध्या वाद सुरू आहे. मात्र जबिउद्दीनच्या अटकेनंतर पाकिस्तान सरकारने त्याला सोडण्यासाठी सौदी सरकारवर प्रचंड दबाव आणला. यावरूनचजबि’ पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचा होता हे लक्षात येते. मे २००६ मध्ये संभाजीनगरात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा प्रचंड साठा जप्त झाल्यापासून जबिउद्दीन फरारी झाला होता. वेरूळ येथे एटीएसने केलेल्या या कारवाईत एके- ४७ रायफली आणि हॅण्डग्रेनेडस्चा मोठा साठा सापडला. मुंबई, दिल्लीसारखे संपूर्ण महानगर एका क्षणात बेचिराख होऊ शकेल एवढा ४३ किलो आरडीएक्सचा महासंहारक साठाही पकडला गेला. कुठे पाकिस्तान आणि कुठे मराठवाडा! हजारो किलोमीटरचे अंतर कापून स्फोटकांचा हा साठा मराठवाड्यापर्यंत पोहोचलाच कसा? ज्या बिळांतून या रायफली आणि आरडीएक्स संभाजीनगरपर्यंत पोहोचले ती बिळेच आधी बुजवावी लागतील. याच साठ्यातील काही स्फोटके नंतर नाशिकच्या अंकाई किल्ल्याजवळही सापडली. या ऑपरेशननंतर जबिउद्दीनचे अनेक साथीदार पकडले गेले आणि मराठवाड्यातील अतिरेक्यांचे पाकिस्तानशी असलेलेनेटवर्क’ही जगासमोर आले. दहा वर्षांपूर्वी मिसरूडही फुटलेल्या जबिउद्दीनचा दहशतवादी प्रवास सिमीपासून सुरू झाला. इंडियन मुजाहिद्दीन आणि लष्कर--तोयबा या पाकिस्तानी संघटनांसाठी तो काम करत होता. आपला कारटा कामधंदा सोडून गायब असतो, गुप्त बैठका घेतो, मराठवाडाभर फिरून मुस्लिम तरुणांची जमवाजमव करतो, संशयास्पद लोकांच्या संपर्कात असतो हे त्याच्या आई-बापाला कसे कळाले नाही, हे आश्‍चर्यच आहे. बरं पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग तरी अशावेळी नेमके काय करतो, हाही एक संशोधनाचाच विषय आहे. या विभागात गुप्त माहिती काढण्याच्या मोहिमेवर बहुतांश मुस्लिम पोलीस कर्मचार्‍यांच्याच नेमणुका पोलीस खात्याने केल्या आहेत. मग त्यांच्याकडून अपेक्षा ती काय करणार! मुस्लिम मोहल्ल्यांत नेमके काय शिजते आहे, रोज नवनवे मदरसे कसे काय सुरू होत आहेत? मशिदींची संख्या झपाट्याने का वाढते आहे? याकडे कोणाचेच लक्ष नाही. मशिदींवर टेहळणी बुरुजासारखे उंच उंच मनोरे उभे राहात आहेत. कुठे कशाची नोंद नाही, बांधकाम परवानगी वगैरे कुणी विचारत नाही, मदरसे, मशिदींना पैसा कुठून मिळतो तेही कुणी पाहात नाही. काहीच माहिती घ्यायची नसेल तर मग गुप्तवार्ता, एटीएस, विशेष शाखा, अमुक शाखा, तमुक शाखा काय नुसत्याच चाटायच्या आहेत? राज्य सरकार, गृहखाते आणि पोलीस दलाच्या ढिसाळ कारभारामुळेच मराठवाड्याचे रूपांतर अतिरेक्यांच्या भरती केंद्रात झाले. त्यामुळेच गेल्या पाच-सहा वर्षांत देशात कुठेही अतिरेकी हल्ला झाला की त्याचे कनेक्शन मराठवाड्यातच येऊन पोहोचते. घाटकोपरच्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे सापडले ते मराठवाड्याच्या संभाजीनगर आणि परभणीतच. परभणीच्या ख्वाजा युनूसला याप्रकरणी अटक झाली. त्यावेळी मुस्लिम संघटनांनी आकांडतांडव केले होते. आता२६/११’चा सूत्रधारही मराठवाड्याचाच. पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटातील अतिरेकीही मराठवाड्यातील उदगीरचाच. गुजरातमधील धमाक्यांचेही आरोपी सापडले ते संभाजीनगरातच. जबिउद्दीन अन्सारीचे तुरुंगात असलेले साथीदार अब्दुल अजिज, मोमीन मोहंमद अखिल, अब्दुल समद (बीड), खतीब इम्रान शेख विखार (परळी) आणि अफरोज खान (माजलगाव) हे सगळेच मराठवाड्यातील. रा. स्व. संघाच्या मुख्यालयात बॉम्ब ठेवणारा हिजबुलचा अतिरेकीही संभाजीनगरचाच. सफदर नागोरी यासिमी’च्या संस्थापकाला मजबूत नेटवर्क मिळाले तेही मराठवाड्यातूनच. ‘सिमी’च्याइख्वान’ परिषदेला आझम घोरीसारखा लष्कर--तोयबाचा कमांडर उपस्थित राहतो आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून मराठवाड्याच्या राजधानीत ही परिषद होते, हे कशाचे लक्षण आहे? मराठवाड्यात जन्माला येणारे हे नवे पाकिस्तान महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी धोकादायक आहे. रझाकाराशी दोन हात करून त्याचे कंबरडे मोडणार्‍या मराठवाड्यात पुन्हा एकदा पाकिस्तानी पिलावळ वाढू लागली आहे. हे हिरवे संकट वेळीच रोखायला हवे. त्यासाठी मराठवाड्यातीलमिनी पाकिस्तानां’त घुसून चौकशा आणि झडत्यांचे सत्र सुरू करायला हवे! कसाबच्याही आधी त्यागद्दार’ देशद्रोही जबिउद्दीन अन्सारीला झटपट फासावर लटकवायला हवे. मुस्लिम व्होट बँकेच्या दाढ्या कुरवाळणार्‍या सरकारमध्ये एवढी धमक आहे काय?



 

No comments:

Post a Comment