मुंबई महापालिकेवर टिका करणाऱ्या समर्पीत !
बृहमुंबई महानगर पालिकेतील एका अतिशय
जबाबदार व निस्वार्थी वरिष्ठ अभियंत्याचे मत व नागरिकांना विनंती. बेजबाबदार
नागरिक भावना
आपण टीव्हीवर बातम्या मध्ये पाहतोय की
मीडियाने महापालिकेच्या अपयश मिळाल्याबद्दल बाऊ केला आहे. *कबूल आहे की अनेक
शहरामध्ये पावसाचे पाणी तुंबू नये म्हणून पूर्व नियोजनाचा अभाव होता यात अनेक
महापालिका अपयशी ठरल्यात* . पण, एक सुजाण नागरिकाच्या भावनेतून वैयक्तिक
स्तरावर *तुम्ही* नाही का अपयशी ठरलात ?
*तुम्ही*
खाद्य पदार्थांचे वेष्टन्न, प्लास्टिक प्लेट्स आणि चमचे *ट्रेनच्या
खिडकीतून बाहेर फेकून देता* जे नष्ट होत नाही व रेल्वे ट्रॅकच्या ड्रेनेज मध्ये
अडकून राहते ज्यामुळे ट्रॅकवर पाणी साठते व
ट्रेन बंद होतात.
दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
*तुम्ही*
तुमचे वापरलेले सॅनिटरी पॅड व प्लास्टिक वस्तू कचरा कुंडीत न टाकता थेट टॉयलेटच्या
ड्रेन मधून फ्लश करून देता ज्यामुळे सिवेज पाईपलाईन ब्लॉक होते.
दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
*तुम्ही*
तुमच्या गाड्या रस्त्यावर अशा ठिकाणी पार्क करता की जिथून पालिकांच्या ट्रकला
ड्रेनेज सफाई करता येता येत नाही. दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
*तुम्ही*
तुमच्या घरातील कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा या मध्ये वर्गीकरण करत नाही व
तुम्ही अथवा तुमचा सफाई कामगार तो कचरा एकत्रितरित्या बेजबाबदारपणे रस्त्यावर
टाकतो व तो कचरा पावसात विखुरला जातो. दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
*तुम्ही*
खरेदीसाठी मार्केटमध्ये जाताना पुनर्वापर करण्यायोग्य कापडी पिशवी नेत नाही
जेणेकरून प्लास्टिक मुक्त समाज निर्माण होईल,
आणि भाजीवाल्यासोबत आणखी एका कॅरीबॅग
साठी वाद घालता.
दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
घरातून बाहेर पडताना पुनर्वापर करण्यायोग्य
पाण्याची बाटली सोबत न नेता प्रत्येक वेळी जेव्हा मिनरल वॉटरची बाटली खरेदी करता
तेव्हा प्लास्टिक कचरा वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावता.
दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
महापालिका *घनकचरा ( आरोग्य ) विभागाचे
कामगार सर्व कचरा गोळा करण्याचे काम करतो, तोच नाल्यात ,गटारात उतरतो आणि स्वच्छ
करतो.सार्वजनिक संडास , मलनिःसारण नळीका , मोठे हॉस्पिटल मध्ये आजारी रूग्णांची घाण साफ
करणे,पालिकांचे कामगार हे सतत मोठमोठ्या रोगराईचा
सामना करून परिसरातील नागरिकांचे आरोग्य संभाळत असतो, ह्या
कामगाराचे आयुष्य फक्त ४०ते ५०वर्षे असते,*
त्याला घाणीचे काम करताना दारूचा आधार
घ्यावा लागतो.त्याशिवाय घाणीत काम करु शकणार नाही.
सर्वच सुशिक्षित नागरिकांना विचारतो
की, जर साधं कचर्याची गाडी बाजूंनी गेली तरी नाकाचे केस जळतात, *ज्याप्रकारे
सीमेवर असलेल्या सैनिक शत्रूचा शिरकाव आपल्या सीमेत येऊ देत नाही आणि नागरिकांचे
रक्षण करतो त्याच प्रमाणे पालिकेचे कामगार नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करतो.
*घाणीत
रोज मरणारा कामगार दिसत नाही.... त्याला मरताना सर्टिफिकेट मिळते "बेवडा मेला
" हेच त्यांचे "परमवीर चक्र"असते.*
आपणही आत्मपरिक्षण करावे...... उठसुट
महापालिकेवर बोटे दाखवू नये , *आपणं सुध्दा या सुंदर शहराची काळजी घ्यावी...
कारण कचरा निर्माण करून यास जबाबदार आपणच आहोत....*
ही नम्र विनंती.........
बदलाची सुरुवात होते ती
*तुमच्यापासून
सुरवात करा*
*आधी
एक जबाबदार नागरिक बना.*
No comments:
Post a Comment