Total Pageviews

Tuesday 20 November 2012

कसाबवरील खर्च एक अब्जावर जाणार ब्रिगेडिअर हेमंत महाजन
मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल आमीर कसाब याच्या फाशीच्या शिक्षेविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. कसाबची फाशीची शिक्षा कोर्टाने कायम ठेवली. फाशीच्या शिक्षेऐवजी आपल्याला जन्मठेप देण्यात यावी, अशी याचिका वकिलांमार्फत कसाबने १४ फेब्रुवारी २०१२ रोजी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. कसाबने केलेला हल्‍ला हा देशावरील हल्‍ला होता. कसाबचे हे कृत्‍य सहन करण्‍यासारखे नाही, म्‍हणून कसाबला फाशीची शिक्षाच देण्यात यावी, असे सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना म्‍हटले. कसाबच्‍या वकीलाचे सर्व मुद्दे सुप्रीम कोर्टाने फेटाळले.कसाबला हत्‍या, हत्‍येचा कट रचणे, देशाविरूद्ध युद्ध पुकारणे, हत्‍या करण्‍यासाठी सहकार्य करणे या कलमान्‍वये दहशतवादी कारवाया केल्‍याच्‍या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनवण्‍यात आली. आता कसाबसमोर सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्‍याचा पर्याय आहे. जर ही याचिका सुद्धा फेटाळण्‍यात आली तर त्‍याच्‍यासमोर क्‍यूरीटिव पिटिशनचा आणखी एक पर्याय शिल्‍लक राहील. तो राष्‍ट्रपतींकडेही दयेचा अर्ज करू शकतो.मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने मे २०१० रोजी कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यातील नऊ दहशतवाद्यापैकी एकट्या कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले होते. बाकीचे आठ दहशतवादी कारवाईदरम्यान मारले गेले होते.
 - मुंबईमध्ये 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब, हा देशातील सर्वांत महागडा कैदी ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर आज (बुधवार) शिक्कामोर्तब केले असले, तरी प्रत्यक्षात शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंत खर्चाच्या आकड्यांमध्ये भरच पडत राहणार आहे.मुंबई हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी जिवंत पकडलेल्या कसाबला डिसेंबर-2008 पासून ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कृत्यांचा जिवंत पुरावा समजला जाणाऱ्या कसाबच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता, त्याच्यासाठी हायप्रोफाईल सिक्‍युरिटी सेल तयार करण्यात आले. बॉम्बप्रूफ असलेल्या या सिक्‍युरिटी सेलच्या उभारणीसाठी सरकारला तब्बल 5 कोटी 24 लाख रुपये खर्च आला. त्याच्यावर खटला चालविण्यासाठी याच कारागृहात विशेष न्यायालय तयार करण्यात आले.मुंबई पोलिसांसह इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचे (आयटीबीपी) पथक गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून आर्थररोड कारागृहाबाहेर तैनात ठेवण्यात आले होते. या जवानांचा आतापर्यंतचा खर्च सुमारे पंधरा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यासंबंधीचे देयक केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतेच राज्याला पाठविले आहे. जेवण, वैद्यकीय सुविधा, व्हीडीओ कॉन्फरन्स यांचा खर्च लक्षात घेता एकूण खर्च सुमारे ४० कोटींच्या घरात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. कसाबवर चोवीस तास डोळ्यांत तेल घालून पहारा सुरू असून, शस्त्रसज्ज पोलिस तैनात आहेत. आर्थर रोड तुरुंगामध्ये दाऊद, छोटा राजन आदी गुन्हेगारी टोळ्यांचे गुंड आहेत. त्यांच्या संपर्कात कसाब येणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. कसाबवर करण्यात येणाऱया खर्चांमध्ये औषधे, पहारा खाण्याचा खर्च सहभाग आहे. त्यामुळे प्रत्यक्षात फाशीच्या अंमलबजावणीपर्यंत सरकारला त्याची काळजी घ्यावी लागणार आहेमुंबई हल्ला ते फाशी; कसाबचा प्रवास
