Total Pageviews

Tuesday 5 June 2012

जलसंपदामंत्रीसुनील तटकरे अडचणीत मुलगा, मुलगी सुनेच्या नावाने सुमारे 140 कंपन्या स्थापना केल्या  रायगड जिल्ह्यात 350 एकर जमिनीची खरेदी?मुंबई : जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी आपला मुलगा, मुलगी सुनेच्या नावाने सुमारे 140 कंपन्या स्थापना केल्या असून त्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्यात सुमारे 350 एकर जमीन खरेदी केल्याची धक्कादायक माहिती एका वृत्तवाहिनीने उघड केल्यामुळे राज्यभर खळबळ माजली आहे. सरकारने तटकरेंच्या या उघड झालेल्या साम्राज्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील या साम्राज्याचा पर्दाफाश झाल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. सुनील तटकरे यांनी तब्बल 140 कंपन्या स्थापन केल्या असून त्या त्यांचा मुलगा अनिकेत, मुलगी आदिती आणि सून वेदांती यांच्या नावावर आहेत. काही कंपन्या नातेवाईक, पीए तसेच कर्मचार्‍यांच्या नावावर असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे. सध्या जलसंपदामंत्री असलेल्या तटकरे यांनी आपल्या राजकीय उदयाला सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून केली. त्यांनी अन्न पुरवठा राज्यमंत्री, ऊर्जामंत्री या खात्यांचाही कारभार पाहिला आहे. त्याच कार्यकालात स्थापन झालेल्या 140 पैकी बहुतेक कंपन्या याच खात्यांशी संबंधित आहेत. यामध्ये कार्नेशन अँग्रो इस्टेट प्रा. लि., मॉर्डन इंडिया
फ्रिट्रेड वेअर स्पेशालिटी, वरदविनायक इन्फ्रास्ट्रक्चर, मल्टी व्हेन्चर फायनान्शियल, मल्टीव्हेन्चर अँग्रो, मल्टी व्हेन्चर इस्टेट, मल्टीव्हेन्चर हॉटेल्स, मल्टीव्हेन्चर फिशरीज, गीतामृत डेअरीज प्रा. लि., गीतामृत हॉटेल्स प्रा. लि, ग्रिफीथ रियल इस्टेट प्रा. लि., स्नोड्रॉप अँग्रो अँण्ड
इन्फ्रास्ट्रक्चर, श्रेयस लॅण्ड प्रा. लि., 8 पान 6 वर
पान 1 वरून)क्वाईन लॅण्ड प्रा. लि., स्वर्गामृत अँग्रो, सी ग्रीन हॉटेल्स, टॅलेंट अँग्रो, स्फूटनिक अँग्रो, मल्टी व्हेपर प्रा. लि., अनी हॉटेल्स, नेक्स्ट टेक्नोलॉजी, अँपल बेरी अँग्रोटेक, बी.ट्री अँग्रो, माझदा, चिन्नेश्वर लॅण्ड, श्रवणी आदींचा समावेश आहे. तटकरे त्यांच्या कुटुंबीयांकडे साडेतीनशे एकर जमीन असल्याचा दावाही संबंधित वृत्तवाहिनीने केला आहे. मात्र . जयंत पाटील यांनी तटकरेंकडे सुमारे 850 एकर जमीन आहे या संबंधीचे दस्तऐवज आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमीन खरेदीसाठी 63 () नुसार महसूल विभागाची परवानगी लागते. सर्वसामान्यांना या परवानगीसाठी खूप वेळ लागतो. मात्र तटकरे यांना एवढी सर्व जमीन खरेदीसाठी पटापट परवाने मिळाले कसे? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. तटकरे यांच्या मालकीच्या या सर्व जमिनींवर सध्या जोरात काम सुरू आहे. त्यासाठी बिनधास्तपणे पदाचा गैरवापर झाला आहे. राज्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना बहुतेक ठिकाणी तटकरे यांच्या जागांवर बांधकामासाठी लघुपाटबंधारे प्रकल्पाचे पाणी वळविण्यात आले आहे. विजेच्या बाबतीतही असेच झाले आहे. कमी दाबाच्या विजेवर पर्याय म्हणून चांगले ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी राज्यातील विविध भागांतून होत आहे. त्यांच्या मागणीची वीज मंडळ साधी दखलही घेत नाही. तटकरे यांच्या समुद्रकिनार्‍यावरील एका प्रकल्पासाठी निर्मनुष्य ठिकाणी तब्बल 18 लाख रुपये खर्च करून ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. असेच प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. विविध योजनांसाठी सरकारच्या विशेष कोटय़ातून जमिनी घेण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात त्या वेगळ्य़ाच कामासाठी वापरल्या जात असल्याचा दावाही संबंधित वृत्तवाहिनीने केला आहे. दरम्यान, तटकरे यांनी राजकीय हेतूने आपल्यावर हे सर्व खोटे आरोप केले जात असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रतिक्रिया देण्यासाठी समोर आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे.

No comments:

Post a Comment