आयपीएल क्रिकेट स्पर्धा संपल्या आणि आता वेध लागले आहेत टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे. पण दुखापतींमुळे अनेकांनी या दौऱ्यातून माघार घेतली आहे; तर काहींनी विश्रांतीसाठी. दौरा लादणारे बीसीसीआय आणि आयपीएल भरवणारेही बीसीसीआयच. दोन्हींपुढे पैशासाठी मान तुकवणारे खेळाडू महत्त्व देतात तरी कशाला? क्लब क्रिकेटला की देशासाठी खेळण्याला? बीसीसीआयलाही अधिक महत्त्व कशाला द्यावेसे वाटत आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. याबाबत आपले मत कळविण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक पत्रे...
......................
मातीचे पाय
क्रिकेटपटू देशासाठी खेळत नसून पैशासाठी खेळतात. आयपीएलसाठी क्रिकेटपटू विकले गेले आहेत. त्यामुळे त्यांची बांधिलकी मालकाकडून मिळालेल्या लिलावातील पैशाशी आहे. क्रिकेटपटूंचे पाय मातीचे आहेत. सामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांना पैसा हाच परमेश्वर आहे. आपण उगीचच त्यांच्याकडून असामान्य अपेक्षा ठेवतो. उत्तम क्रिकेट खेळणे म्हणजे सगळ्याच बाबतीत सामान्यांपेक्षा श्ाेष्ठ असल्याची भावना जनता ठेवते हेच चुकीचे आहे. चाहते पदरमोड करून क्रिकेटपटूंचे वाजवीपेक्षा जास्त कौतुक करतात. राज्य सरकारे बक्षिसांची खैरात करायला अहमहमिकेने पुढे सरसावतात कोट्यधीश क्रिकेटपटूंना मालामाल करण्यास सामान्य करदात्यांचा पैसा खर्च करण्यास राज्य सरकारांना चुकीचे वाटत नाही. खेळता येईल तेवढे दिवस खेळून अमाप पैसा कमविणे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. देश वगैरे सगळे खोटं. आपल्या आयुष्यातले किती तास असल्या क्रिकेटपटूंच्या मॅचेस पाहण्यासाठी आपण वाया घालवतो याचा प्रेक्षकांनी विचार करणे गरजेचे आहे.
मंदाकिनी परब, वांदे
धोक्याची घंटा
आयपीएल मोठा की देश या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं तर या सगळ्यापेक्षा पैसा मोठा असं आहे. वर्षभरात १०-१५ कसोटी खेळण्यापेक्षा दीड महिना आयपीएल खेळून पैसे मिळवणं चांगलं हे जे मलिंगाला कळतं ते भारतीय खेळाडूंना चांगलंच कळतं. अंबानी-मल्यासारख्या मालकांनी विकत घेतलेले हे खेळाडू या देशाला विकायलाही मागेपुढे बघणार नाहीत. याची परिणती देशापेक्षा क्लब संस्कृती फोफावून क्लब व देश यांच्यात संघर्षात होणार आहे. बीसीसीआय पैसारूपी साखर पोत्याने खात असताना मंडळाची ही लागण खेळाडूंना झाली नाही, तरच नवल! आयपीएलच्या माध्यमातून होणारा मधुमेह ही भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील धोक्याची घंटा आहे, एवढे निश्चित!
विवेक ढापरे, कराड.
सारे काही पैशासाठी!
विंडीजसाठी भारतीय संघात दिग्गज खेळाडूंनी वेगवेळ्या कारणांनी माघार घेतली आहे. विश्वचषक स्पर्धा आटोपल्यावर लगेच आयपीएलचा धमाका सुरू झाला. गंभीरची दुखापत 'गंभीर' असूनही तो आयपीएलमध्ये खेळलाच ना! धोणी, सचिन, सेहवागसारख्या खेळाडूंनी विश्ाांतीच्या नावाखाली विंडीज दौरा टाळला. वास्तविक सचिनने आता केवळ कसोटी सामनेच खेळले पाहिजे. परंतु आयपीएलमध्ये रग्गड पैसा मिळत असल्याने त्यानी त्यालाच प्राधान्य दिले. बीसीसीआयलाही पैसा पाहिजे, खेळाडूंनाही पैसा पाहिजे. सारे महत्त्व पैशालाच आहे व आयपीएलमध्ये मिळणाऱ्या प्रसिद्धीलाही आहे. देश आता दुय्यम ठरतोय.
