आणि रामदेवबाबांचा टीआरपी वाढला4 Jun 2011, 0408 hrs ISTबालपण
बाबा रामदेव यांचा जन्म १९६५ साली हरियाणामधील महेंदगड जिल्ह्यात झाला. गुलाबदेवी आणि राम निवास हे त्यांचे आई-वडील. रामकृष्ण यादव हे त्यांचे बालपणीचे नाव. लहानपणीच म्हणजे साधारण आठवीत असताना रामप्रसाद बिस्मील आणि नेताजी सुभाषचंद बोस यांची आत्मचरित्रे त्यांच्या वाचनात आली त्यानंतर त्यांनी खानपूर येथील आर्ष गुरुकुलमध्ये प्रवेश घेतला. इथूनच त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. या गुरुकुलात त्यांनी आचार्य प्रद्युम्न यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत आणि योगाचा अभ्यास केला. याच काळात ते आचार्य बलदेवजी यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी संन्यास घेतला. त्यानंतर त्यांचे स्वामी रामदेव असे नामकरण करण्यात आले.
योगाचे शिक्षण
हरियाणामधील जिंद जिल्ह्यातील कल्वा गुरुकुलात त्यांनी योगाचे शिक्षण देण्यास सुुरुवात केली. या ठिकाणी ते स्थानिक ग्रामस्थांना योगविद्या शिकवीत असत. त्यानंतर ते हरिद्वारला गेले. योगी अरविंद घोष यांच्या यौगिक साधन या बंगाली भाषेतील पुस्तकाचा रामप्रसाद बिस्मील यांनी केलेला हिंदी अनुवाद बाबा रामदेव यांच्या वाचनात आला. या पुस्तकाच्या प्रभावामुळे हिमालयात निघून गेले. तेथे काही काळी ध्यान-धारणा केल्यानंतर ते हरिद्वारला परतले. त्यानंतर ते कनखल येथील कृपाळू बाग आश्रमात राहू लागले.
टीआरपी वाढला
आस्था चॅनेलची नुकतीच सुरुवात होत होती. चॅनेलच्या माधवकांत मिश्र यांना यासाठी एका योग्याची आवश्यकता होती. त्यांनी बाबांना योगासने शिकवताना पाहिले होते. त्यावरून त्यांना आस्था चॅनेलच्या सकाळच्या स्लॉटमध्ये कार्यक्रम करण्याची संधी देण्यात आली आणि बाबांचा टीव्हीवर उदय झाला. थोड्याच अवधीत बाबांनी आपला टीआरपी वाढवला आणि योगालाही महत्त्व प्राप्त करून दिले. त्यांच्या कीतीर्चे वारे परदेशापर्यंत वाहू लागले. खुद्द न्यूयॉर्क टाइम्सलाही त्यांची दखल घ्यावी लागली. योगाचे साम्राज्य निर्माण केलेला एक भारतीय अशा शब्दांत न्यूयॉर्क टाइम्सने त्यांचा गौरव केला.
राजकारणात प्रवेश
आपल्याला राजकारणात अजिबात रस नाही असे जरी बाबांनी सांगितले असले तरी त्यांना राजकारणापासून अलिप्त राहता आले नाही. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी नाही तर समाजातील लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने आणि राजकारणात वाढलेली बजबजपुरी नष्ट करण्याचे कारण सांगत त्यांनी भारत स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यांनी आपल्या पक्षाची काही उद्दिष्टेही निश्चित केली आहेत. यात शंभर टक्के मतदान, राष्ट्रीयत्वाची भावना अंगी बाणवणे, परदेशी कंपन्यांवर बहिष्कार,स्वदेशीचा पुरस्कार आणि देशातील सर्व लोकांचे एकीकरण यांचा समावेश आहे.
भ्रष्टाचारविरोधी मोहीम
भ्रष्टाचारविरोधात संसदेत जन लोकपाल विधेयक मंजूर करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या उपोषणाला बाबा रामदेव यांनी पाठिंबा दिला आणि ते या मोहिमेत सहभागी झाले. भ्रष्टाचार विरोधातील आंदोलन त्यांनी आता तीव्र केले असून, शनिवारपासून दिल्लीतील रामलीला मैदानात ते उपोषण सुरू करीत आहेत.
........................
पतंजली योगपीठ
महर्षी चरक यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी हरिद्वारमध्ये पतंजली योगपीठाची स्थापना केली. देशातील सर्वात मोठे आयुर्वेदिक यौगिक केंद बनवण्याचे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट होते. तसेच येथे रुग्णांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करण्याचा आणि संशोधन करण्याचा त्यांचा मानस होता. आजही या योगपीठात गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. या योगपीठाचे काम वाढत गेले तशा त्याच्या शाखाही वाढत गेल्या. आयुर्वेद कॉलेज, पतंजली चिकित्सालय, योगग्राम, गोशाला, पतंजली हर्बल बॉटनिकल गार्डन, सेंदीय शेती, पतंजली फूड अँड हर्बल पार्क लि. या काही याच्या शाखा आहेत. दिव्य प्रकाशनाच्या माध्यमातून बाबांनी योगाची माहिती देणारी काही पुस्तकेही लिहिली आहेत. तर योग संदेश हे नियतकालिक ते चालवतात. हे नियतकालिक हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, बंगाली, ओरिया, आसामी, नेपाळी, कन्नड आणि तेलुगु या ११ भाषांत प्रसिद्ध होते. स्कॉटिश आयलंडमध्ये २० लाख पाऊंड खर्चून पतंजली योगपीठासाठी जागा घेतली आणि स्कॉटलंडमध्येही त्यांनी योगाचा झेंडा फडकवला.
.............................
पुरस्कार
- जानेवारी २००७ : योगाला लोकमान्यता मिळवून दिल्याबद्दल भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलाजीतफेर् मानद डॉक्टरेट
- मार्च २०१० : नॉयडा येथील अॅमिटी विद्यापीठातर्फे डॉक्टरेट ऑफ सायन्सेस
- एप्रिल २०१० : डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स
- जानेवारी २०११ : महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते श्री चंदशेखरेंद सरस्वती राष्ट्रीय सन्मान पुरस्कार.
..................................
मालमत्ता
- हरिद्वार येथील बाबांच्या पतंजली योगपीठ ट्रस्टची मालमत्ता एक हजार कोटींहून अधिक असल्याचे बोलले जाते.
- स्कॉटलंड येथे योगपीठाची शाखा उघडण्यासाठी २० लाख पौंड खर्चून जमीन खरेदी
- पतंजली योगपीठाकडून आस्था चॅनेलमधील काही शेअर विकत घेतल्याची वदंता
................................
बाबा आणि वाद
- बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीवर २००६मध्ये माकपच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा कारथ यांनी आरोप केले होते. या फार्मसीमधून तयार होणाऱ्या औषधांमध्ये मानवी हाडांचा वापर केला जातो असे त्यांनी म्हटले होते.
- बाबांनी आपण कॅन्सरसारखा असाध्य रोग पूर्ण बरा करू शकतो, असा दावा केला होता. परंतु त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
- समलैंगिक संबंधावर बाबांनी निंदाव्यंजक टिप्पणी केली होती. हा एक रोग असून, अशा व्यक्तींवर हॉस्पिटलमध्ये उपचार करायला हवेत. हॉस्पिटल्स जर या व्यक्तींना बरे करू शकत नसतील तर माझ्याकडे यावर उपाय आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते

No comments:
Post a Comment