Total Pageviews

Saturday, 4 June 2011

TELECOM DEPARTMENT MOST CORRUPT

FORMER TELE COM MINISTER  SUKHARAM SHOULD BE GIVEN BHARAT RATNA FOR STEALING ONLY 4 CRORE RUPEES. HE WAS THE MOST HONEST MINISTER

केंद्रातले दूरसंचार खाते हे भ्रष्टाचाराचे कार्यक्षेत्र असावे आणि द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष भ्रष्टाचाराची शाळा असावा असे त्या दोहोंचे सध्याचे चित्र आहे
. आतार्पयत समोर आलेले पुरावे पाहिले तर दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांना त्यांच्या पदावरून दूर करणेच इष्ट ठरावे. त्या खात्याच्या मंत्रिपदावर प्रमोद महाजनांपासून ए. राजार्पयत आलेले एकजात सगळे मंत्री भ्रष्टाचाराच्या कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकले व पायउतार होताना पहावे लागले आहेत. महाजनांना रिलायन्सच्या धीरुभाई अंबानींविषयी असलेला पुळका केवळ विधायक व विकासविषयक होता असे समजणारे लोक फक्त भाबडेच असू शकतात. राजा हा तर स्वतर्‍च्या संपत्तीत तीन हजार कोटींची भर घालताना व त्यासाठी देशाचे दीड लक्ष कोटींचे नुकसान करून तुरुंगात जाताना देशाने पाहिला. जाताजाता कनिमोझी या करुणानिधीच्या कन्येलाही तो सोबत घेऊन गेला ही त्यातली समाधानाची बाब. करुणानिधींच्या द्रमुकची आर्थिक नजर फार तीक्ष्ण आहे. राजा जावो वा मारन येवो त्याला पैशाचेच खाते हवे आणि त्यात भ्रष्टाचार करण्याची बर्‍यापैकी सोयही हवी. मारन हे करुणानिधींचे भाचे म्हणजे घरातलेच. जो काय पैसा मिळवायचा वा खायचा तो घरातल्या घरात असा हा व्यवहार. मलेशियाच्या मॅक्सिस या दूरसंचार कंपनीला आपले काही भाग विकायला एअर सेल या भारतीय कंपनीला मारन यांनी भाग पाडले व त्याचा मोबदला म्हणून मॅक्सिसकडून स्वतर्‍च्या खाजगी कंपनीसाठी 599 कोटी रुपये मिळविले ही बाब सीबीआयने आता सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे तामिळनाडूतील दोन्ही पक्ष पेरियर रामस्वामी यांच्या ज्या द्रविड कळघममधून जन्माला आले ती सामाजिक न्यायासाठी निर्माण झालेली संघटना होती. आपल्या वाटचालीत ती संघटना न्यायाचे तत्त्व विसरली आणि कट्टर जातीद्वेषावर उभी राहिली. सामाजिक न्याय सांगायचा आणि जातीद्वेष चालवायचा अशी दुटप्पी वाटचाल करणार्‍या संघटना आता महाराष्ट्रातही बर्‍याच आहेत. त्यांच्यातील अनेकींना सत्तेत जाण्याची व तिची अशीच फळे चाखण्याची संधीही मिळाली आहे. पण मराठी जातीद्वेष्टय़ांपेक्षा तामीळ जातीयवाद्यांची भ्रष्टाचाराची भूक मोठी आहे व ती आजवरच्या आकडेवारीने देशासमोर आणली आहे. मराठी जातीयवादाने घेतलेले राजकीय चेहरे उद्या उघड झाले व त्याने भ्रष्टाचारात मिळविलेले आकडे पुढे आले तर ते याहून फार लहान असणार नाहीत याविषयीही आपण आश्वस्त असायला हरकत नाही. जोवर ते बाहेर येत नाहीत तोवर आपण आपले सध्याचे समाधान जपायलाही हरकत नाही. मारन उघडय़ावर आहेत आणि त्यांच्याविषयीचा निर्णय घेणे केंद्राला भाग आहे. कनिमोझीला तुरुंगात डांबल्यानंतर आणि राजाला बेडय़ा घातल्यानंतर दयानिधीला घरी बसविणे केंद्राला फारसे जड जाणार नाही. त्यासाठी सारे काही सिद्ध होण्याची वाट पाहण्याचेही कारण नाही. मी सारे नियमानुसार केले हा मारन यांचा कांगावा केवढाही मोठा असला तरी त्यांच्या कंपनीत मॅक्सिसने गुंतविलेल्या 599 कोटींचे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण कोणालाही पटणारे नाही. असे व्यवहार केवळ सद्भावनेपोटी वा मैत्रीखातर होत नाहीत. दुर्दैवाने द्रमुकचा इतिहासही भ्रष्टाचाराचाच आहे. त्याचा पराभव करून निवडून आलेल्या जयललिता यांच्या अण्णाद्रमुक या पक्षाचा पोतही त्याहून वेगळा नाही. भ्रष्टाचाराच्या चक्रात दोन्ही बाजूंनी असे अडकलेल्या तामिळनाडू या राज्याला खर्‍या अर्थाने मुक्त करायचे तर त्यात पुन्हा एकवार राष्ट्रीय पक्षांचीच मजबूत उभारणी होणे आवश्यक आहे. दुर्दैव याचे की अशा राष्ट्रीय गरजेबाबत सध्यातरी कोणताही नेता वा पक्ष फारसा गंभीरपणे विचार करीत असलेला आज दिसत नाही

No comments:

Post a Comment