Total Pageviews

Wednesday, 1 January 2014

ATROCITIS AGAINST HINDUS

मडगाव स्फोट प्रकरणातून ‘सनातन’चे साधक शेवटी निर्दोष सुटले, पण त्याआधी ‘सनातन’ला मोठ्याच अग्निदिव्यातून जावे लागले. अर्थात असे अग्निदिव्य हिंदूंच्या पाचवीलाच पुजलेले आहे, पण जे राजकीय पुढारी, जे पोलीस अधिकारी निर्दोष हिंदूंना अतिरेकी ठरवून त्यांचा छळ करतील त्या सगळ्यांचे तळपट झाल्याशिवाय राहणार नाही. ‘सनातन’ निर्दोष! अग्निदिव्य हिंदूंच्या पाचवीलाच पुजले आहे! आमच्याच हिंदुस्थानात हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे, पण या सर्व कटकारस्थानांना हिंदू संघटनांचे कार्यकर्ते पुरून उरतात. कुठे काहीही खट्ट झाले की, त्यामागे हिंदू संघटनांचाच हात असल्याची लोणकढी थाप आधी ठोकली जाते आणि नंतर ती ‘थाप’ खरी ठरविण्यासाठी सरकारी यंत्रणा कामास लागते. मग तो मडगावचा बॉम्बस्फोट असेल नाही तर मालेगाव स्फोटाचे प्रकरण. गोव्यातील मडगाव शहरात झालेल्या बॉम्बस्फोटातून ‘सनातन’च्या सहा कार्यकर्त्यांची आता निर्दोष मुक्तता झाली आहे. पणजी येथील विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तपास यंत्रणांवरच ताशेरे ओढले. सनातनच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना या सर्व प्रकरणात गोवण्यात आले. ‘सनातन’ला बदनाम केले. ही बदनामी इतकी परकोटीची होती की, सनातनचे साधक हे जणू त्यांच्या आश्रमातून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत आहेत, तेथे हिंदू माथेफिरू व अतिरेकी घडविण्याचा कारखानाच उघडला आहे असा लोकांचा गैरसमज व्हावा. त्यामुळे ‘सनातन’वर बंदीच घालावी, अशी शिफारस महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने केंद्राकडे केली. हा सरळ सरळ अन्याय आहे व मुस्लिमांना बरे वाटावे व स्वत:ची बेगडी निधर्मी सुंता धर्मांध मुसलमानांच्या डोळ्यात भरावी यासाठीच केलेला बनाव आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात ‘मुस्लिम निर्दोष तरुण अडकले’ म्हणून सरकारी पातळीवर जेवढे अश्रू ढाळले गेले व त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने जे अथक परिश्रम घेतले त्याच्या गुंजभरही प्रयत्न निर्दोष हिंदू तरुणांच्या सुटकेबाबत झाले नाहीत. खोट्या स्फोट प्रकरणात हिंदू पोरांना अडकवायचे, हिंदू दहशतवादी म्हणून त्यांची देशभर धिंड काढायची आणि मुसलमानांच्या मेळाव्यात गुडघे टेकून सांगायचे, ‘‘पहा, आम्ही हिंदूंनाही अडकवले आहे. हिंदू पुढारी मुसलमानांना दहशतवादी म्हणतात ना? मग आमच्या निधर्मी सरकारने हिंदूंना दहशतवादी ठरवून त्यांना आत टाकले आहे!’’ यालाच तुम्ही ‘निधर्मी’पणा म्हणणार असाल तर उद्या हिंदू समाजातही एखादा माथेफिरू खरोखरच निर्माण झालाच व त्याने धर्मासाठी हौतात्म्य पत्कारायचे ठरवलेच तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारी मुस्लिम लांगूलचालनाच्या धोरणाचीच असेल. हिंदू संघटना धार्मिक व सांस्कृतिक कार्य करतात. त्या काही ‘सिमी’, ‘अल कायदा’, ‘इंडियन मुजाहिदीन’प्रमाणे दहशतवादी कारवाया करीत नाहीत. मुळात आपल्याच हिंदुस्थानात ८० कोटी हिंदूंना दहशतवादी कारवाया घडवून आणण्याची गरज काय? हा देश हिंदूंचा आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. या हिंदू राष्ट्रात ज्यांना राहायचे आहे ते कोणत्याही धर्माचे असोत, त्यांनी स्वत:ची धर्मांधता बाजूला ठेवून या देशाचे नागरिक म्हणून राहावे. