आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांप्रमाणे शैक्षणिक संस्थांची दुकाने उघडली नाहीत. सहकारी बँका काढून त्या तुमच्याप्रमाणे लुटल्या नाहीत.
अजितपादा पवार!
महान समाजसेवक!!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘दादा’ म्हणून मिरवणार्या अजित पवारांनी नेहमीप्रमाणे तोंडावाटे ‘पादा’ केले आहे. हे अजितपादा पवार जेथे जातील तेथे तोंडावाटे दुर्गंधीच सोडत असतात व त्याच ‘पादा’ परंपरेस जागून त्यांनी शिर्डीच्या पवित्र स्थळी घाण केली आहे. अजित‘पादा’ आमच्यावर टीका करताना असे म्हणाले की, ‘शिवसेनाप्रमुखांनी असे कोणते सामाजिक कार्य केले? त्यांनी एक शैक्षणिक संस्थाही उभी केली नाही. फक्त शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारणच केले. एखादा कारखानाही ते उभा करू शकले नाहीत.’ अशा प्रकारचे वक्तव्य करून या अजितपादा पवारांनी स्वत:च्या अकलेची दिवाळखोरी जाहीर केली. खरं तर या शेंबड्या पोराविषयी आम्ही काय बोलावे? काकाच्या नावावर शिरजोर झालेला हा पुतण्या आहे. आम्ही कोणते समाजोपयोगी काम केले किंवा नाही याचा हिशेब देण्याइतकी आमची पत अद्याप घसरलेली नाही. महाराष्ट्राची आठ कोटी मराठी जनता व या देशातील तमाम हिंदू समाजच आमच्या सामाजिक कार्याविषयी सांगू शकेल. आम्ही ‘शिवसेना’ स्थापन केली नसती तर मुंबईसह महाराष्ट्रात मराठी माणसांचे काय हाल झाले असते हा प्रश्न अजितपादांनी खुद्द आपल्या काकांना खासगीत विचारावा. कारण काका खासगीत कदाचित खरे बोलतील व जाहीरपणे वेगळेच सांगतील. मराठी तरुणांच्या पोटापाण्याचे जेवढे प्रश्न आम्ही सोडवून एका मराठी पिढीचा उद्धार केला, त्याविषयी आम्हीच काय बोलावे? आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांप्रमाणे शैक्षणिक संस्थांची दुकाने उघडली नाहीत. सहकारी बँका काढून त्या तुमच्याप्रमाणे लुटल्या नाहीत. सहकारी साखर कारखानेनामक स्वत:ची संस्थाने निर्माण करून शेतकर्यांना पिळले नाही. ही असली समाजसेवा करून घर भरण्यासाठी आम्ही राजकारणात उतरलो नाही व त्यासाठी शिवसेनेचे प्रयोजनही नाही. अजितपादा पवारांनी मात्र त्यांच्या काकांनाही मागे टाकणारे जे समाजकार्य केले आहे त्याबद्दल महात्मा सुरेश कलमाडींच्या हातून त्यांना एखादा जीवनगौरव पुरस्कारच प्रदान केला पाहिजे. अजितपादांच्या सामाजिक कार्यांचा डोंगर प्रचंड आहे.
