SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Tuesday, 10 March 2015
जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे पाकिस्तानच्या सल्ल्याने कारभार करीत आहेत -मशरत आलमसारख्या अतिरेक्याची सुटका करणे हे एकप्रकारे दहशतवाद्यांना मदत करण्यासारखे आहे.
मशरत आलमसारख्या अतिरेक्याची सुटका करणे हे एकप्रकारे दहशतवाद्यांना मदत करण्यासारखे आहे. त्याबद्दल मुफ्ती मोहम्मद सईद यांनाच अटक करून त्यांच्यावर खटला भरायला हवा. दिल्लीत बसून आमच्या देशातील फुटीरतावाद्यांना भेटता म्हणून पाकिस्तानी राजदूताच्या पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून दिले पाहिजे, पण एवढी हिंमत आपल्यात आहे काय?
प्रश्न हिमतीचाच आहे!
जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे पाकिस्तानच्या सल्ल्याने कारभार करीत आहेत व हिंदुस्थानला पहिल्या दिवसापासून संकटात ढकलीत आहेत. खतरनाक अतिरेकी मशरत आलमची सुटका करण्याचे प्रकरण ताजे असतानाच नवी दिल्लीत हिंदुस्थानच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार घडला आहे व त्यामागील प्रेरणा नक्कीच मुफ्ती मोहम्मद सईद यांचीच असू शकते. फुटीरतावादी हुरियत संघटनेचे पुढारी सय्यद अली शाह गिलानी यांनी दिल्लीत येऊन पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांची भेट घेतली व जम्मू-कश्मीरमधील राजकीय परिस्थितीबाबत म्हणे सविस्तर चर्चा केली. हे सर्व पुन्हा अचानक सुरू झाले व कश्मीरात मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासारखा ‘गॉड फादर’ मिळाल्याने फुटीरतावाद्यांना बळ चढले आहे. गिलानी हे पाकिस्तानी राजदूतांना भेटले व बाहेर येऊन म्हणाले, ‘फुटीरतावादी मशरत आलमविरुद्धचे सर्व आरोप चुकीचे आहेत!’’ गिलानी महाशय असेही म्हणाले की, ‘‘कश्मीरप्रश्नी पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची असल्याने पाकिस्तानी नेते व अधिकार्यांशी बोलणे गरजेचे आहे!’’ गिलानी यांनी सरळ सरळ कश्मीर खोर्यांतील हिंदुस्थानच्या अस्तित्वालाच आव्हान दिल्याने आम्हाला चिंता वाटत आहे. कश्मीरात ज्या मनोवृत्तीचे सरकार भाजपच्या पाठिंब्यावर आले आहे त्यामुळे प्रश्न मिटण्याऐवजी चिघळण्याचीच भीती जास्त आहे. मशरत आलम तुरुंगातून सुटताच जे काही बरळला त्यावरूनही भविष्यातील धोक्याची कल्पना येऊ शकते. तो म्हणाला की, ‘‘छोट्या तुरुंगातून मोठ्या तुरुंगात आलो. मला काय फरक पडतोय?’’ म्हणजे जम्मू-कश्मीर हे पारतंत्र्यात असून तेथे राहणे हे तुरुंगात असल्यासारखेच फुटीरतावाद्यांना वाटत आहे. अशी विखारी मुक्ताफळे उधळणार्या अतिरेक्यांच्या पाठीशी कश्मीरचे मुख्यमंत्री ‘बापा’सारखे उभे राहतात यास काय म्हणावे? कश्मीरमध्ये हे जे चालले आहे ते देशहिताचे नाही इतकेच आम्ही सांगू शकतो. सगळे काही करा, पण देश खड्ड्यात जाईल असे काही करू नका. त्या पापाचे मायबाप होऊ नका. अर्थात सत्तेपुढे अनेकदा शहाणपण चालत नाही, तसे सत्तेपुढे राष्ट्रभक्ती व देशाभिमान चालत नाही, असे जम्मू-कश्मीरातील चित्र आहे. मशरत आलमसारख्या अतिरेक्याची सुटका करणे हे एकप्रकारे दहशतवाद्यांना मदत करण्यासारखे आहे. त्याबद्दल मुफ्ती मोहम्मद सईद यांनाच अटक करून त्यांच्यावर खटला भरायला हवा. दिल्लीत बसून आमच्या देशातील फुटीरतावाद्यांना भेटता, त्यांना लढत राहण्याचे सल्ले देता, म्हणून पाकिस्तानी राजदूताच्या पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून दिले पाहिजे, पण एवढी हिंमत आपल्यात आहे काय?
धुळ्यातील अफझलखान!
अफझलखान वधामुळे नक्की कुणाच्या भावना दुखावल्या जातात, हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. शिवजयंतीनिमित्त धुळ्यात निघालेल्या मिरवणुकीत अफझलखान वधाचा देखावा मांडल्याने शिवसेना शहरप्रमुख सतीश महाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा देखावा म्हणे वादग्रस्त आहे. तसेच धार्मिक भावना दुखावणारा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. भावना नक्की कुणाच्या दुखावल्या याचा खुलासा पोलिसांनी करायला हवा, की पोलीसच कारण नसताना बाटग्याच्या भूमिकेत वावरत आहेत? अफझलखान वध हा शिवचरित्रातील तेजस्वी धडा आहे. स्वराज्यावर चाल करून येणार्या दुश्मनांचा कोथळा नाही काढायचा तर मग काय त्यास बिर्याणी खायला घालायची? की कश्मीरातील मशरत आलमप्रमाणे सुटका करून उदो उदो करायचा? शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले व त्यांनी पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्यासाठी अशा अनेक अफझलखान व औरंगजेबांना त्यांनी याच महाराष्ट्रात दफन केले. अफझलखान हा मुसलमान होता म्हणून त्याचा महाराजांनी वध केला नाही, तर तो स्वराज्याचा शत्रू होता म्हणून त्याला मारले हा इतिहास आहे व अफझलखानास मारले व त्याचे देखावे लावले म्हणून कुणाच्या भावना दुखावल्याची बोंब असेल तर त्यांच्या रक्तात दोष आहे! पण धुळ्याच्या पोलिसांचे रक्त का नासले? हे राज्याच्या गृहमंत्र्यांना तपासावे लागेल. महाराष्ट्राच्या पोलिसांनी तरी अफझलखानाच्या प्रेमात पडून शिवप्रेमींना गुन्हेगार ठरवू नये. हे राज्य शिवरायांचेच आहे व महाराष्ट्रात शिवसेना जागती आहे, याचे भान ठेवा म्हणजे झाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment