Total Pageviews

Saturday, 16 September 2023

भारतीय सैन्याच्या ऑपरेशन पोलो ने केले हैदराबाद संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरण भाग २

हैदराबाद संस्थानात पाच दिशांनी लष्कर शिरले. वायव्येला औरंगाबादकडून, पश्चिमेला सोलापूरकडून, ईशान्येला आदिलाबादकडून, दक्षिणेला कर्नुलकडून तर आग्नेयेला विजयवाड्याकडून लष्कराने संस्थानी हद्दीत प्रवेश केला.वेगवेगळ्या विभागांसाठी दलप्रमुख होते. सोलापूरहून शिरलेल्या तुकड्यांचे नेतृत्व मेजर जनरल चौधरी यांच्याकडे होते तर औरंगाबादच्या बाजूने शिरलेल्या तुकड्यांचे नेतृत्व मेजर जनरल डी.एस. बार यांच्याकडे होते


https://epaper.mahamtb.com/article.php?mid=Mpage_2023-09-17_5b3676134ffac9ec686ce874c8a6fa8965062d0517d49&JSON 

लढाई दिवस 1-१३ सप्टेंबर, १९४८

पहाटे 4 वाजता भारतीय सैन्याने हैदराबाद राज्यात प्रवेश केला. पहिल्या तासातच तुळजापूर सर झाले.

पहिली लढाई सोलापूर सिकंदराबाद महामार्गावरील नळदुर्ग किल्ल्यावर निझामाची 1ली हैदराबाद इन्फंट्री आणि भारतीय सैन्याची आक्रमण करणारी 7 वी ब्रिगेड यांच्यात झाली.

वेग आणि आश्चर्याचा(speed and surprize) वापर करून, 7 व्या इन्फंट्री ब्रिगेडने बोरी नदीवरील एक महत्त्वाचा पुलावर ताबा मिळवण्यात यश मिळवले, त्यानंतर दुसऱ्या शीख बटालियनने नळदुर्ग येथील हैदराबादी पोझिशन्सवर हल्ला केला.

बोरी नदी वरिल पूल आणि रस्ता सुरक्षित झाला 1ल्या आर्मर्ड ब्रिगेडचा एक आर्मर्ड कॉलम - स्मॅश फोर्सचा एक भाग - नळदुर्गपासून 8 किमी अंतरावर असलेल्या जलकोट शहरात 0900 वाजता पोहचला, ज्यामुळे 9 डोगराचे  कमांडंट लेफ्टनंट कर्नल रामसिंग यांच्या नेतृत्वाखाली स्ट्राइक फोर्सच्या तुकड्यांसाठी मार्ग मोकळा झाला.

1515 वाजता हैदराबादच्या आत 61 किमी अंतरावर असलेल्या उमरगा शहरात हा चिलखती आर्मर्ड कॉलम पोहोचला, जिथे त्याने शहराचे रक्षण करणाऱ्या रझाकार युनिट्सच्या प्रतिकारावर मात केली.

दरम्यान, थर्ड कॅव्हेलरीची एका तुकडी  , 18 व्या किंग एडवर्डच्या  कॅव्हेलरीची एक तुकडी, 9 पॅरा फील्ड रेजिमेंटची एक तुकडी, 10 फील्ड कंपनी इंजिनियर्स, 3/2 पंजाब रेजिमेंट, 2/1 गुरखा रायफल्स, 1 मेवाड इन्फंट्री यांनी नळदुर्गच्या उत्तर-पश्चिमेस सुमारे 34 किमी अंतरावर असलेल्या तुळजापूर शहरावर सहायक तुकड्यांबरोबर हल्ला केला.

ते पहाटे तुळजापूरला पोहोचले, जिथे त्यांना निझामाच्या पहिल्या हैदराबाद इन्फंट्रीच्या तुकडीचा आणि सुमारे 200 रझाकारांचा प्रतिकार झाला, ज्यांनी आत्मसमर्पण करण्यापूर्वी दोन तास लढा दिला. नदीला मोठा पूर आल्याने ती पार करणे शक्य नव्हते म्हणून लोहारा शहराकडे जाणारी पुढील वाटचाल रखडली .