सतीष कलंत्री, मालेगाव.
धनापेक्षा देश श्ाेष्ठ
प्रथम देश व नंतर क्लब ही भावना प्रत्येक खेळाडूंच्या तसेच बीसीसीआयच्या मनात रुजली पाहिजे. पैसा हे साधन आहे समाधान नव्हे. माणसाला पैशाची हाव असतेच; त्यामुळे विंडीज दौऱ्याला खेळाडू कसं काय महत्त्व देणार? पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्यांना देशप्रेम काय आहे हे कसं काय समजणार? खेळाडू वर्षभर खेळत असल्याने त्यांनाही घर आहे हे बीसीसीआयला समजायला हवं. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रत्येक खेळाडूने झटलं पाहिजे. कोणतीही सबब पुढे आणू नये.
मेजर डॉ. सुप्रिया येरागी, मुलुंड.
ही तर लाचारी!
प्रत्येक क्रिकेटपटू मुलाखत देताना 'देशासाठी खेळेन' असे सांगतो; परंतु त्यांचा खेळ बघताना 'पैशांसाठी खेळेन आणि देशाची वाट लावेन' असे चित्र दिसते. आयपीएल क्रिकेट हा त्यातलाच प्रकार असून खेळाडूंवर बोली लावून त्यांना आपले गुलाम बनवून पाहिजे तसा खेळ करवून घेण्याचा निर्लज्जपणा संघमालकांनी अवलंबिला आहे. दुदैर्वाची गोष्ट म्हणजे प्रतिष्ठित आणि नामवंत खेळाडूंनी पैशांसाठी गुलामगिरी स्वीकारून आपली खरी जात दाखवून देशातील असंख्य क्रिकेटरसिकांची घोर निराशा केली. इंग्लंडचा माजी कर्णधार टोनी ग्रेगच्या म्हणण्यानुसार आयपीएलसारख्या खेळांना परवानगी देऊ नये की; ज्यामुळे कसोटी क्रिकेटचे तसेच कसोटीपटूंचे नुकसान होणार नाही. यापुढे तरी बीसीसीआय बोध घेईल काय?
अरुण बधान, डोंबिवली.
' रुपया'भोवती फिरते दुनिया!
क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहणे यात गैर नाही मात्र एखादा मालकाच्या इशाऱ्यावर गुलामासारखं राबणं क्रिकेटशी प्रतारणा करण्यासारखं आहे. क्रिकेट ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्यानेच क्रिकेट बोर्ड खेळाडूंच्या मनाचा, शारीरिक श्ामाचा वा दुखापतींचा तसूभरही विचार न करता कोटीच्या कोटी उड्डाणांचा बेत रचून क्रिकेटचे दौरे व स्पर्धा भरवून फक्त पैशांचाच विचार करते. आता तर आयपीएलच्या ओव्हरडोसमुळे 'डोमॅस्टिक क्रिकेट' अंधारात हरवत चाललं आहे याला सर्वस्वी जबाबदार, वर्षाचे ३६५ दिवस क्रिकेटचं वेळापत्रक आखणाऱ्या बीसीसीआयच आहे. आयपीएल हे अळवावरचं पाणी आहे. भारतीय क्रिकेट मंडळानेच क्लब क्रिकेटचा राक्षस जन्माला घालून सर्वच क्रिकेटपटूंना पैशांच्या मोहपाशात अडकवण्याचं महापातक केले. त्यामुळेच खेळाडूही राष्ट्राभिमान व कसोटी क्रिकेटला खुंटीवर टांगून ठेवण्याचं धारिष्ट्य करून झटपट मिळणाऱ्या पैशाच्या मागे धावण्यात धन्यता मानू लागले.
दिलीप अक्षेकर, माहीम.
