Total Pageviews

Sunday 10 February 2013

अफझल-फाशी देण्याची गरज नाही अशा मागण्या काही राजकीय पक्षांकडून व काही ढोंगी मानवी हक्कवाल्यांकडून

अफझल लटकला! samna agrlekhहिंदुस्थानच्या स्वातंत्र्यावर आणि सार्वभौमत्वावर हल्ला करणारा अफझल गुरू अखेर फासावर लटकला आहे. मुंबईवर हल्ला करणारा कसाब आधीच नरकात पोहोचला आहे. पाठोपाठ तिहार तुरुंगातून अफझल गुरूही कसाबच्या साथीला गेला आहे. अफझल गुरूच्या फाशीने एक काळेकुट्ट पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अर्थात, या नराधमाने भारतमातेच्या शरीरावर जे घाव घातले त्या जखमा कधीच भरून येणार नाहीत. २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाला. हा हल्ला इतका भयंकर होता की, सहा सुरक्षा जवानांनी हौतात्म्य पत्करून संसदेवरील हल्ला थोपवला नसता तर जैश-ए-मोहम्मदचे हे दहशतवादी थेट संसदेत घुसले असते व त्यांनी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, अनेक खासदारांना ‘वेठी’स धरले असते. कदाचित आमच्या संसदेतच राज्यकर्त्यांच्या रक्ताचे पाट वाहिले असते. संसदेवरील हल्ला करणारे अतिरेकी संसदेच्या आवारातच मारले गेले, पण या हल्ल्याचा ‘मास्टरमाइंड’ अझफल गुरू नंतर पकडला गेला. तब्बल बारा वर्षांनंतर या नराधमास फासावर लटकवण्यात आले. राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जी व देशाच्या गृहमंत्रीपदी सुशीलकुमार शिंदे आल्यावर कसाब व अफझल गुरूच्या फाशीबद्दल वेगाने पावले उचलली गेली. प्रणव मुखर्जी यांनी ३ फेब्रुवारी रोजी अफझलच्या दयेचा अर्ज फेटाळला आणि
अवघ्या आठवडाभरातच अफझल फासावर लटकला. अफझल गुरूच्या फाशीचे जे राजकारण गेली बारा वर्षे सुरू होते ते आतातरी थांबायला हरकत नाही. अफझल गुरूस ‘दया’ दाखवावी, फाशी देण्याची गरज नाही अशा मागण्या काही राजकीय पक्षांकडून व काही ढोंगी मानवी हक्कवाल्यांकडून व्हाव्यात यासारखी शरमेची गोष्ट दुसरी कोणती असावी? अफझल गुरूस फाशी देऊ नये असे सांगणारे नेते मुसलमानी मतांचे लांगूलचालन करीत होते. त्यांना राष्ट्रीय अस्मितेपेक्षा, देशाच्या सुरक्षेपेक्षा अफझलची दया व मुसलमानी मते महत्त्वाची वाटत असतील तर या मंडळींचेही दफन अफझलच्या कबरीशेजारी व्हायला हवे. अफझलसाठी ज्यांना मानवता व मानवी हक्कांचे अश्रू ढाळायचे आहेत त्यांनाही अफझल गुरूच्याच तिहारमधील कोठडीत डांबून ठेवले पाहिजे. कसाब व अफझलसारख्यांनी अनेक निरपराध मारले. जे मरण पावले त्यांच्याबाबतीत मानवतेचा कोणता धर्म या नराधमांनी पाळला? हे दोघेही पाकिस्तानचे हस्तक म्हणूनच हिंदुस्थानात घुसले व आमच्या देशाविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. हे माहीत असूनही ज्यांनी अफझल गुरूच्या बचावासाठी शेवटपर्यंत आटापिटा केला त्यांच्यापासून देशाला खरा धोका आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पाळला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी प्रणव मुखर्जी ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटले होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख त्यांना परखडपणे म्हणाले होते की, ‘प्रणव मुखर्जी, तुम्ही ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात, राष्ट्रभक्त आहात. राष्ट्रपतीपदासाठी इतरांप्रमाणे शिवसेना सौदेबाजीचे राजकारण करणार नाही. आमची एकच मागणी आहे. त्या कसाब आणि अफझल गुरूस फासावर लटकवा! हेच आमचे ‘देशहिता’साठी केलेले मागणे समजा!’ शिवसेनेने नेहमीच राष्ट्रहित जपले. इतरांनीही तेच करावे, तरच देश टिकेल! अफझल लटकला हा आनंदाचा व उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. खरे तर अफझल हा फार पूर्वीच फासावर लटकायला हवा होता. मात्र बेगडी निधर्मीवादी आणि मुस्लिम मतांचे लाचार राजकारणी यामुळे हा क्रूरकर्मा बारा वर्षे तिहारच्या तुरुंगात सरकारी पाहुणा बनून आरामात राहिला. आताही तो केवळ जनभावनेच्या रेट्यामुळे फासावर लटकला. त्याचे श्रेय त्याला एवढी वर्षे जिवंत ठेवणार्‍या सत्ताधार्‍यांनी न घेतलेलेच बरे. अर्थात, जनभावनेच्या दबावामुळे का होईना, अफझल फासावर लटकला हे महत्त्वाचे. तो फासावर गेल्यामुळे त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणारी तमाम ढोंगी मंडळी किंवा तुमचे ते मानवी हक्कवाले अशा सर्वांना नक्कीच दु:ख झाले असणार. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत

No comments:

Post a Comment