सारा देश अफझलच्या फाशीची मागणी करतो आहे. तेव्हा शिंदे सरकार, देशाचे ऐका व त्या नराधमास वधस्तंभाकडे फरफटत न्या!
शिंदे सरकार, देशाचे ऐका!
हिंदुस्थानच्या राष्ट्रपतीपदी प्रथमच योग्य व्यक्ती बसली आहे याची खात्री देशवासीयांना पटली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या कारकीर्दीची सुरुवात धमाकेदार म्हणजे कसाबला फाशीच्या तख्तावर पोहोचवून झालंी आहे आणि आता लगेच तिहार तुरुंगात ‘लोणचे’ घालावयास ठेवलेल्या अफझल गुरूबाबत काय करता? त्याच्या फाशीबाबत लवकर निर्णय घेऊन ते प्रकरण संपवून टाका अशा आशयाची फाईल राष्ट्रपती भवनातून गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या टेबलावर पाठविण्यात आली आहे. पुढल्या चोवीस तासांत हिंदुस्थानचे तुर्रेबाज गृहमंत्री शिंदे हे त्यांच्या टेबलावर बसले तर त्यापुढच्या किमान ७२ तासांत संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरूदेखील फासावर लटकायला हरकत नाही. अफझल गुरूने २००६ साली दया याचिका केली, पण ही याचिका फेटाळून लावा अशी शिफारस राष्ट्रपती भवनाकडे पाठवायला यापूर्वीच्या गृहमंत्र्यांना पाच वर्षे लागली. अफझलला फासावर लटकवल्यास कश्मीर खोर्यात दहशतवादाचा भडका उडेल. हिंसाचाराचा आगडोंब उसळेल अशा भीतीपोटी केंद्रीय गृहमंत्रालय अफझलला पोसण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडत असेल तर या सरकारने बांगड्या भराव्यात. सोनिया गांधी हातात बांगड्या भरतात की नाही ते पाहिले नाही, पण त्यांच्या नामर्दांच्या सरकारने नक्कीच बांगड्या भरल्या आहेत. प्रश्न इतकाच आहे की, कश्मीरात हिंसाचार उसळेल, हीच जर भीती असेल तर मग इतक्या वर्षांपासून कश्मीरात सैन्याच्या बटालियन्स लाखोंच्या संख्येने का कुजवल्या आहेत? संसदेवर हल्ला करणारा अतिरेकी पाकिस्तानचा असेल नाही तर दिल्लीच्या चांदनी चौकातला. बंगालचा असेल नाहीतर महाराष्ट्राचा, त्याला फासावर लटकवायलाच हवे. शिवसेनाप्रमुखांच्या आजारपणात माजी बनलेल्या राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील त्यांना भेटावयास आल्या. त्या अर्धग्लानी अवस्थेतही शिवसेनाप्रमुख माजी राष्ट्रपतींना ताडकन म्हणाले, ‘तुम्ही माझे काम केले नाही. त्या कसाब आणि अफझल गुरूला फाशी दिले नाही.’ रुग्णशय्येवर असतानाही दिसणारी ही राष्ट्रभक्तीची तळमळ आज किती राज्यकर्त्यांना दिसते? खुर्चीला चिकटलेले सगळेच आहेत, पण राष्ट्रभक्तीच्या विचाराला चिकटलेले कितीजण आहेत? प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुखांचा पाठिंबा मागण्यासाठी आले तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेच्या मतांचा राजकीय सौदा केला नाही तर तेथेही तोच प्रखर राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य विचार मांडला. राष्ट्रपती भवनात जाताच कसाब आणि अफझल गुरूला फासावर लटकवा हेच त्यांनी प्रणवबाबूंना सांगितले. त्यातला कसाबचा मुडदा पडला व आता अफझल गुरू उरला आहे. त्याच्या फाशीबाबत फार घोळ न घालता एका तडफेने त्याच्याही फाशीवर शिक्का मारून फासाचा खटका आता ओढला पाहिजे. राष्ट्रीय राजकारणातील काही ‘सेक्युलर’पंथी महाभाग मानवतेच्या नावाने अफझलच्या बाबतीत ‘दया दया’ असे किंचाळत आहेत. अशा किंचाळणार्यांची नरडीही आता कायमची बंद केली पाहिजेत. कसाब आणि अफझल यांच्यासारखे दहशतवादी देशासाठी धोकादायक आहेतच, पण त्यांच्या नावाने मानवतेचा गळा काढणारे वाचाळ वीर हे त्यांच्यापेक्षा जास्त धोकादायक आहेत. धर्मांध आणि कडवट मुसलमानांपेक्षा देशाची जास्त वाट लावली आहे ती अशा बाटग्यांनी. हे सर्व थांबवले नाही तर एक दिवस या देशाची संपूर्ण सुन्ता झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना अफझल गुरूचा कळवळा येत आहे ते या देशाचे नव्हेत. त्यांच्या हक्काचे कुणी अफझलच्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले नाहीत व आतापर्यंत देश रक्षणासाठी या भंपक मंडळींनी स्वत:च्या गुबगुबीत कांतीवर साधा ओरखडाही मारून घेतला नाही. सारा देश अफझलच्या फाशीची मागणी करतो आहे. तेव्हा शिंदे सरकार, देशाचे ऐका व त्या नराधमास वधस्तंभाकडे फरफटत न्या
No comments:
Post a Comment