र्वल्डकपचा पराक्रम आठवा
टीम इंडियाचे सर्वच क्रिकेटवीर देशासाठीच खेळत असतात; म्हणूनच त्यांनी आपल्या कर्तबगारीने २०११चा र्वल्डकप जिंकून आपला पराक्रम सुवर्णाक्षरात कोरला आणि भारतातील करोडो क्रिकेट रसिकांना आनंद दिला. पण त्याबरोबर हेही तितकेच खरे आहे की जादा धनलाभ प्राप्त करण्याच्या हव्यासापोटी टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटवीरांनी आयपीएलमध्ये भाग घेतलेला आहे, पण हे जरी असले तरी ढोणीच्या सर्व साथीदारांनी आयपीएल मॅचेस सुरू होण्याअगोदर र्वल्डकप जिंकून स्वाभिमानाने देशाची शान राखून 'हम भी कुछ कम नही, हे साऱ्या जगाला दाखवून दिले.
परशुराम जाधव, ठाणे.
तीन तासांचा चित्रपटच!
भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद याप्रमाणेच क्रिकेट व त्यातील पैसा ही गोष्ट काळी, गुळगुळीत झाली आहे. त्यामुळे पुन: पुन्हा आयपीएल की देश ही गोष्ट चघळली जात आहे. पैसा कुणाला नको आहे? त्यापुढे देश, देशाभिमान या गोष्टी गौणच आहेत. पूवीर् कसोटी क्रिकेट असताना पाच दिवस घाम गाळून कसोटी जिंकण्याचा आनंद, खेळणारे व बघणारे प्रेक्षकही आनंदाने लुटत असत. आता तीन-साडेतीन तास खेळून त्यापेक्षा जास्त आनंद व पैसा मिळत असताना कौशल्याचा कस क्रिकेटपटू कशाला लावतील? दुखापती व आजार लपवणे ही गोष्ट नेहमीची झाली आहे. पैशापुढे सर्वच झाकलं जात असल्यानं तीन तासांच्या चित्रपटासारख्या आयपीएलला जास्त महत्त्व मिळालं आहे. पाच दिवसांचे कसोटी सामने रंगतात पण तेवढ्यापुरते.
शुभदा गोवर्धन, ठाणे.
समन्वयाचा अभाव
आयपीएल म्हणजे भारतीय उपखंडातील लोकप्रिय क्रिकेटचा फायदा घेऊन केलेले व्यावसायिक संघटन. सर्व क्रिकेट जगतावर ज्यांचे अधिराज्य आहे त्या आयसीसीने सर्वांचे हित बघून धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा; कारण श्ाीलंकेच्या वेस्ट इंडीज दौऱ्यालाही आयपीएलमुळे हादरे बसले. क्रिकेटपटूंना देशही हवा व पैसाही हवा आहे. पण त्यात समन्वय सांधणारी यंत्रणा निष्क्रिय आहे हे सिद्ध झाले आहे. तिथेही आपलेच शरद पवार आहेत. म्हणजे आपण कुणाला बोलणार? आपलेच दात व आपलेच ओठ अशी अवस्था आहे. एकूण काय हा प्रश्न समन्वयाच्या अभावामुळे निर्माण झाला आहे व त्याला 'भारत'च जबाबदार आहे. त्यामुळे गप्प बसणे योग्य वाटते.
मोहन गिरप, घाटकोपर.
रातांधळी बीसीसीआय
बीबीसीआय ही संस्था राहिली नसून संस्थान झाले आहे. बकासूरासारखे संस्थानचे पोट झाले असल्याने हावेला मर्यादा राहिल्या नाहीत. बीसीसीआयचे पदाधिकारी संपत्तीच्या राशीत डुंबत आहेत. आयपीएल सामने ओस पडल्याची फिकीर नाही. क्रिकेट किती खेळावं, खेळाडूंची आरोग्यक्षमता याचा जराही विचार होत नाही. खेळाडूही पैशाच्या हव्यासाने या 'गंगे'त ओले झाले. किक्रेट हा धर्म असणाऱ्या देशात विक्रमांना महत्त्व आहे. वैयक्तिक विक्रमांना महत्त्व आल्याने खेळ दुय्यम ठरला आहे. बीबीसीआयचे धोरण ऐशारामी व सुखवस्तू झाल्याने सगळा आनंद आहे. थोड्याफार आजाराचे निमित्त करून अव्वल खेळाडू रजेवर जात आहेत. देशाचा अभिमान आहे कुणाला? 'पैसा फेको तमाशा देखो' अशी असणारी बीबीसीआय 'रातांधळी' झाली आहे.
