हिंसक जमावापासून घरांचे, समाजाचे, संरक्षण करण्यासाठी, पोलिस येईपर्यंत आम जनतेचे संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना
महत्त्वांच्या
मुद्द्यांचा थोडक्यात सारांश
- शत्रु-हिंसक जमाव ,हिंसक
जमावा विरुध वापरण्याची साधने, हिंचाचाराला सुरुवात कशी होते,
- ज्या वेळेला तणावाची परिस्थिती निर्माण होते
त्यावेळेस काय करायचे?
- जमावाचा हल्ला होत आहे, त्यावेळेला काय करायचे?
- हिंसाचार झाल्यानंतर
नुकसान भरपाई मिळवण्याकरता करायची कारवाई
- प्रतिबंधात्मक उपाय:(प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे वेळोवेळी सेक्युरिटी
ऑडिट करा आणि काही कमी असल्यास त्याला दूर करा)
- सरंक्षण करण्याकरता घातक नसलेली
पद्धती वापर
- हिंसक आंदोलनामुळे सामान्य माणसांची सुरक्षा
धोक्यात
- हिंसक आंदोलने दहशतवादाचा एक प्रकार
- हिंसक आंदोलकांना, त्यांच्या
संयोजकांना हिंसयेमुळे झालेले समाजाचे नुकसान भरपाई करण्यासाठी भाग पाडले
पाहिजे
जातीय दंगली,हिंसक आंदोलने ,हिंदु मुस्लिम
दंगे भारतात अनेक वेळा होतात. अनेक वेळा मोठा जमाव, इतर समाजाच्या
घरांवर हल्ले करतो. त्या घरात राहणार्या लोकांना मोठ्या जमावापासून स्वतःचा बचाव
करणे कठीण जाते. हिंसक जमाव मालमत्तेची नासधूस करतात, जाळपोळ करतात आणि तेथे राहणाऱ्या निष्पाप लोकांना मारतात .
अश्या हिंसक
जमावापासून घरांचे संरक्षण करण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत.?
पोलिस येईपर्यंत
या लोकांचे संरक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली पाहिजे? हिंसक जमावापासून घरांचे संरक्षण करण्यासाठी आणि पोलिस येईपर्यंत लोकांचे
संरक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
काही पैलु खालिल
प्रमाणे आहेत:-
1.शत्रु-हिंसक
जमाव-या हिंसक जमावाची शस्त्रे असतात, दगडफेक, गावठी स्फ़ोटक, सुरे, तलवारी, कुऱ्हाडी आणि
इतर लोकल शस्त्रे.जमावा मधल्या काहींकडे लायसन्स किंवा नॉन लायसन्स शस्त्रे बंदूका सुद्धा असतात. जमावाचे नेतृत्व त्या
भागातली गुंड मंडळी करतात. त्यांना एकत्र येण्याकरता व्हाट्सअप किंवा मोबाईल वरती
संदेश दिले जातात. ज्यामुळे अगदी थोड्या वेळात युवक हिंसा करण्याकरता एकत्र येऊ
शकतात.
तणावग्रस्त
परिस्थितीमध्ये जर अशा गुंडांच्या मोबाईल वरती लक्ष ठेवता आले, तर त्यांना आधीच
पकडता येईल. मोबाईल मधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावु संदेश, चित्रे पाठवली
जातात ज्यामुळे जमाव हिंसक करण्याकरता तयार होतो.
2.हिंसक जमावा
विरुध वापरण्याची साधने-संशयास्पद व्यक्ती आणि जमावावर लक्ष ठेवणे आणि युक्तीचा वापर करून
त्यांना घाबरवणे. संरक्षणाकरता नॉन लिथल शस्त्रांचा वापर करणे.