नळदुर्गला जोरदार प्रतिकार झाला. तेथील पूल निजामी सैन्याने उडवून देण्यापूर्वीच भारतीय लष्कराने कब्जात घेतला. सेनेने औरंगाबादच्या बाजूला जालना रस्त्याने मुसंडी मारली. परभणी जिल्ह्यात कन्हेरगाव जिंकले. कर्नुल विभागात तुंगभद्रेवरील महत्त्वाचा पूल ताब्यात आला. आदिलाबाद भागात बल्लारशहाचा पूलही ताब्यात आला.

पूर्वेकडील आघाडीच्या सैन्याला लेफ्टनंट जनरल .. रुद्र यांच्या नेत्रुत्वा खाली हैदराबाद स्टेट फोर्सच्या दोन बख्तरबंद कारच्या तुकड्यांकडून तीव्र प्रतिकार झाला. हंबर आर्मर्ड गाड्या आणि स्टॅघ हाऊंड्स, म्हणजे 2 रा आणि 4 हैदराबाद लान्सर्स,  सुसज्ज होते  परंतु 0830 तासांनी कोडार शहरात पोहोचण्यात भारतिय सैन्य यशस्वी झाले. तीव्र लढाईचा सामना करत, दुपारपर्यंत फौज मुनागाला पोहोचली.

हॉसपेटमध्ये दोन लढाया लढल्या गेल्या - जिथे 1 लान्सर्स म्हैसूरने रझाकार आणि पठाणांच्या युनिट्सपासून साखर कारखाना हल्ला करून त्यावर ताबा मिळवला आणि तुंगभद्र येथे - जिथे 5/5 गुरख्यांनी हल्ला केला आणि हैदराबादी सैन्याकडून एक महत्त्वाचा पूलावर ताबा मिळवला.

वरंगळ बीदरच्या विमानतळांवर बाँबफेक केली. भारतीय सैन्याने हैदराबाद संस्थानाला 13 सप्टेंबर रोजी चहूबाजूंनी घेरले. आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गजवळच्या लष्करीदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा पुलावर आणि दौलताबादनजीक महत्त्वपूर्ण लष्करी हालचाली लष्कराने केल्या आणि रझाकारी टोळ्यांचे डावपेच निष्फळ ठरवले.

पश्चिम आघाडीवरील पहिल्या दिवसाचा शेवट भारतीयांनी हैद्राबादी फ़ौझांना मोठ्या प्रमाणात घातपात करून आणि मोठा भूभाग काबीज करून केला. पकडलेल्या निजामी सैन्य, रझाकार आणि भाडोत्री सैनिकांमध्ये  एक ब्रिटीश भाडोत्री(mercenery) होता, ज्याला नळदुर्गजवळील पूल उडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

 

लढाई दिवस 2 -१४ सप्टेंबर

उमरगा येथे तळ ठोकलेले सैन्य 48 किमी पूर्वेला राजेश्वर शहराकडे निघाले. हवाई टेहाळणीत वाटेत निझामी सैन्याच्या अॅम्बुश पोझिशन्स दिसल्या, त्यामुळे टेम्पेस्टच्या स्क्वॉड्रनकडून त्यांच्यावर हवाई हल्ले केले गेले. या हवाई हल्ल्यांमुळे मार्ग मोकळा झाला आणि दुपारपर्यंत भूदलाला राजेश्वरपर्यंत पोहोचण्यास आणि रस्ते सुरक्षित करण्यास मदत मिळाली.