गुलाब जाधव, नाशिक.
मिंधे झालेले खेळाडू!
पैशासाठी वर्षभर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची आणि त्यांना खेळवणाऱ्या बीसीसीआय आणि आयपीएलची कीव येते. त्यांनी दिलेल्या पैशापुढे खेळाडू मिंधे होतात; म्हणजे हे खेळाडू स्वार्थासाठी खेळतात. पूवीर्चे खेळाडू पैसा कमी मिळो; पण देशासाठीच खेळत असत. आताच्या खेळाडूंना जाहिरातीतूनच किती पैसा मिळतोय. तरीसुद्धा त्यांनी आयपीएलपुढे नमते का घ्यावे? पैशाचा हव्यास तरी किती धरावा? तब्येतीचाही विचार करणे त्यांना सुचत नाही? आपण देशासाठी खेळावे असे त्यांना का वाटू नये?
सुनंदा मयेकर, अंधेरी.
पोटदुखी कशाला?
भारतात बीसीसीआय ही क्रिकेटची मुख्य आणि सवोर्च्च संघटना. देशासाठी क्रिकेट संघ निवडताना ज्यांनी स्थानिक स्पर्धांमध्ये आपला फॉर्म वेळोवेळी सिद्ध केला आहे, फिटनेस टिकवला आहे त्यांचाच विचार केला जातो. या खेळाडूंना रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी या राज्यस्तरीय व विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळून आपले कसब सिद्ध करावे लागते. तसेच या स्पर्धांमध्ये खेळताना त्यांना दुखापतींनासुद्धा सामोरे जावे लागतेच. त्यामुळे बीसीसीआयच्या मान्यतेने खेळल्या जाणाऱ्या आयपीएल स्पधेर्त खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर तो दोष खेळाडूंचा कसा? पूवीर् काही भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते. त्यावेळी एवढा गाजावाजा केला जात नव्हता; पण आता मात्र काही क्रीडासमीक्षक, समालोचक, तसेच ज्यांना क्रिकेटचा गंध नाही असे जे आहेत त्यांच्या पोटात दुखते ते खेळाडूंना मिळणाऱ्या पैशाचा आकडा बघून.
रमेश तांडेल, डहाणू.
सारेकाही पैशासाठी
भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडू वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात सहभागी होण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे 'बी' टीम दौऱ्यावर पाठविण्याची भारतावर नामुष्की ओढवली. याला जबाबदार खेळाडू आहेतच; पण क्रिकेटची व्यवस्थापन कंपनीही तितकीच जबाबदार आहे. 'आयपीएल क्लब'चे फॅड आले. धनदांडग्यांच्या चंगळवादाला क्रिकेट खेळाडू बळी पडले ते पैशासाठी. देशापेक्षा त्यांना धनदांडग्यांचा क्लब मोठा वाटतो. पैशाच्या मोहाला बळी पडलेल्या खेळाडूंना यापुढे भारतीय संघात स्थान देऊ नये.
महादेव गोळवसकर, घाटकोपर.
प्रश्ान् येतो कुठे?
आयपीएलचे सामने म्हणजे कोणी मल्ल्यासाठी तर कोणी अंबानीसाठी लढत असतो. त्यात देशाचा प्रश्न येतच नाही. हा सर्व पैशाचा खेळ आहे. खेळून पैसा कमी मिळतो म्हणून की काय, अंगावर चार चार कंपन्यांचे लेगो लावून बिचारे खेळत असतात. मी देशासाठी, माझ्याकडे खूप पैसा आहे, म्हणून मी यावेळी मानधन घेणार नाही किंवा मानधन देशासाठी अर्पण करतो असे एकही उदाहरण नाही. उलट 'टॅक्स कमी करा, हे माफ करा' असेच करतानो हे खेळाडू दिसतात. आयपीएलसारखे सामने, ठराविक वेतन घेऊन देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या हितासाठी जर खेळवले गेले तरी आम्ही धन्य होऊ.