3. हिंचाचाराला
सुरुवात कशी होते आतापर्यंत असे बघितले गेले आहे की हिंसक जमाव
हळूहळू एकत्र येतो, त्याची संख्या वाढते आणि अचानक हिंचाचाराला
सुरुवात होते. त्यावेळेस तिथे असलेले पोलीस जनतेचे फारसे रक्षण करू शकत नाही. कारण
ते म्हणतात की जमावाची संख्या खूपच जास्त होती. म्हणूनच जर हिंसक जमावापासून रक्षण
करायचे असेल तर, हिंसेच्या वेळेला पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे .त्याकरता
पोलिसांच्या क्विक रिएक्शन टीम्स या तणावग्रस्त भागांमध्ये तैनात करण्यात केल्या
पाहिजेत. एसआरपीएफ आणि अर्ध सैनिक दलांना त्या भागात लवकरात लवकर आणले जावे. गरज
पडली तर सैन्याची सुद्धा तैनाती करता येईल. कुठल्या भागामध्ये, कुठल्या क्विक
रिएक्शन टीमला तैनात करता येईल, मदत कुठून आणता येईल याचा वेळोवेळी अभ्यास
केला जावा, ज्यामुळे जेव्हा गरज पडेल तेव्हा पोलीस वेळेवरती पोहोचतील आणि हिंसक
जमावाला हिंसा करण्यापासून थांबवू शकतील.
प्रत्येक घराचे आणि किंवा सोसायटीचे रक्षण करण्याची पद्धत, त्या त्या घराच्या आणि सोसायटीच्या रचनेवरती अवलंबून
असेल .म्हणून एखाद्या पोलीस किंवा अर्ध सैनिक दलातिल किंवा लष्करी अधिकाऱ्यांकडून
नेमके त्या जागेचे संरक्षण कसे करायचे याचे एक विश्लेषण करून, अंमलबजावणी करण्याचा एक प्लॅन तयार केला जावा. मात्र
काही मुद्दे जे सगळ्या प्रकारच्या घरांना आणि परिस्थितीला कॉमन असतील ते खाली दिले
आहेत.
घराचे आणि घरात राहणाऱ्या माणसांचे नुकसान कमी
करण्याकरता तीन परिस्थितीमध्ये वेगवेगळे उपाय करता येईल.
1. ज्या वेळेला तणावाची परिस्थिती
निर्माण होते त्यावेळेस काय करायचे?
जर तणाव जास्त निर्माण झाला असेल आणि हिंसक हल्ला होण्याची शक्यता वाढली असेल, तर
बायका, मुले ,आजारी,व म्हातारी माणसे म्हणजे, कमजोर घटकांना घरातून
दुसऱ्या नातेवाईकांच्या घरी सुरक्षित स्थळी पोचवावे, ज्यामुळे
त्यांचे रक्षण होईल आणि घराच्या आत फक्त धडधाकट तरुण माणसे माणसांनीच राहावे,
ज्यामुळे हल्ला झाल्यास चांगला प्रतिकार करता येईल.पोलिसांनी
ड्रोन्सचा वापर करून जमावावर लक्ष ठेवावे, यांचे चित्रीकरण
करावे, ज्यामुळे त्यानंतर हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.
2. जमावाच्या हल्ला होत आहे,
त्यावेळेला काय करायचे?
रक्षण करण्याचे महत्त्वाचे तत्व आहे की हिंसक जमावाला
वेगवेगळ्या पद्धतीने लांब अंतरावरतीच घाबरवणुन थांबवणे. तरी ही जमाव अजून जवळ आला
तर त्याच्यावरती विविध नॉन लिथल वेपन्स म्हणजे कमी घातक शस्त्रांच्या मदतीने
त्यांना काही वेळ थांबवणे, जोपर्यंत ईतर नागरिक, पोलीस किंवा अर्ध सैनिक दलांची मदत वस्तीचे रक्षण करायला तिथे पोहोचतिल.
जेव्हा आजूबाजूच्या भागांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आपल्या गल्लीचे/ मोहल्याचे किंवा घराचे रक्षण
करण्याकरता एक टेहाळणी पथक तयार करावे, जे आजूबाजू लक्ष ठेवून संशयास्पद जमाव
किंवा संशयास्पद व्यक्ती किंवा संशयास्पद कारवाई होत असेल तर त्याची माहिती लगेचच
सगळ्यांना देतील, ज्यामुळे हिंसा होण्याच्या आधीच
त्यांना थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.
