Total Pageviews

Saturday, 28 March 2015

WORLD NO 1 SAINA NEHWAL HEARTIEST CONGRATS

सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये जागतिक स्तरावर पहिले रँकिंग प्राप्त केले असून या स्थानावर हक्क सांगणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. आत्तापर्यंत चिनी खेळाडूंची असलेली मक्तेदारी सायनाने मोडली असून इंडिया ओपन ही टूर्नामेंट सुरू असतानाच सायनाने पहिले स्थान मिळवले आहे. शनिवारी इंडिया ओपनमध्ये राशनोक इंटानोनने ऑल इंग्लंड बॅडमिंटन चँपियन कॅरोलिना मरिनला हरवले आणि ती पहिल्या स्थानावरून घसरली आणि सायनाने पहिलं स्थान पटकावलं. सायनाने या टूर्नामेंटमध्ये इंडोनेशियाच्या हना रमाधिनीचा २१-१५, २१-१२ असा पराभव करत शुक्रवारी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सायनाने मारली अंतिम फेरीत धडक शनिवारी सायना नेहवालने जपानच्या युई हाशिमोटोचा सेमी फायनलमध्ये २१ - १५, २१ - ११ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर सायना आहे तर युई सीडेड खेळाडू नसून तिची क्रमावीर ३७ आहे. अनुभवी सायनाने सहजरीत्या युईला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला असून आता तिची गाठ राशनोक इंटानोनशी पडणार आहे. भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिने आज इतिहास रचला. इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये स्पेनची कॅरोलीन मरिन हिचा पराभव झाल्याने जागतिक क्रमवारीत उलटफेर होऊन सायनाने वर्ल्ड नंबर वन होण्याचा मान पटकावला आहे. बॅडमिंटनच्या इतिहासात अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. दरम्यान, सेमीफायनलमध्ये सायनाने जपानच्या यु हाशिमोटोवर २१-१५, २१-११ अशी मात करत फायनलमध्ये धडक दिल्याने तिच्या पॉइंट्समध्ये अधिकच भर पडणार आहे. महिला एकेरीची जागतिक क्रमवारी पुढच्या आठवड्यात जाहीर होणार असून त्यावेळीच सायनाच्या वर्ल्ड नंबर वनवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणार आहे. विशेष म्हणजे सध्या पहिल्या स्थानी असलेली चीनची ली ज्युरेई हिने इंडियन ओपन स्पर्धेत भाग घेतलेला नाही. त्यामुळे सध्या तिच्या नावावर असलेल्या ७९ हजार २१४ पॉइंट्समध्ये घसरण होऊन ते ७१ हजार ४१४ होणार आहेत. सायना सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असून तिच्या नावावर ७४ हजार ३८१ पॉइंट्स आहेत. त्यामुळेच सायनाच्या नंबर वनची केवळ औपचारिकताच आता उरली आहे. २ एप्रिल रोजी जागतिक बॅडमिंटन महासंघ जागतिक क्रमवारी जाहीर करणार आहे. दरम्यान, याआधी भारतीय बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोण यांनी पुरुष एकेरीत पहिले स्थान पटकावण्याचा पराक्रम केलेला आहे. मात्र एखाद्या भारतीय महिला बॅडमिंटनपटूने अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

No comments:

Post a Comment