अविनाश शहापूरकर, बोरिवली.
हा तर निव्वळ धंदा
हनिफ मोहमंदचा संघ १९६० साली भारतात आला असताना पहिल्याच चेंडूवर रमाकांत देसाईने हनिफचा त्रिफळा उडवला व सारा देश आनंदाने नाचू लागला. तेव्हा आयपीएलचा झगमगाट, चीअर गर्लस्चा थयथयाट किंवा जाहिरातींचा वर्षाव नव्हता. देशप्रेम तसेच स्वहितापेक्षा देशहिताला प्राधान्य देणारे खेळाडू व तेवढ्याच नि:स्पृहतेने क्रिकेटकडे पाहणारे प्रेक्षक या गोष्टी त्यावेळच्या क्रिकेटवर अधिराज्य करीत होत्या. आज चित्र नेमके उलटे आहे. 'आयपीएल'च्या नावाखाली निर्माण झालेल्या क्लब क्रिकेटमुळे खेळाडूंचा लिलाव सुरू झाला तेव्हाच देशाची मान उंचावणारा हा खेळ संपला. आयपीएल हा एक धंदा बनून 'देश' या शब्दामधला 'दे'चा अर्थ 'किती देणार'? असा झाला व 'श'ची किंमत फक्त पैशात मोजली जाऊ लागली. खेळाडूंपेक्षा खेळाडूंना विकत घेणारे मातबर झाले. खेळाडूंची किंमत जाहिरातीमुळे मिळणाऱ्या टीआरपीत दिसू लागली व देशासाठी खेळणारे कोण हे कळेनासे झाले. 'क्रिकेट' कमी पण 'मॉडेलिंग' जास्त अशा कैचीत सापडलेला हा खेळ, देशाला सोडाच, निदान त्या खेळाशी तरी प्रामाणिक राहील का याबद्दल शंका वाटते.
सूर्यकांत भोसले, मुलुंड.
वेठबिगार खेळाडू!
या खेळाचे उबग आणणारे बाजारीकरण झाले आहे. ही स्पर्धा म्हणजे जणू सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली आहे. आयपीएल ही दोन देशांमधील स्पर्धा नसून बीसीसीआयची एक स्वतंत्र स्पर्धा आहे. परंतु या स्पधेर्मुळे हॅरिस शिल्ड, रणजी ट्रॉफी, दुलिप ट्रॉफी, टाइम्स शिल्ड यावर मात्र परिणाम होऊ लागला आहे. या स्पधेर्च्या माध्यमातून गुणवत्तेच्या जोरावर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरांवर खेळण्याचा मान मिळत असे. परंतु आजकाल सर्व खेळाडू पैशापुढे वेठबिगारी झाले आहेत. खेळाडू तर सोडाच पण समाजसुद्धा सामाजिक भान हरवत चालला आहे. पैसा हे एकमेव उद्दीष्ठ न धरता खेळाडूची मानसिकता, शारीरिकता, याचासुद्धा मंडळाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय विजय, धावा, व विक्रम हे शेवटी देशाची संपत्ती आहे आणि त्यामुळे देशाचा लौकिक वाढतो. पण आयपीएल स्पधेर्च्या नादात आपण आंतरराष्ट्रीय दौऱ्याचे ही महत्त्व कमी करून टाकले आहे. इतर देशातील विकेटस तेथील हवामान तेथे खेळण्याच्या अनुभवातून खेळाडूच्या विकासालाही बाधा येत आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. यांची सर्वतोपरी जबाबदारी ही बीसीसीआयची आहे. कारण स्पर्धा आणि दौरे यांचे आयोजन तेच करतात. अशावेळी पैशापैक्षा देशाचा अभिमान व लौकीक बघणे योग्य ठरेल.
पुरुषत्तोम आठलेकर, डोंबिवली.
तुम्ही देशाला काय दिलंत?