प्रत्येक घरामध्ये एक बॅटरी ऑपरेटेड मेगाफ़ोन असणे गरजेचे आहे. ज्यामुळे मोठ्या
आवाजात घोषणा करून किंवा आरडा ओरडा करून हिंसक जमावाला घाबरता येईल. त्यांना वाटेल
की या भागांमध्ये संरक्षणाकरता पुष्कळ जास्त व्यक्ती उपस्थित आहेत.
गल्लीमध्ये एक दोन घरामध्ये पोलीस सायरन चा आवाज करणारे सायरन असतील,आणी ते वाजवले तर त्यामुळे हिंसक जमावाला असे वाटेल, की पोलीस येत आहेत आणि ते हिंसाचार करायचे ऐवजी पळून
जातील.
हिंसक जमावाच्या विरुद्ध केलेली आक्रमक कारनाई ही नॉन लिथल वेपन्स म्हणजे कमी
घातक शस्त्रांच्या मदतीने केली जावी. यामध्ये गुलेरचा वापर, वॉटर कॅनन्स म्हणजे पाण्याचा वापर करणे, मिरची स्प्रे किंवा बाजारामध्ये मिळत असलेल्या
शस्त्रांचा वापर करणे, ज्यामुळे हिंसक आंदोलक काही वेळ निष्क्रिय होतील.
आज अनेक नॉन लिथल वेपन्स मार्केटमध्ये मिळतात ज्याचा वापर आपण हिंचक जमावावरती
करू शकतो. मात्र या अशा नॉन लिथल शस्त्रांचा वापर हा दुरून करता आला पाहिजे
ज्यामुळे हिंसक जमावाशी समोरासमोर असा मुकाबला होणार नाही.
कमी बोअर असलेली शस्त्रे,आणि लायसन्स वेपन्स चा वापर फक्त स्वतःच्या संरक्षणाकरताच करता येईल .
कारवाई ही देशाच्या कायद्याच्या आत बसलेली पाहिजे आणि कुठलीही बेकायदेशीर
कारवाई केली जाऊ नये.
3. हिंसाचार झाल्यानंतर नुकसान
भरपाई मिळवण्याकरता करायची कारवाई
हिंसक हल्ला होताना सगळ्या मोबाईल मधून केलेले
व्हिडिओज एकत्र करून पोलीस स्टेशनला द्यावे आणि एक समिती निर्माण करून झालेल्या
नुकसानाची
भरपाई हिंसक जमाबापासून करण्याकरता सरकारला भाग
पाडावे.
भारतात हिंसक
आंदोलने अनेकदा होतात आणि त्यात इतर समाजाच्या घरांवर हल्ले होण्याची घटनाही घडते.
अशा हिंसक जमावापासून घरांचे संरक्षण करण्यासाठी आणि पोलिस येईपर्यंत लोकांचे
संरक्षण करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय आणि घातक नसलेली पद्धती(non lethal
methods) खालीलप्रमाणे आहेत:
प्रतिबंधात्मक
उपाय:(प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे वेळोवेळी सेक्युरिटी ऑडिट करा आणि काही कमी
असल्यास त्याला दूर करा)
·
घरांच्या प्रवेशद्वारांवर मजबूत आणि सुरक्षित
दरवाजे आणि खिडक्या बसवा.सुरक्षा प्रणाली स्थापित करा. यामध्ये सुरक्षा
गार्ड, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा भिंत किंवा फ़ेन्स/तारेचे कुंपण यांचा समावेश असू शकतो.
·
घराच्या आत आणि बाहेर सिक्युरिटी कॅमेरे बसवणे, जेणेकरून हिंसक जमावाच्या हालचाली रेकॉर्ड केल्या जाऊ शकतील.
·
घरात एक मोठा पाण्याचा साठा ठेवा जो आगी पासुन
स्वतःचे रक्षण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
·
घरात एक मोठा बॅटरी-चालित रेडिओ ठेवा जेणेकरून
तुम्ही बातम्या आणि संकटकालीन सूचना मिळु शकतात.
