हेपॅटायटिस—ईमुळे मुंबईत ६ गरोदर महिलांचा मृत्यू
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) - काविळीचाच एक प्रकार असलेल्या हेपॅटायटिस-ई या आजाराने मुंबईत चांगलेच थैमान घातले आहे. हेपॅटायटिस-ईवरती कोणतीच लस उपलब्ध नसून चायनीज आणि चायनीज भेळ खाल्ल्याने या रोगाची लागण होते. त्यामुळे चायनीज भेळ व चायनीजसह पावसाळ्यात उघड्यावर विकल्या जाणार्या पदार्थांवर बंदी आणावी, अशी मागणी आरोग्य समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केली, तर चायनीजसह या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.हेपॅटायटिस-ईमुळे सहा गरोदर महिला दगावल्याचा मुद्दा उपस्थित करून आरोग्य समितीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर प्रशासनाने हेपॅटायटिस-ईने सहा गरोदर महिला दगावल्याची कबुली दिली. हेपॅटायटिस-ई हा काविळीचाच प्रकार असून त्यावर रोगप्रतिबंधक लसच नसल्याचे प्रशासनाने सांगितले. चायनीज, चायनीज भेळ, दूषित पाणी आणि उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने हा रोग होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी सांगताच चायनीज गाड्यांवर बंदी आणण्याची मागणी सदस्यांनी केली. या चायनीज गाड्या आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांवर कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.चायनीज बनविण्यासाठी दूषित पाणी
चायनीज गाडीवाले चायनीज बनवताना दूषित पाणी वापरतात आणि चायनीजसाठी वापरण्यात येणारा मसालाही निकृष्ट दर्जाचा असतो. गलिच्छ वस्त्यांमधील गरोदर महिलांना क्लोरीनच्या गोळ्या वाटप करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.काही त्रास आहे का?गरोदर महिलांमध्ये चौथ्या ते सहाव्या महिन्यात ‘हेपॅटायटिस-ई’चे लक्षणे आढळतात. ४ ते ६व्या महिन्यात डोके गरगरणे, उलटी होणे, मळमळ होणे किंवा जेवणावरून वासना उडणे असा त्रास होतो. ही लक्षणे आढळल्यास गरोदर महिलांनी केईएम किंवा शीव रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी केले

No comments:
Post a Comment