सिनेमातले घोडे चिखल तुडवीत, नदी-नाल्यातून सुसाट धावतात, तसे धनदांडग्यांच्या लिलावात वणीर् लागावी म्हणून क्रिकेटपटू बेभान धावतात. सामने भरवणारे हीरो तेच, पोटभर पैसे देणारेही तेच. त्यामुळे अब्जाधीश, करोडपती, कोट्याधीश आणि लक्षाधीशही स्वाभिमान गहाण ठेवून धनाच्या लालसेने लाळघोटेपणा करतात. ऊरूस संपला; लक्ष विंडीज दौऱ्याकडे लागले. प्रतिस्पधीर् संघ दुय्यम दर्जाचा म्हणून ढोणी, सेहवाग, सचिन, झहीर, युवराज आदी मातबरांनी माघार घेतली. दिलेली कारणे बोगस वाटतात. देश तुमच्या कष्टाचा अमाप मोबदला देत आहे. भारताने र्वल्डकप जिंकला. जेत्यांवर दाहीदिशांनी लक्ष्मीवर बरसली. तुम्ही काय दिलंत?
सीताराम सोलकर, भायखळा.
मसाला क्रिकेट!
पहिल्या आयपीएलपूवीर् खेळाडूंच्या लिलावाच्या 'बोली' लावल्या गेल्या. त्यावेळी तो प्रकार थोडा विचित्र वाटला. तरीही 'जंटलमेन्स गेम' म्हटलेला खेळ व खेळाडू यांचे व्यापारीकरण करून खेळाडूंना इतके वेठीस धरले जाईल, असे वाटले नव्हते. आयपीएलमधील सामने म्हणजे क्रिकेट नव्हे; त्या तर 'मसाला मॅचेस.' अती श्ामाने खेळाडू थकतात, दुखापती होतात म्हणून दौऱ्यातून माघार घेतात. तसेच भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी रणजी, दुलीप इत्यादी स्थानीय स्पर्धात्मक क्रिकेट सामने खेळणे अत्यावश्यक असूनही ते टाळतात. याचाच अर्थ देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएल क्लब क्रिकेटला अधिक पैशाच्या हव्यासापोटी जास्त महत्त्व देतात. त्यासाठी दुखापतीही लपविल्या जातात. याला जबाबदार बीसीसीआय आहे.
नरेश नाकती, बोरिवली.
त्रासदायक बांडगूळ
सध्या खेळाडूंच्या कारकीदीर्चा कालावधी फार मर्यादित झाला आहे. शक्य तेवढे खेळायचे आणि मिळेल तितके जास्त पैसे कमवायचे असा व्यवहारी दृष्टिकोन ठेवून प्रत्येक खेळाडू खेळत आहे. र्वल्डकपच्या पाठोपाठ 'आयपीएल' होणार हे सर्व खेळाडूंना माहीत होते. एकूणच काय तर 'बीसीसीआय' आणि खेळाडूंना क्रिकेटनामक कोंबडीकडून सोन्याची अंडी मिळत आहेत. ती मिळत आहेत तोपर्यंत ती घेत राहणे आणि बाकी कशाचीच पर्वा न करणे, इतका बेफिकीर दृष्टिकोन दिसत आहे. या स्पधेर्ला देशापेक्षा अधिक आलेलं महत्त्व कमी करण्यासाठी योग्य ती पावले टाकली नाही तर आयपीएलचं बांडगूळ अधिक फोफावल्याशिवाय राहणार नाही.
दादासाहेब येंधे, काळाचौकी.
खेळ नाही, तमाशाच!
वानखेडे स्टेडियममधील दोन सामने पाहिल्यानंतर आयपीएल म्हणजे क्रिकेटच्या नावाखाली चाललेला निव्वळ तमाशा होता असे वाटले. प्रेक्षकांना चीअर र्गल्स, कर्कश म्युझिक, आरडाओरड यामध्येच जास्त स्वारस्य दिसत होते. तेव्हा आयपीएलवर सरकारनेच बंदी आणावी. पैशासाठी जिवाचे रान करून खाजगी क्लबसाठी क्रिकेट खेळायचे, नंतर दुखापतीचे निमित्त करून दौरा टाळायचा. अशा खेळाडूंवर पुढील वर्षभर सगळ्या स्पधेर्साठी बंदी आणायला पाहिजे. पैसे मिळतात म्हणून खेळाडूंची दमछाक होईपर्यंत क्रिकेटचा कार्यक्रम आखायचा ही भूमिका क्रिकेट बोर्डानी आता बदलायला हवी.
