Total Pageviews

Saturday 19 March 2016

http://zeenews.india.com/marathi/news/bloggers-park/ins-arihant-submarine-an-important-milestone-for-indian-navy/306215


ब्रिगेडीअर हेमंत महाजन - भारतीय नौदलात आयएनएस अरिहंत ही अत्याधुनिक पाणबुडी येत्या काही दिवसांत सामील होण्याची बातमी भारतीयांना नक्कीच सुखावून जाणारी आहे. ज्या देशांजवळ जास्त पाणबुड्या त्या देशांची नौदलाची शक्ती अधिक, असे समीकरण आहे. पाणबुडी हे पाण्याखालचे जहाज असून, त्या क्षेत्रात भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. ६०० टन वजन, ३५०० किलोमीटर रेंज, पाण्याच्या खालून कोणत्याही विमानाचा वेध घेण्याची क्षमता, के-१५, बीओ-५ शॉर्ट रेंज मिसाईलने ७०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता, के-४ बॅलिस्टिक मिसाईलने युक्त आणि समुद्राच्या तळाखालून अण्वस्त्र डागण्याची शक्ती ही आहेत भारताच्या नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज असलेल्या पहिली अण्वस्त्रसज्ज पाणबुडी ‘आयएनएस-अरिहंत’ची ही काही वैशिष्ट्ये आहे. जागतिक शक्तींच्या नजरेपासून अरिहंतला आजवर दूरच ठेवण्यात आले.

No comments:

Post a Comment