आदिवासींच्या जमिनींवर ‘लवासा’
उभारण्याचे सामाजिक कार्य फक्त हे अजित‘पादा’च करू शकतात. सरकारी जमिनींवर स्वत:चे बंगले बांधणारे, शेतीचे पाणी उद्योगपतींना विकणारे, गुंडा-पुंडांच्या मांडीस मांडी लावून बसणारे, महाभयंकर अणुऊर्जा प्रकल्पाची वकिली करणारे अजितपादा पवार यांच्या समाजसेवेचे पुस्तक राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तत्काळ प्रसिद्ध करून मराठी जनतेच्या ज्ञानात भर टाकायलाच हवी. अजितपादांच्या समाजकार्याची थोरवी ती काय वर्णावी? सातार्याचा जरंडेश्वर साखर कारखाना काही हजार कोटींचा असताना लिलावात तो केवळ 65 कोटींना विकला. या सौद्यात मुंबईच्या कंपनीला किती मोठा लाभ झाला! प्रचंड महागडी वस्तू एखाद्या मर्जीतील उद्योगपतीला स्वस्तात मिळवून देणे हे ‘समाजकार्य’च नव्हे काय? एवढे अफाट काम करूनही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध ‘चारसो बिसी’ची फौजदारी तक्रार न्यायालयात दाखल व्हावी हा मोठाच अन्याय झाला म्हणायचा! तिकडे मुळशी तालुक्यात अशाच एका जमीन व्यवहाराचे ‘समाजकार्य’ करतानाही मध्येच कुणीतरी शिंकले. या प्रकरणातही न्यायालयाने खास आदेश देऊन या ‘थोर’ समाजसुधारकास प्रतिवादी केले. ए. जी. मर्कंटाईल या कंपनीतही या पादांचे शेअर्स आहेत असे म्हणतात. आपल्याच मालकीच्या या कंपनीला कोट्यवधी रुपयांची सरकारी जागा अजितपादांनी फुकटात बहाल केली. सिंचन, जलसंपदा खाते सांभाळताना कालव्याकालव्यांतून झालेला भ्रष्टाचार, त्यातून मिळालेली ‘टक्केवारी’ असे थोडेथोडके नव्हे, तर प्रचंड समाजकार्य पादांच्या नावावर आहे. अशा भलत्या समाजकार्यांपासून आम्ही चार हात लांबच राहिलो हे मात्र आम्हाला कबूल आहे. इतकेच कशाला अजितपादा पवारांच्या जीवनातील नाना ‘कळा’ काय आहेत याविषयी एखादा ‘टॉक शो’ श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही लोकांसमोर आणला तर बर्याच गोष्टींचा उलगडा होईल. विनोद गोएंकासारखे थोर समाजसेवक हे अजित पवारांच्या दिमतीला असल्यानेच आज ‘तिहार’ तुरुंगात स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी म्हणून तपस्या करीत आहेत. ‘मी टग्या आहे’ असे सांगून झुंडशाहीस प्रोत्साहन देणारे अजितपादांचे समाजकार्य हे आतापर्यंत दुर्लक्षित राहिले. या निमित्ताने ते समोर आले. महाराष्ट्रात हे महाशय इतकी वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवीत आहेत, पण महाराष्ट्राला भिकारी करणारे व
स्वत:ची श्रीमंती वाढविणारे यांचे समाजकार्य
काय कामाचे? विदर्भातील 14000 शेतकरी आत्महत्या करून मेले व हे ‘टगे’ सावकारांचे तारणहार बनून मौजा मारीत राहिले हीच यांची सामाजिक करामत. आता म्हणे हे ‘दादर’ रेल्वेस्थानकाचेही नामांतर करायला निघाले आहेत. अजितपादा पवारांना आमचा एक प्रश्न आहे, शिवशक्ती-भीमशक्तीच्या वादळानंतरच तुम्हाला हा आंबेडकरांचा पुळका का उफाळून आला? डॉ. बाबासाहेबांच्या मानसन्मानाची इतकीच इच्छा होती तर मग वांद्रे-वरळी सी लिंकला डॉ. आंबेडकरांचे नाव का नाही दिले? त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ‘काका’ पवारांनी स्वत:च राजीव गांधींचे नाव सुचवून आपली सेवा सोनियाचरणी रुजू करून ठेवली. हाच काय तुमचा स्वाभिमान? राजीव गांधी हे डॉ. आंबेडकरांपेक्षा महान नव्हते व नाहीत. वरळी-वांद्रे सी लिंकच्या एका मार्गास स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व दुसर्या मार्गास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन देशाची सेवा केलेल्या दोन ‘मराठी वीरां’चा सन्मान करता आला असता, पण त्या मोठ्या प्रकल्पास राजीव गांधींचे नाव देता आणि दादर स्थानकाच्या नामांतराचे राजकारण करता? आधी शिवाजी महाराजांना छोटे केलेत व आता अजितपादांचा राष्ट्रवादी पक्ष डॉ. आंबेडकरांना खुजे करीत आहे. सध्या ठिकठिकाणी कारण नसताना ‘गांधी’ परिवाराची नावे संस्थांना देण्याचा सपाटाच लावला आहे. इंदिरा - राजीवचे पुतळे उभारून जागा अडवल्या जात आहेत. त्या सर्व जागांवर डॉ. आंबेडकरांचे पुतळे उभे करून वाढवा सन्मान डॉक्टरांचा. इतकेच कशाला, हिंदुस्थानात प्रसिद्ध असलेल्या ‘बारामती’ जिल्ह्याचे नामांतर डॉ. आंबेडकर जिल्हा असे करून अजितपादा पवारांनी डॉ. आंबेडकरांना मानवंदना द्यावी, अशी तमाम भीमशक्तीची मागणी आहे. चला, अजितपादा पवार, सामाजिक कार्याची एक तरी वीट रचून दाखवा

No comments:
Post a Comment