Total Pageviews

Saturday, 9 February 2013

जिहादी भस्मासुराच्या पकडीत पाकिस्तान

जिहादी भस्मासुराच्या पकडीत पाकिस्तान
मुसलमानांसाठी महम्मद अली जीना यांनी पाकिस्तान निर्माण केले. ‘महम्मद अली जीना कोणत्या मुस्लीम पंथाचे होते? याबद्दल पाकिस्तानात आजही प्रचंड वाद चालू असतो. अलताफ हुसेन (भारतातून गेलेल्या मुसलमानांचे जे नेते आहेत) त्यांचे म्हणणे असे आहे की, जीना शिया होते. जीना वारल्यानंतर शिया पंथाप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार करावे, असे त्यांच्या बहिणीने म्हणजे फातिमाने सांगितले. आणि त्यांच्या अंत्यसंस्कारात सुन्नी आणि शिया अशा दोन प्रार्थना म्हटल्या गेल्या. जीना सुन्नी मुसलमान नव्हते. राजमोहन गांधीच्या अंडरस्टँडिंग मुस्लीम माईंड या पुस्तकाप्रमाणे, ‘जीना सुन्नी नव्हते आणि मुख्य धारेतील शिया नव्हते. त्यांचा परिवार हा खोजा असावा. त्यांच्या पंथाला इस्माईली पंथ म्हणतात आणि आगाखान त्याचे प्रमुख होते. ज्याने पाकिस्तान निर्माण केले तो शिया होता, इस्माईली होता; त्या पाकिस्तानात आज शियांच्या कत्तली चाललेल्या आहेत. जीनांनी ज्या द्वेषाचे बीज पेरले, त्याला पाकिस्तानातच आतामधुर फळे लागू लागली आहेत.
सुन्नी मुसलमानांची दहशतवादी संघटना लष्कर--झांगवी पाकिस्तानातील क्वेट्टा शहरात 11 जानेवारी 2013 रोजी तीन शक्तिशाली बाँबस्फोट झाले आणि त्यात 140 मुसलमान ठार झाले. बाँबस्फोट ज्यांनी घडवून आणले ते सुन्नी मुसलमान आहेत आणि मेलेले बहुतेक सर्व शिया मुसलमान आहेत. अफगाणिस्तानला लागून असलेल्या या प्रदेशात अफगाणिस्तानातील शिया मुसलमान प्राणभयास्तव आलेले आहेत. सुन्नी मुसलमानांची दहशतवादी संघटना लष्कर--झांगवीने हे हल्ले घडवून आणलेले आहेत. पाकिस्तानी तालिबानशी आणि अल-कायदाशी या लष्कर--झांगवीचे जवळचे संबंध आहेत. एका वर्षभरात शिया हजारा समुदायाचे जवळजवळ एक हजार मुसलमान या संघटनेने ठार मारलेले आहेत.
गेली अनेक वर्षे शिया मुसलमानांवर असे हल्ले होत आहेत. ९८९ -२०१२मध्ये शियांवर किती हल्ले झाले आणि त्यात किती शिया मेले याची माहिती खाली दिलेली आहे. गे ल्या २३ वर्षात ४३३९ शियांना ठार करण्यात आले व ८४९९ जखमी झाले होते. पाकिस्तानची लोकसंख्या 18 कोटि आहे. त्यात 20 टक्के लोक शिया मुसलमान आहेत. शियांना वेचून वेचून कसे ठार करण्यात येते याची एक घटना अशी आहेशिया मुसलमान पवित्र कबरीला भेट देण्यासाठी बसमधून जात होते. तपासणी करण्यासाठी सैनिकी वेषातील दहशतवादी बसमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांची ओळख परेड केली. शियांना वेगळे काढले आणि त्यांच्या डोक्यात गोळया घालून त्यांना ठार केले.
