Total Pageviews

Monday 2 March 2015

मुफ्ती मोहम्मद सईद -काश्मीरमध्ये पीडीपी, भाजप सत्तेत येणे एक ऐतिहासिक संधी:मात्र पुढचा काळ अत्यंत कसोटीचा

मुफ्ती मोहम्मद सईद यांचे वादग्रस्त वक्तव्य जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काही वेळातच मुफ्ती मोहम्मद सईद यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. पाकिस्तान, अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांनी राज्यात पोषक वातावरण तयार केल्यामुळेच विधानसभेची निवडणूक शांततेत पार पाडणे शक्य झाले. यामुळे सीमेपलीकडील लोकांसोबतच हुर्रियत आणि अतिरेक्यांना याचे श्रेय द्यायलाच हवे. सईद म्हणाले की, मी आज हे जाहीरपणे सांगत आहे. की राज्यातील लोकशाही प्रक्रिया पूर्ण होण्यास त्यांनी सहकार्य केले. अतिरेक्यांनी जर मोठा रक्तपात केला असता, तर इतक्या शांततेत निवडणुका घेणे शक्य झाले नसते. फुटीरवाद्यांना शांततापूर्ण निवडणुकीचे श्रेय देणाऱ्या सईद यांच्या वक्तव्याबाबत वादात सहभागी होणे भाजपने टाळले. निवडणुकीच्या काळात शांतता प्रस्थापित करताना आपल्या प्राणांची बाजी लावणार्या सुरक्षा जवानांचे यात योगदान आहे.निवडणूक आयोग, सुरक्षा संस्था आणि भारतीय घटनेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वामुळे काश्मिरातील निवडणुका शांततेत झाल्या, अशी प्रतिक्रिया भाजपनी दिली.त्यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व कॉंगे्रस पक्षानेही प्रखर टीका केली आहे. पीडीपी आणि भाजप एकत्र येणे आणि भाजपला काश्मीरमध्ये सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळणे ही अत्यंत ऐतिहासिक आहे. निवडणुकीच्या निमित्ताने काश्मिर खोर्यात श्रीनगरसारख्या ठिकाणीही भाजपला प्रचार करता आला, स्वतःच्या जिवाची जोखीम उचलणार्यार स्थानिक उमेदवारांची, कार्यकर्त्यांची साथ मिळाली, खोर्याभमध्ये उमेदवार उभे करता आले हीही मोठीच गोष्ट होती. जम्मू-काश्मिरातील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) चे अध्यक्ष मुफ्ती महंमद सईद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परस्परांना स्नेहभराने आलिंगन देऊन द्विपक्षीय समझोत्यावर शिक्कामोर्तब करतील, असे दोन वर्षापूर्वी कुणी म्हटले असते तर त्यावर विश्वास बसला नसता.

No comments:

Post a Comment