·
घरात अग्निशमन यंत्र आणि इतर आवश्यक संसाधने ठेवणे,ज्या मुळे
जमावाने आग लावण्याचा प्रयत्न केल्यास आज लगेच काबूमध्ये आणता येते.
·
तुमच्या शेजाऱ्यांशी संपर्क साधा आणि हिंसक
जमावाच्या हल्याच्या शक्यतेबद्दल त्यांच्याशी चर्चा करा.आपल्या समुदायातील इतर
लोकांशी संबंध साधा. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही संपर्कात
राहू शकता.आपापल्या भागामध्ये सुरक्षे करता व्हाट्सअपचे ग्रुप तयार करा, ज्यामुळे
एकमेकाला वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्य करता येईल.
·
स्थानिक पोलिस आणि प्रशासनाशी संपर्क साधा. त्यांना तुमच्या
भागातिल हिंसाचाराच्या जोखमींबद्दल माहिती द्या.
·
पोलिस येईपर्यंत लोकांचे संरक्षण करण्यासाठी
लोकांनी एकत्र राहावे आणि एकमेकांना मदत करावी. लोकांनी घराच्या आत अडकून पडू
नयेत. जर घरात अडकले असेल तर लोकांनी
सुरक्षित ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करावा.
·
घरात किमान आवश्यक वस्तू ठेवा जेणेकरून
तुम्हाला आणीबाणीच्या परिस्थितीत बाहेर पडणे सोपे जाईल.
सरंक्षण करण्याकरता घातक नसलेली पद्धती वापर
·
मोठ्या जमावापासून दूर राहा. जर तुम्हाला
जमाव येत असल्याचे दिसले तर शांतपणे आणि सुरक्षित ठिकाणी जा.
·
जर तुम्हाला जमाव तुमच्या घरात आला तर, आक्रमक कारवाया
सर्वात शेवटी करा. तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा आणि खिडक्या बंद
करू शकता आणि पोलिसांना कॉल करू शकता.
·
जर तुम्हाला जमाव तुमच्यावर हल्ला करत असेल तर, तुमचे स्वतःचे
आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही घातक नसलेली पद्धती वापरू शकता, जसे की पाण्याची
फवारणी, ध्वनी बॉम्ब किंवा धूर बॉम्ब.
·
पोलिसांना कॉल करा आणि शक्य तितक्या लवकर मदत
मिळवण्याचा प्रयत्न करा.
·
स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मजबूत वस्तू, जसे की मोठा
डंडा वापरा.
·
घरात तुमच्या गरजेच्या सर्व वस्तू ठेवा, जसे की अन्न, पाणी, औषधे आणि इतर
आवश्यक वस्तू.
·
तुमच्या कारमध्ये इंधन भरा आणि ती सुसज्ज
ठेवा.
·
तुमच्याजवळ एक पॅनिक बटण किंवा इतर प्रकारची
आपत्कालीन कॉलिंग पद्धत ठेवा.
जर तुम्ही हिंसक जमावाच्या हल्ल्यात सापडले आणि
स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. शक्य तितक्या लवकर मदत मिळवण्याचा प्रयत्न
करा.हिंसक जमावापासून स्वतःचे संरक्षण करणे कठीण असू शकते, परंतु या प्रतिबंधात्मक
उपाय आणि घातक नसलेली पद्धती वापर नुकसान कमी करु शकतात.
माझ्या अनुभवावरून काही उपाययोजना सुचवण्याचा मी
प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्येक घर, गल्ली किंवा मोहल्ला याचे तज्ञांकडून लष्करी
विश्लेषण केले जावे आणि मोहल्याचे रक्षण कसे करायचे याचा नेमका प्लांन बनवला जावा.
ज्याची माहिती त्या भागातल्या सगळ्यांना वेळोवेळी दिली जावी. समाजातील तज्ञ
व्यक्तींचा वापर करून हा सुरक्षा प्लॅन अजून जास्त मजबूत केला जावा, ज्यामुळे
कुठल्याही हिंसाचाराला तोंड देण्याकरता आपण सदैव तयार असू.
Extremely useful info , every one must read carefully
ReplyDelete