Total Pageviews

Friday, 15 February 2013

HELOCOPTER SCAM ANOTHER BOFORS

आता हेलिकॉप्टर घोटाळ्यातही दलालीचे इटालियन कनेक्शन आहेच. त्याच्या चौकशीवरही शेकडो कोटी खर्च होतील, पण त्याचेही दुसरेबोफोर्स होईल.
दलालीचे इटालियन कनेक्शन
केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकार आम आदमीच्या भल्यासाठी नाही, तर त्याचा पैसा लुटण्यासाठीच सत्तेत बसले आहे. दुसर्‍यांदा सत्तेत आल्यानंतरही त्यांची ही लूट थांबलेली नाही. त्यामुळेच घोटाळा आणि भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे चव्हाट्यावर येत आहेत. आताऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीतील लाचखोरी उघड झाली आहे. सरकार आणि संरक्षण दलातील काही उच्चपदस्थांना ३६० कोटींची लाच याप्रकरणी दिल्याचा आरोप होत आहे. पुन्हा येथेही लाचखोर कंपनी इटालियनच आहे. दोन दशकांपूर्वीबोफोर्स प्रकरणाने देशातील राजकारणात उलथापालथ घडवली होती. त्या इटालियन कंपनीने ६० कोटींची दलाली हिंदुस्थानी उच्चपदस्थांना देऊन तोफांचे कंत्राट मिळविले होते. आताफिनमेकानिका या इटालियन कंपनीने १२ हेलिकॉप्टर्ससाठी ३६० कोटींची लाचखोरी केल्याचा आरोप आहे. गेल्या २० वर्षांत आपल्या देशाने भरपूर प्रगती केली. मग लाचखोरीतहीप्रगती व्हायला नको? पुन्हा सत्ताधारी कॉंग्रेसवाले आणि व्यवहार संरक्षण दलातील असेल तर लाचखोरीचीही उड्डाणेकोटीच्या कोटी हवीत. बोफोर्स व्यवहारात थेट राजीव गांधींवरच शिंतोडे उडाले होते. आता हेलिकॉप्टर बॉम्बच्या धमाक्यात
सोनिया किंवा राहुल गांधी अद्यापजखमी झालेले नाहीत, पण फेब्रुवारी २०१० मध्ये हा खरेदीचा करार केला तो सोनिया मॅडमचेअरपर्सन असलेल्या यूपीए सरकारनेच. विद्यमान संरक्षणमंत्र्यांनी भलेही सीबीआय चौकशीचे आणि लाचखोरांवर कारवाई करण्याचे बार उडविले असतील, पण या दुसर्‍या बोफोर्सच्या तपासाची गत पहिल्या बोफोर्सप्रमाणेच होणार नाही कशावरून? बोफोर्स प्रकरणाने राजकीय उलथापालथ झाली, पण मुख्य दलाल क्वात्रोचीचे काय बिघडले? सोनिया गांधींचा हा मामेभाऊ हिंदुस्थानातून सुखरूप पळून तर गेलाच, पण यूपीए सरकारनेच मध्यंतरी त्याला क्लीन चिट देत त्याची गोठवलेली बँक खातीही मोकळी करून दिली. हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातील कंपनी, त्यातीलक्वात्रोचीही इटालियनच आहेत. भले ते सोनियांचे मामेभाऊ नसतील, पण इटालियन तर आहेत! पुन्हा सरकार जरी याप्रकरणी सीबीआय चौकशीची ग्वाही देत असले तरी सीबीआय केंद्र सरकारची बटीक असल्यासारखीच अशा प्रकरणात वागते हा इतिहास आहे. मुळात हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी केंद्र सरकारने वर्षभर कारवाई का केली नाही? इटालियन कनेक्शन असल्यामुळेच सोनियांचे सरकार मूग गिळून बसले होते काय? फिनमेकानिका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिसिपी ओर्सी याला इटलीने अटक केल्यानंतरच आमच्या सत्ताधार्‍यांना जाग का आली? ओर्सी याच्या अटकेनंतर हेलिकॉप्टर घोटाळ्याचाझाकून ठेवलेला कोंबडा हिंदुस्थानातही आरवल्याशिवाय राहणार नव्हताच. म्हणूनच सीबीआय चौकशीची धूळफेक
केंद्र सरकार आता करीत आहे. टेट्रा ट्रक खरेदीमध्ये १४ कोटींची लाचखोरी झाल्याचे प्रकरण मध्यंतरी गाजले होते. त्याच्या चौकशीचे काय झाले? तो आरोप करणारे लष्करप्रमुख व्ही. के. सिंग नंतर निवृत्त झाले. आता हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात माजी हवाईदलप्रमुख एस. पी. त्यागी यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यांनी त्याचा इन्कार केला आहे. आतापर्यंत अनेक गैरव्यवहारांनी आमच्या सैन्यदलांना हादरे दिले आहेत. तरीही गैरव्यवहार तसेच त्यातील दलाली सुरू आणि त्यांच्या चौकशांचे फार्सही सुरूच अशी स्थिती आहे. बोफोर्स प्रकरण ६० कोटींचे होते. त्याच्या खटल्यावर आणि चौकशीवर २५० कोटी रुपये खर्च झाले. हा सगळा जनतेचा पैसा खर्च झाला. पुन्हा एवढा डोंगर पोखरूनही क्वात्रोची इटलीत सहीसलामत पळून गेला. आता हेलिकॉप्टर घोटाळ्यातही दलालीचे इटालियन कनेक्शन आहेच. त्याच्या चौकशीवरही शेकडो कोटी खर्च होतील, पण त्याचेही दुसरेबोफोर्स होईल आणि खरे दलाल पडद्याआडच राहतील. बोफोर्स तोफा ते ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स असे आमच्या संरक्षण गैरव्यवहारातील दलालीचे इटालियन कनेक्शन आहे. जोपर्यंत देशाची सूत्रे इटालियन मॅडमकडे राहतील तोपर्यंत हे कनेक्शन कायमच राहील असा आरोप कुणी केला तर तो चुकीचा कसा म्हणता येईल 

No comments:

Post a Comment