यादरम्यान पूर्वेकडील आक्रमण रणगाडाविरोधी खंदकाने मंदावले. नंतर सूर्यपेटपासून 6 किमी अंतरावर 1ल्या लान्सर्स आणि 5व्या इन्फंट्री वर टेकडी पोझिशनमधून जोरदार गोळीबार करण्यात आला. 2/5 गुरखा या बर्मा मोहिमेतील दिग्गजांनी - या पोझिशन्सवर हल्ला केला आणि निझामी सैनिकांची गंभीर जीवितहानी झाल्याने त्यांचा पराभव झाला.

त्याच वेळी, 3/11 गुरखा रायफल्स आणि 8 व्या कॅव्हेलरीने उस्मानाबादवर हल्ला केला आणि रझाकारांशी जोरदार लढाईनंतर हे शहर ताब्यात घेतले.

मेजर जनरल डी.एस.ब्रार यांच्या नेतृत्वाखालील फौजेला औरंगाबाद शहर काबीज करण्याचे काम सोपवण्यात आले. इन्फंट्री आणि कॅव्हेलरीच्या सहा कंपन्यांनी शहरावर हल्ला केला, परिणामी नागरी प्रशासन दुपारी भारतीयांना शरण आले.

जालन्यात लढाया झाल्या, ज्यात 3 शीख, 2 जोधपूर इन्फंट्रीची एक कंपनी आणि 18 कॅव्हेलरीच्या काही रणगाड्यांना हैदराबादी सैन्याच्या कठोर प्रतिकाराचा सामना करावा लागला.

१४ सप्टेंबरला दौलताबाद मुक्त केले. जालनाही मुक्त केले. सोलापूरकडून शिरलेल्या तुकड्या सिकंदराबादच्या अर्ध्या वाटेवर पोहोचल्या. उस्मानाबाद येरमाळाही ताब्यात आले. विजयवाड्याच्या फौजा सिकंदराबादपासून साठ मैलांवर पोहोचल्या. याच दिवशी कर्नुल येथील रझाकारांचा प्रतिकारही मोडून काढण्यात आला वरंगळ आणि बीदरच्या विमानतळांवर पुन्हा हल्ला करण्यात आला.

 

लढाई दिवस 3 -१५ सप्टेंबर

जालना शहर ताब्यात घेण्यासाठी 3/11 गुरख्यांची एक कंपनी सोडून, ​​उर्वरित सैन्य लातूर आणि नंतर मोमिनाबाद येथे हलवले गेले, जेथे त्यांनी निझामी सैन्याच्या 3 गोलकोंडा लान्सर्सवर कारवाई झाली, ज्यांनी आत्मसमर्पण केले.

सुर्रियापेट शहरात, हवाई हल्ल्याने हैदराबादी/निझामी संरक्षणाचा बहुतांश भाग साफ केला, तरीही काही रझाकार युनिट्सने शहरावर कब्जा केलेल्या 2/5 गुरख्यांचा प्रतिकार केला. माघार घेणाऱ्या हैदराबादी सैन्याने भारतीय सैन्याला उशीर करण्यासाठी मुसी येथील पूल उद्ध्वस्त केला परंतु कव्हरिंग फायर देण्यात ते अयशस्वी ठरले, ज्यामुळे पुलाची त्वरीत दुरुस्ती होऊ शकली. नरकटपल्ली येथे दुसरी लढाइ झाली जिथे भारतीय सैन्याने एका रझाकार युनिटचा नाश केला.

१५ सप्टेंबरला औरंगाबादवरील चढाई फत्ते झाली. हुमनाबाद पडले. शहागडच्या पुलावर कब्जा झाला. जनरल चौधरींचे सैन्य सिकंदराबादला पोहोच्ले.

 


1 comment:

  1. Truly a very informative article Sir. So nicely explained and in short. Most of the Indians today are not aware of what exactly happened during Hyderabad Mukti Sangram and how important it was. It was not less than a war between two nations, as Hyderabad province was bigger in size than even the countries like France. Thank you for the article.
    Jai Hind 🫡
    Sudarshan

    ReplyDelete