Total Pageviews

Saturday, 6 July 2019

ज्ञानदीप उजळविणारा फौजी-महा एमटीबी 05-Jul-2019- तेजस परब



आपले संपूर्ण आयुष्य लष्करात सीमेवर लढून देशसेवेसाठी अर्पण केल्यानंतर निवृत्तीनंतरही समाजकार्याद्वारे माजी सैनिक कृष्णा बसवत यांनी त्यांच्या परिसरातील 120 वनवासी मुलांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंध:कार दूर केला आहे. त्यांच्या कार्यामुळे आठवीनंतर शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना पुढे शिकण्यासाठी एक प्रेरणा दिली आहे. निवृत्तीनंतर आपला वेळ समाजकार्यात घालवावायासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने वनवासी पाड्यांवर जाऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणलेपालघरच्या डहाणू तालुक्यातील वनई चंद्रनगर भागात राहणारे कृष्णा बसवत हे 1988 मध्ये सैन्यात भरती झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी जम्मू-काश्मीर, रांची, अरुणाचल प्रदेेश, बंगळुरू आदी भागांमध्ये कर्तव्य बजावले होते. या काळात त्यांनी आपली कौटुंबिक जबाबदारीही व्यवस्थितपणे पार पाडली. त्यांनी याच गावात राहून आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले. सुट्टीच्या वेळी जेव्हा ते आपल्या गावाकडे येतत्यावेळी त्यांना परिसरातील वनवासी पाड्यावरील मुलांची शिक्षणाची समस्या कळलीआठवीनंतर या वनवासीबहुल भागांतील मुले शिक्षणापासून दूर जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्रत्यातही अनेक मुले वीटभट्टी, कारखाने, एमआयडीसी, शेती आदी कामांमध्ये व्यस्त होत असल्याचेही समजले.

वह्या-पुस्तकांमध्ये रमण्याचा काळ असताना त्या कोवळ्या हाताना दिवसभर राबावे लागत असल्याची सल बसवत यांच्या मनात कायम होतीत्यांनी याबद्दल काहीतरी करण्याचा निर्धार मनात पक्का केला होता. मात्रकर्तव्यामुळे या कामाला वेळ देणे शक्य होत नव्हते. 2008 मध्ये निवृत्तीनंतर त्यांनी आपले सहकारी मधू चौधरी, देवेंद्र सनवार, विजय घुटे, काशिनाथ जाधवभास्कर कोठारी आदी सहकाऱ्यांना सोबत घेतलेबसवत आणि सहकाऱ्यांचा या वनवासी पाड्यांवर आदर असल्याने पालकांनीही सकारात्मक भूमिका घेतली. आपले मूल शाळेत गेले तर त्याचा एकवेळचा जेवणाचा खर्चही भागेल, हे कळल्याने पालकांनीही संमती दिली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर शिष्यवृत्तीही मिळवण्यास सुरुवात केली. वही-पेन, दप्तर, गणवेश आणि अन्य साहित्य मिळू लागल्याने मुलेही पुन्हा शाळेकडे वळली. दरम्यानपहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांनाही शालोपयोगी साहित्याची मदत सुरूच होतीत्याचबरोबर अन्य आवश्यक वस्तूही मिळू लागल्याने विद्यार्थ्यांनीही अभ्यासात रस दाखवला. वीटभट्टी, शेतमजुरी यापासून मुले परावृत्त झाली आणि शिकू लागली. आता वेगळ्या नववी आणि दहावीसाठी वर्गशिक्षक नेमण्यासाठीही शाळा प्रशासनाकडे मागणी केली. त्यांच्या मागणीची आणि कार्याची दखल घेत, शाळेनेही दोन शिक्षकांची यावर्षीपासून नेमणूक केली आहे.

या मुलांना एका छताखाली आणत त्यांना शाळेत येण्याची सवय त्यांनी लावलीबसवत यांची कन्या कविता हिने बी.एस्सी, बी.एडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्रकोणत्याही परताव्याची अपेक्षा न करता या मुलांना शिकवण्याचा वसा तिने वडिलांच्या प्रेरणेने घेतला. बसवत कुटुंबीयांनीही त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. त्यांच्या पत्नीसह मुलांनी वडिलांच्या सेवाकार्यात हातभार लावला. वडिलांच्या अनुपस्थितीत ग्रामस्थांच्या समस्या, त्यांना लागणारी मदत करण्यासाठी बसवत कुटुंबीयही पुढे येतात. गावातील रुग्णांवर उपचारत्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी स्वतः कृष्णा बसवत आणि त्यांचे सहकारी तत्पर असतात. वनवासी भाग असल्याने अनेकदा आजारी पडल्यावर नेमके काय करावेरुग्णाला रुग्णालयात दाखल कसे करावे आदी समस्या येथील नागरिकांसमोर आहेत. त्या सोडवण्याचे कामही बसवत करत असतात. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी साऱ्यांचा विश्वास जिंकलेला आहे.

बसवत आणि सहकाऱ्यांनी आता काही सामाजिक संस्थांना या मुलांसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहेत्यापैकीच एक असलेल्यास्पंदन फाऊंडेशनतर्फे एक पेन एक वहीयोजनाही सुरू केली आहे. या मुलांना आर्थिक हातभार मिळावायासाठी आपापल्या परिने मदत करावी, असे आवाहन स्पंदन फाऊंडेशनच्या प्रमोद मोहिते केली असून एक वही, एक पेनया उपक्रमाच्या माहितीसाठी 91-9619037586 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. समाजकार्य करत असताना त्यांनाही असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे खर्चिक होते. बसवत आणि त्यांचे सहकारी महिन्याकाठी काही रक्कम साठवत असतात. त्यातून हा खर्च भागवण्याची कसरत सुरू असते. अशा तर्‍हेने अवघे जीवन देशासाठी अर्पण करणाऱ्या या अवलियाला सलाम...

No comments:

Post a Comment