पाकिस्तान जनता आपली मित्र ??लष्कर--झांगवी या संघटनेवर पाकिस्तानात कायदेशीर बंदी आहे. परंतु या बंदीला काही अर्थ नाही. या झांगवीच्या प्रमुखाचे नाव आहे मालिक ईशाक. हा 14 वर्षे तुरुंगात होता आणि त्याच्यावर खुनाचे आणि दहशतवादी हल्ल्याचे अनेक आरोप होते. पोलिसांना एकही गुन्हा कोर्टापुढे शाबित करता आल्यामुळे कोर्टाने त्याला सोडून दिले. त्याच्याविरुध्द साक्ष देण्याची ज्यांनी हिंमत दाखविली ते सर्व ठार झाले. तो जेव्हा तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याच्यावर गुलाबपुष्पाचा वर्षाव करून त्याचे स्वागत करण्यात आले. अशी आहे पाकिस्तानी जनता. आपल्याकडचे काही पंडित सांगतात की, ही जनता आपली मित्र आहे, तिच्याशी आपले शत्रुत्व नाही आणि तिचेही आपल्याशी शत्रुत्व नाही. जी सुन्नी जनता आपल्याच धर्मातील वेगवेगळया पंथीयांचा जगण्याचा हक्कदेखील नाकारते, ती जनता आपली मित्र आहे हे सांगणाऱ्यांना काय म्हणावे?
मालिक ईशाक अत्यंत सुरक्षित अशा घरात राहतो. तो म्हणतो की, ‘सरकारने शियांना गैरइस्लामी घोषित केले पाहिजे, ते या पृथ्वीतलावरील सर्वात मोठे पाखंडी आहेत.’ संपूर्ण पाकिस्तानात लष्कर--झांगवीचा प्रभाव पसरलेला असून मरायला आणि मारायला तयार असलेले शेकडो युवक त्यांच्याजवळ आहेत. अफगाण युध्दात अमेरिकेने आणलेली शस्त्रे या गटाला सहज उपलब्ध होतात. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय.एस.आय. आणि लष्कर यांनी ज्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात पोसल्या आहेत, त्यातील लष्कर--झांगवी एक आहे. पाकिस्तानचे पोलीस या संघटनेला हात लावण्याचे धाडस तर करू शकतच नाहीत, पण सैन्यदेखील स्वस्थ बसून असते. उद्या भारतात प्रचंड हिंसाचार करण्यासाठी या संघटनांची आय.एस.आय.ला आणि लष्कराला गरज आहे, म्हणून आज ते शियांना मारतात,
लष्कर--झांगवी या संघटनेवर 2001 साली बंदी घालण्यात आली. बंदी घातल्यानंतर या संघटनेने आपले नाव बदलले. बंदी घालूनही या संघटनेने पाकिस्तानच्या सैनिकी मुख्यालयावर 2009 साली हल्ला केला आणि श्रीलंकेच्या क्रिकेट संघावरही हल्ला केला. या संघटनेचे नाव आहे शिपाह--साहाबा. या संघटनेचे आतंकवादी कसे अमानवी आहेत याचे हे एक उदहारण - महम्मुद बाबर याला अटक करण्यात आली. तो लष्कर--झांगवीचा सदस्य होता. सोळा वर्षे तो शियांना ठार करण्याच्या कामात गुंतलेला होता. पाकिस्तानात शियांची स्थिती कशी आहे, यावर या डॉन वर्तमानपत्राने एक लेख लिहला आहे. आई-वडिल मुलाची शिया ओळख पुसण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. कारण तो जगावा अशी त्यांची इच्छा असते. म्हणजे अशा प्रकारच्या भयाच्या छायेत पाकिस्तानी शिया मुसलमान राहतात. तरी बरे , पाकिस्तानचा निर्माता शियाच होता. ते आज जिवंत असते तर त्यांचे काय झाले असते?
पाकिस्तानात मुसलमान मुसलमानांना ठार करतात, हे बघून काही सुशिक्षित मुसलमानांना दु: होते आणि मग ते सेक्युलर भाषा बोलू लागतात. डॉनने अशा एकाचे मत दिलेले आहे. तो म्हणतो, ‘शिया पंथातील मुसलमानांना जेव्हा लक्ष्य केले जाते, तेव्हा एक मुसलमान म्हणून मला दु: होते. एक शिया म्हणूनदेखील दु: होते. माझी वाढ पाकिस्तानात झाली, माझे मित्र वेगवेगळया संप्रदायातील आहेत. माझा असा विश्वास आहे की, आपण सर्व पाकिस्तानी झालो तरच हा हिंसाचर संपेल. सुन्नी, सलाफी, देवबंदी, शिया, अहमदी, हिंदू, ख्रिश्चन, पारशी, हे सर्व भेद विसरून आपण पाकिस्तानी झाले पाहिजे.’ 1947 साली देश तोडताना ही अक्कल कुठे गेली होती?