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करावा, पण दुर्दैवाने जे घडत आहे ते भलतेच. मुस्लिम-ख्रिश्‍चनांना जाणीवपूर्वक देशाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे ठेवले जात आहे. त्यांच्यातील धर्मांधांना मतांच्या स्वार्थासाठी कॉंग्रेस आणि इतर बेगडी धर्मनिरपेक्ष राजकारणी निधर्मीपणाच्या नावाखाली पोसत आहेत आणि हिंदूंची मात्र प्रत्येक बाबतीत मुस्कटदाबी करीत आहेत. हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात मागे ढकलण्याचा प्रयत्न निधर्मीपणाच्या नावाखाली होणार असेल तर मात्र हिंदू हा शेळपट नसून वाघाची व सिंहाची अवलाद आहे हे दाखवून द्यावेच लागेल. कोणीही उठावे व हिंदूंची यथेच्छ बदनामी करावी. हिंदूंना देशातील गुलाम किंवा दुय्यम नागरिक मानावे अशी एक फॅशनच गेल्या काही दशकात रूढ झाली आहे. पुन्हा त्या विरोधात जे आवाज उठवितात त्यांना देशाचे दुश्मन किंवा ‘हिंदू दहशतवादी’ ठरविले जात आहे. ‘सनातन’च्या बाबतीत नेमके हेच घडले आहे. मालेगाव स्फोट प्रकरणात मुस्लिमांना निर्दोष ठरवून साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय वगैरे मंडळींना कॉंग्रेसवाल्यांनी असेच अडकवून ठेवले व हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा केला. पाकिस्तानातून घुसलेल्या कसाबने मुंबईवर हल्ला केला. त्यात विसेक पोलीस अधिकारी मारले गेले. त्या पोलिसांना कसाब टोळीने मारले हे धडधडीत सत्य दिसत असतानाही त्यामागे हिंदू संघटनाच असल्याची बांग काही कॉंग्रेसवाल्यांनी ठोकलीच होती. मुळात महाराष्ट्रातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांच्या दबावाखालीच मालेगाव स्फोटांचा तपास झाला. या भरकटलेल्या तपासाचे बळी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा वगैरे ठरले. पण त्यांच्या निर्दोषत्वाचे पुरावे समोर येऊनही महाराष्ट्राचे सरकार त्यांची जामिनावर सुटका होऊ देत नाही. हा तर कसाब व अफझल गुरूपेक्षा भयंकर दहशतवाद आहे. मडगाव स्फोट प्रकरणातून ‘सनातन’चे साधक शेवटी निर्दोष सुटले, पण त्याआधी ‘सनातन’ला मोठ्याच अग्निदिव्यातून जावे लागले. पोलिसांच्या धाडी काय, चौकशांचा ससेमिरा काय, यातना काय! एक दिवस मालेगाव स्फोटातून कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञाही निर्दोष सुटतील. अर्थात असे अग्निदिव्य हिंदूंच्या पाचवीलाच पुजलेले आहे, पण जे राजकीय पुढारी, जे पोलीस अधिकारी निर्दोष हिंदूंना अतिरेकी ठरवून त्यांचा छळ करतील त्या सगळ्यांचे तळपट झाल्याशिवाय राहणार नाही. याआधीही त्याचे प्रत्यंतर आलेच आहे. ८० कोटी हिंदूंच्या साधनेत व तपस्येत ताकद आहे. हिंदू शक्तीचा उसळलेला लाव्हा दुश्मनांची राख केल्याशिवाय राहणार नाही!

No comments:

Post a Comment