नवी दिल्ली, दि. २९ - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला करून त्यात १६६ जणांचे प्राण घेणा-या पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब हा एकमेव जिवंत दहशतवादी भारताला सापडला. त्याच्या जबानीतून या हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग उघड झाला. भारतातील न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्याचा हल्ला ते फाशी असा प्रवास.२६ नोव्हेंबर २००८- कसाब अन्य दहशतवाद्यांसह भारतात घुसला आणि घातपातास सुरुवात केली. २७ नोव्हेंबर २००८ (पहाटे दीड) - कसाबला अटक आणि नायर रुग्णालयात दाखल केले.२९ नोव्हेंबर २००८ - दहशतवाद्यांच्या तावडीतील सर्व जागा मुक्त, सर्व दहशतवादी ठार
३० नोव्हेंबर २००८ - पोलिसांसमोर कसाबची कबुली
२७/२८ डिसेंबर २००८ - ओळख परेड
१३ जानेवारी २००९ - एम. एल. टहिलियानी यांची २६/११च्या खटल्याचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती
१६ जानेवारी २००९ - खटल्यासाठी आर्थर रोड तुरुंगाची निवड
२२ फेब्रुवारी २००९ - उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
२५ फेब्रुवारी २००९ - कसाब याच्यासह अन्य दोघांवरील आरोपपत्र न्यायालयात सादर
एप्रिल २००९ - कसाबच्या वकील म्हणून अंजली वाघमारे यांची नियुक्ती
१६ एप्रिल २००९ - अब्बास काझमी यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती
१७ एप्रिल २००९ - कसाबचा जबाब न्यायालयासमोर, कसाबने तो नाकारला
२० एप्रिल २००९ - अभियोग पक्षाकडून कसाबवर ३१२ गुन्हे दाखल
मे २००९ - कसाबवर आरोप निश्चित, ८६ गु्न्हे निश्चित. त्याच्याकडून आरोप नामंजूर
मे २००९ - प्रत्यक्षदर्शींनी कसाबला ओळखले
२३ जून २००९ - हाफीज सईद, झकी उर रेहमान लख्वीसह २३ जणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी
३० नोव्हेंबर २००९ - अब्बास काझमी यांना कसाबचे वकील म्हणून हटवले. डिसेंबर २००९ - कसाबचे वकील म्हणून के. पी. पवार यांच्याकडे पदभार
१६ डिसेंबर २००९ - कसाबवरील न्यायालयीन कारवाई पूर्ण
१८ डिसेंबर २००९ - कसाबने सर्व आरोप नाकारले
३१ मार्च २०१० - युक्तिवाद पूर्ण. न्यायाधीश टहिलियानी यांनी निकाल राखून ठेवला. मे २०१० - कसाब दोषी. सबाउद्दीन अहमद आणि फहीम अन्सारी यांची निर्दोष सुटका
मे २०१० - कसाबला फाशीची शिक्षा
२१ फेब्रुवारी २०१० - या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
मार्च २०११ - शिक्षेला आव्हान देणारे पत्र कसाबकडून सर्वोच्च न्यायालयाकडे सादर
१० ऑक्टोबर २०११ - सर्वोच्च न्यायालयाकडून कसाबच्या शिक्षेला स्थगिती
१८ ऑक्टोबर २०११ - फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांच्या सुटकेला आव्हान देणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली
३१ जानेवारी २०१२ - निःपक्षपाती सुनावणी झाली नसल्याचा कसाबचा दावा
२३ फेब्रुवारी २०१२ - दहशतवाद्यांना आदेश देणा-यांतील आणि दहशतवाद्यांतील संभाषण न्यायालयाने ऐकले. तसेच हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेजही पाहिले. २५ एप्रिल २०१२ - न्यायालयाने निकाल राखून ठेवला. २९ ऑगस्ट २०१२ - कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेवली. दोन भारतीयांना मुक्त करण्याचा निर्णय दिला

No comments:

Post a Comment