अवधूत बहाडकर, गिरगाव.
ठराविक सामने ठेवा
क्रिकेटवरच बंदी घाला वा २४ तास फक्त क्रिकेटच हवे या दोन्ही भूमिका टोकाच्या. यातून काही सुवर्णमध्य निघू शकतो का यावर सर्वांनीच विचार करायला हवा. वर्षातून ठराविक काळ म्हणजे साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान क्रिकेटप्रेमींना जे काय उद्योगधंदे करायचे असतील ते करू द्यावेत. पण नंतर मात्र 'नो क्रिकेट, नो विकेट' अशी भूमिका जनाधार घेऊन राबविली तर युवा पिढी अनर्थातून वाचेल.
प्र. गो. केळकर, मालाड.
बाकीच्यांचे काय?
क्रिकेटपटू दुखापतीमुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत आहेत, याचा ऊहापोह करण्याची खरंच गरज आहे का? र्वल्डकपजिंकला त्याचे काय? २०/२० विश्व चषक जिंकून आणलाच ना? देशासाठीच खेळले ना ते? मग पैशासाठी आयपीएल खेळले तर बिघडलं कुठे? आणि त्यांना विश्ाांती नको? पैसा किंवा देश यामधून एक गोष्ट निवडण्यापेक्षा पैसा आणि देश याचा समन्वय साधावा. क्रिकेट मंडळाने स्पधेर्चे वेळापत्रक नीट आखावे म्हणजे क्रिकेटपटूंची दमछाक होणार नाही. सामान्य माणसाला भविष्याची तरतूद करण्याचा हक्क आहे तसाच खेळाडूंनाही आहे. त्यांचं क्रिकेट संघामधील स्थान खूपच कमी काळ असते. (अपवाद सचिन तेंडुलकर) प्रत्येक माणसाला देशाभिमान असतोच; परंतु फक्त देशाभिमानाने पोट नाही भरत आणि देशाभिमान फक्त खेळाडूंनाच हवा का? बाकीचे देश विकायाला निघाले त्याचे काय? क्रिकेट मंडळाने खेळाडू देशासाठी खेळायला नकार का देतात याचा विचार करावा. पैशासाठी मॅच फिक्सिंगसारखे लांछनास्पद पर्याय स्वीकारण्यापेक्षा आयपीएलमधून खेळणे निश्चितच चांगले.
आकांक्षा बाबर, ठाणे.
जनतेच्या पदरात काय?
देशासाठी राष्ट्रीय संघातून खेळल्यावर जेवढी कमाई होईल त्यापेक्षा अनेकपट पैसा इंडियन प्रीमियर लीग या स्पधेर्तून खेळाडूंना मिळतो. कर्णधार ढोणीने आधीच दौऱ्यातून अंग काढून घेतले. सेहवाग, सचिन, झहीर खान यांनीही काढता पाय घेतला. यावरून खेळाडू देशासाठी खेळत नसून स्वार्थासाठी खेळतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आयपीएल सामने भरवणाऱ्यांनाही कमाईचंच महत्त्व अधिक वाटतं. यामध्ये देशाच्या नावलौकिकापेक्षा वैयक्तिक स्वार्थच अधिक दिसतो. सामने सुरू असताना कार्यालयातील शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण कार्यालयीन कामे सोडून टीव्हीसमोर बसलेले असतात. त्यामुळे कामाचे कित्येक तास वाया जातात. आणि कोट्यावधीचे नुकसान होते. प्रश्न असा निर्माण होतो की, भारतीय जनतेच्या पदरात काय पडते? देशबांधवांनी यांच्यावर कशासाठी प्रेम करावं आणि नियमात न बसणारा 'भारतरत्न' पुरस्कार देण्याचा अट्टाहास का आणि कशासाठी करायचा

No comments:
Post a Comment