सुन्नी संघटनांना सौदी अरेबियातून पैसा बलुचिस्तानात राहणाऱ्या शियांना पाकिस्तान सोडून जाण्याच्या नोटिसा पाठविल्या जातात. त्यांनी जर पाकिस्तानातच राहण्याचा आग्रह धरला तर त्यांचा जीव धोक्यात येईल, असे राजरोसपणे सांगण्यात आले. पाकिस्तानातील सुन्नी मुसलमानांचा इराणवर खूप राग आहे. इराण शिया आहे. इराणमध्ये अयातुल्ला खोमेनी यांनी इस्लामिक क्रांती घडवून आणली. पाकिस्तानातील शियांना अयातुल्ला खोमेनीचे आकर्षण आहे. शिया मुसलमानदेखील सुन्नी मुसलमानांवर प्रतिहल्ला करून त्यांच्यावरील हल्ल्याचा बदला घेत असतात. परंतु हे प्रमाण कमी आहे. सरकारात तसेच लष्करात सुन्नी मुसलमानांचा भरणा अधिक आहे. लष्कर--झांगवीचे म्हणणे असे आहे की, पाकिस्तानला शिया करण्याचा इराणचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही सहन करणार नाही." सुन्नी मुस्लीम संघटनांना सौदी अरेबियातून सातत्याने पैसा येत असतो. सौदी अरेबियातून अल कायदा, तालिबान आणि लष्कर--तोयबा यांना धन पुरविण्यात येते.
सीमेवर जाणूनबुजून तणाव सध्या भारत-पाक सीमेवर अत्यंत तणावाचे वातावरण आहे. त्यातील एक कारण म्हणजे, आज पाकिस्तानात जो अंतर्गत धार्मिक कलह सुरू आहे, त्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सीमेवर जाणूनबुजून तणाव निर्माण केला जातो.पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती भयानक आहे. आज ना उद्या भारतावर राज्य करण्याची पाकिस्तानची मनीषा आहे. म्हणून वृत्तपत्रीय चर्चा, टी.व्ही.वरील चर्चा या फार सावधपणे ऐकल्या आणि वाचल्या पाहिजेत. पण त्यांच्या आहारी जाता कामा नये. शियांचे लोंढे भारतात येण्याची ही शक्यता आहे. ज्यांनी पाकिस्तान निर्माण केले आणि आपल्या मातृभूमीचे दोन तुकडे केले, त्यांना भारतात प्रवेश देता कामा नये. ते आपल्या कर्माचीच फळे भोगीत आहेत. पाकिस्तानचा नको तितका उमाळा येणारे राज्यकर्ते अनेक पक्षात आहेत. ते उद्या आपला घात करतील. अनेकांना मानवतेचे उमाळे यायला लागतील. म्हणून सामान्य जनतेनेच सावध राहिले पाहिजे
 
शिया सुन्नि दन्गली : १९८९-२०१३
वर्ष
शिया वर हल्ले
ठार
जखमी
1989
67
18
102
1990
274
32
328
1991
180
47
263
1992
135
58
261
1993
90
39
247
1994
162
73
326
1995
88
59
189
1996
80
86
168
1997
103
193
219
1998
188
157
231
1999
103
86
189
2000
109
149
४९
2001
154
261
495
2002
63
121
257
2003
22
102
103
2004
19
187
619
2005
62
160
354
2006
38
201
349
2007
341
441
630
2008
97
306
505
2009
106
190
398
2010
57
509
1170
2011
30
203
297
2012
173
507
577
2013
17
154
222
Total*
2758
4339
8499

*०१/०२/२०१३ पर्यन्त
 

No comments:

Post a Comment