Total Pageviews

Tuesday 13 November 2012

बांगलादेशींच्या विळख्यात मुंबई-प्रभाकर
पवार
हिंदुस्थानाला विशेषकरून मुंबई-पुणे यासारख्या शहरांना बांगलादेशी घुसखोरांनी पोखरून काढले आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान, हिंदुस्थान- बांगलादेश या सीमारेषेवरील गावे यासाठी कारणीभूत ठरत आहेत. बांगलादेशातील नागरिक सीमारेषेवरील गावकर्‍यांच्या माध्यमातून हिंदुस्थानात प्रवेश करतात. काही दिवस या गावांमध्ये राहिल्यानंतर उदरनिर्वाहासाठी देशातील प्रमुख शहरांची वाट धरतात. फोट भरण्यासाठी जरी हे बांगलादेशी हिंदुस्थानात येत असले तरी सोबत येताना दहशतवाद आणि बनावट नोटांची कीड घेऊन येतात. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकार्‍यांनी मागील सहा महिन्यांत तब्बल अकराशे बांगलादेशी घुसखोरांना मुंबईतून पकडले. तर मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी अनेकांना अटक करून लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
बनावट नोटा वितरित करून मिळणारे उत्पन्न बांगलादेशी चित्रपटांमध्ये
विशेष म्हणजे या बनावट नोटा वितरित करून मिळणारे उत्पन्न बांगलादेशी चित्रपटांमध्ये गुंतविले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बनावट नोटांच्या या बोनान्झामुळे बंगाली चित्रपटातील तारे-तारका मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवर आल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँचच्या युनिट-१२ च्या अधिकार्‍यांनी बनावट नोटा मुंबईत वितरित करणार्‍या चौघांना नुकतीच अटक केली. हे चौघेही बांगलादेशाच्या नडाई जिल्ह्यातील रहिवासी असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पाचशे-हजारांच्या बनावट नोटा वापरात आणून मॉल आणि इतर महागड्या दुकानांतून होलसेलच्या दरात वस्तू खरेदी करायच्या आणि या वस्तू पुन्हा किरकोळ विक्रेत्यास विकायच्या. यातून होलसेलच्या वस्तू किरकोळ बाजारात विकल्याने दुहेरी फायदा होतो. पोलिसंानी चौघांना अटक केली, पण त्यांचा म्होरका वेगळाच असल्याचे तपासातून पुढे आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले, सुभाष सावंत, राजेश कानडे, संदीप विश्‍वासराव, विजय कांदळगावकर, अशोक सुर्वे, संजय मराठे, मनोहर दळवी यांनी बंगळुरू येथे सापळा रचून बबलू खुर्शेद शेख या चित्रपट अभिनेत्याला पकडले. या पाचजणांकडून सुमारे साडेआठ लाखांच्या बनावट नोटा या पथकाने जप्त केल्या. बबलू हा बंगाली चित्रपटांचा हीरो असून तो चित्रपटांचा फायनान्सरदेखील आहे. प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करून सहजासहजी पैसा मिळत नसल्याने त्याने बनावट नोटांची तस्करी सुरू केली. ‘आपुन होलोपॉर’ आणितीन खोका’ या दोन चित्रपटांत बबलू याने प्रमुख नायकाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे बंगाली चित्रपटसृष्टी पोलिसांच्या हिटलिस्टवर आली आहे.बांगलादेशमध्ये प्रचंड गरिबी आहे. गरिबी उपासमारीला कंटाळलेले बांगलादेशी सीमेवरील जवानांना चिरीमिरी देऊन पश्‍चिम बंगालमध्ये प्रवेश करतात. काही काळ सीमेवरील शेतात ते कामही करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात,
मुंबईसारखा शहरातील बांधकाम व्यावसायिकांचे ठेकेदार परंतु मुंबईसारखा शहरातील बांधकाम व्यावसायिकांचे ठेकेदार त्यांना जादा पगाराचे आमिष दाखवून मुंबईत आणतात आणि बांधकाम व्यावसायिकांकडे अल्प मजुरीत काम करावयास भाग पाडतात तर काही काही दलाल या बांगलादेशींना पन्नास टक्के कमिशनवर बनावट नोटांचे बाजारात वितरण करावयास लावतात. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. बनावट नोटांचे खरे सूत्रधार पाकिस्तानात बसले आहेत. ते बांगलादेशातील गरिबीचा फायदा घेऊन आपल्या देशात बनावट नोटांचे वितरण करीत आहेत आणि आपली अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बनावट नोटांचे वितरण रोखण्यासाठी आपल्या देशात कोणतीच ठोस उपाययोजना नाही. बंगाली चित्रपटात काम करणार्‍या बबलू शेखने पोलिसांना अत्यंत स्फोटक माहिती दिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही मोठ्या प्रमाणात बनावट नोटा फिरत आहेत, असेही त्याने सांगितले आहे. बनावट नोटांनी जशी आपल्या चलनात घुसखोरी केली आहे तशी बांगलादेशी मजुरांनीही केली आहे. प्रत्येक उड्डाणपुलांच्या खाली किंवा कोणत्याही मोनोरेलच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला बांगलादेशी दिसतील. अलीकडेच मुंबई क्राइम ब्रँचच्या विशेष शाखेने वडाळा टी. टी. भागातील लोढा बिल्डर एल ऍण्ड टी कंपनीतर्फे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी धाड टाकली असता तेथे ५० बांगलादेशी मजूर बेकायदेशीररीत्या काम करीत असल्याचे आढळून आले. या बांगलादेशींना आश्रय देऊन कामावर ठेवणार्‍या चार कॉण्ट्रक्टरना पोलिसांनी अटक केली खरी, परंतु या किरकोळ कारवाईने आता काहीच होणार नाही. बागंलादेशींनीं आधीच आसाम गिळला आहे. आता या देशातील मुंबई, पुणे, बंगळूरू, दिल्लीसारखी प्रमुख शहरे काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
त्याचसाठी बांगलादेशी घुसखोरांच्या चमच्यांनी ११ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे मोर्चा काढून पोलिसांवर हल्ला केला आणि याद राखा, आसाम काय कुठेही बांगलादेशींना त्रास दिलात तर त्याचे परिणाम वाईट होतील. त्यामुळे मुंबई पोलिसांची बांगलादेशींविरुद्धची मोहीम फारकाळ टिकणार नाही असेच वाटते. बांगलादेशींनी अगदी व्यवस्थित या देशात आपले हातपाय पसरले असून त्यांना या देशातून उखडून काढणे आता अशक्यप्राय झाले आहे. २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्ल्यानंतरही पाकिस्तानला क्रिकेटचे आमंत्रण देणार्‍या कॉंग्रेसच्या राज्यात तर नाहीच नाही. अर्धी मुंबई बांगलादेशींच्याच विळख्यात आहे. हे आता लपून राहिलेले नाही

No comments:

Post a Comment