Total Pageviews

Tuesday, 7 June 2011

LATE COMING CHIEF MINISTER WASTES PUBLIC TIME

बेशिस्त मुख्यमंत्री, हैराण जनता!सुहास फडके Tuesday June 07, 2011 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कडक राज्यकर्ते अशी प्रतिमा बाळगून आहेत. अत्यंत काटेकोरपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या विश्वासातील ते मानले जातात. मनमोहनसिंह यांच्याबरोबर त्यांनी साडेसहा वर्षे कामही केले आहे. त्यामुळे चव्हाण यांच्याकडूनही शिस्तीची अपेक्षा होती.परंतु गेल्या महिन्यांत चव्हाण हे वेळ पाळत नाहीत, त्यामुळे लोकांचा, अधिका-यांचा खोळंबा होतो असे अनेकदा घडते आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, भायखळा ते भारतमाता उड्डाणपूलाच्या उदघाटनाला ते ताब्बल दाने तास उशीरा आले. यामुळे या पट्टयात वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. संध्याकाळी मुळातच, दक्षिण मुंबईकडून उत्तरेकडे जाणा-या वाहनांची संख्या वाढते. ऐन गर्दीच्या वेळी चव्हाण हे उदघाटनाला वेळेत पोहोचल्यामुळे सुमारे चार तास वाहतुकीची कोंडी झाली. ज्या उड्डाणपूलामुळे किती सिनग्ल्स टळतील, किती मिनीटांत सीएसडी ते सायन हे अंतर कापता येईल, वेळेची बचत कशी होईल याच्या पानपान जाहिराती केल्या गेल्या त्याच पूलाच्या उदघाटनाच्या हव्यासापायी लोकांचे कित्येक तास फुकट गेले
खरे म्हणजे राजकीय नेत्यांनी असले समारंभ टाळणे योग्य ठरेल. कित्येक हजार लोकांचे अनेक तास फुकट जाणे, वाहनांचे इंधन वाया जाणे हे आपणास परवडणारे नाही. आपल्याकडे राजकीय नेत्यांना वेळ पाळणे कमीपणाचे वाटते. आपण जितक्या उशीरा समारंभाला जाऊ, लोकांना तिष्ठत ठेवू तितके आपण मोठे अशी खोटी कल्पना ते बाळगून असतात. मनोहर जोशींसारखे फार कमी अपवाद वेळ पाळतात. बकीचे, अगदी नगरसेवकापासून सगळे एकाच माळेचे मणी असतात.उड्डाणपूलाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळच निवडायची होती तर रविवार सकाळ घ्यायची. तेव्हा दक्षिण मुंबईत येणारी आणि तेथून बाहेर पडणारी वाहतूक कमी असते
याहून चांगला उपाय म्हणजे मंत्रालयात बसून उदघाटन करायचे. आता तंत्रज्ञानामुळे असे शक्य होते. शिस्तीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आदर्श घालून द्यायला हवा. परंतु येथे नेमके उलटे घडत आहे. राजकारण्यांच्या अशा बेशिस्तीमुळे लोक त्यांच्याबद्दल बरे बोलत नाहीत. राजकारण्यांनी याचा अर्थ कोठे जाऊच नये, समारंभात सहभागी होऊ नये असे नव्हे. असे करताना काही नियम स्वत:लाच घालून द्यावेत. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिस्त पाळावी. एकदा त्यांनी अशी शिस्त लावून घेतली की आपोआप इतर छोटे नेते नीट वागतील.एका दिवशी किती समारंभ घ्यायचे हेही भान त्यांनी बाळगायला हवे. वेळ चुकण्याचे हे एक प्रमुख कारण असते. अनेकदा असे ज्येष्ठ नेते भरमसाठ कार्यक्रम स्वीकारतात आणि सगळयांचीच अडचण करतात.शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी काही नियम केले होते. मंत्र्यांनी सोमवार ते शुक्रवार मंत्रालयात बसून लोकांची कामे करावीत आणि शनिवारी आणि रविवारी दौऱ्यावर जावे. अशा बाबींमुळेच त्यांना सर्वजण हेडमास्तर म्हणायचे. नंतरच्ा काळात हळुहळू कारभारात बेशिस्त येत गेली. मंत्री मुख्यमंत्र्यांना जुमानेसे झाले. आता युतीचे किंवा आघाडीचे सरकारचे युग आल्यापासून मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे नसतील तर त्यांी राजकीय कोंडी करण्यातच सहकारी पक्षाचे मंत्री धन्यता मानतात.अशा वेळी निदान मुख्यमंत्र्यांनी तरी शिस्त बाळगावी अशी अपेक्षा असते. मुंबई, ठाणे, पुणे येथील महानगरपालिका निवडणुका साधारण आठ महिन्यांवर आल्यामुळे मुख्यमंत्री भाराभर उदघाटने, भूमिपूजन करणे, फीत कापणे असे समारंभ स्वीकारतील. प्रत्येक ठिकाणी ते असे काही तास उशीरा जात बसले तर सर्वानाच ते तापदायक ठरेल.तेव्हा मुख्यमंत्र्यांना विनंती इतकीच वेळ पाळा आणि जनतेचा दुवा घ्या
. दरम्यान पूल सुरू करायचा असेही करणे शक्य होते. खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पूलावरून प्रवास करणे हे सर्वोत्तम उदघाटन ठरले असते. लोकांचा वेळ वाचला असता

No comments:

Post a Comment