Total Pageviews

Monday 23 July 2012

NAXALISM -CHINAS PROXY WAR WITH INDIA BY BRIG HEMANT MAHAJAN

PUBLICATION OF BOOK

 NAXALISM -CHINAS PROXY WAR WITH INDIA BY BRIG HEMANT MAHAJAN

GEETA BHAVAN,MILAN NAGAR, AURANGABAD,MAHARASHTRA

26 JULY 2012

BOOK MAY BE ORDERED FROM
NACHIKET PRAKASHAN ,24 YOGSHEM,LAY OUT,SNEH NAGAR WARDHA ROAD NAGPUR -PIN 440015,TELE-0712,2285473,9225210130

माझ्या प्रिय,तरुण -तरुणींनो....या पुस्तकाचा समारोप करताना मी माझ्या देशातील तमाम तरुण-तरुणींना सांगू इच्छितो-आज आपला भारत तरुणांचा देश आहे. म्हणजे भारत तरुण आहे. तरुणाईत भारत बलशाली होण्याचे स्वप्न भारताचे माजी राष्ट्रपती डॉ..पी.जे. अब्दुल कलामांनी पाहिले. डॉ.कलांमाचे स्वप्न देशाचे होते.विविधांगांनी प्रयत्न केला तर भारत समृद्ध होईल हे मान्य, पण देशाच्या सीमा, सुरक्षा-संरक्षणाचे काय? देशाची बॉर्डर सुरक्षित तर देश सुरक्षित!मी या पुस्तकाद्वारे संपूर्ण भारतीयांचे विशेषत: तरुणाईचे लक्ष भारतीय सेना दलाकडे मग ती भूदल, वायुदल.नौदल,अर्ध सैनिक दले,पोलिस असो याकडे वेधू इच्छितो. या पुस्तकातील हा स्ट्रॉंग मेसेज वाचकांकडून, तुमच्याकडून हस्ते-परहस्ते, समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा .आपण सर्व मंगल, अतिपवित्र आणि वैभवशाली संस्कृती, शिल्पवैभव, ज्ञान-विज्ञान, अध्यात्मात अग्रज.शिवाय निसर्ग सौंदर्याने समृद्ध अशा भारतात जन्मलो हे आपले परमभाग्य! भारतावर आक्रमण खूप प्राचीन काळापासून होत होते, होत आहे. युद्धे झाली, यापुढेही होतील. देशासाठी जगणं, देशासाठी देह झिझवणं यात स्वार्थ आणि परमार्थ आहे. हे करत असताना वीरगती मिळाली तर त्यापेक्षा मोक्ष, मुक्ती-स्वर्ग आणखीन दुसरा कोणता असू शकतो?देश सुरक्षित तरच देव-धर्म सुरक्षित, राष्ट्रधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. राष्ट्र टिकेल तर धर्म टिकेल आणि धर्म वाचला तरच संस्कृती संवर्धन होईल. राष्ट्रीय एकात्मता-ऐक्य टिकवणे, अबाधित राखणे हे केवळ शासन व सरकारचे काम नाही तर प्रत्येक भारतीयांचे ते परम कर्तव्य आहे. या कर्तव्याकडे पाठ का फिरवावयाची !सेनेतील जवान युद्धात, बॉर्डरवर ,देशाच्या आत अतिरेकी हल्ल्यात जिवाची पर्वा न करता त्वेषाने लढतात, देशासाठी शहीद होतात. लक्षात ठेवा जवानांचे बलिदान देशासाठी असते. आपल्या प्रत्येक स्वतंत्र श्वासामागे सैनिकांचा हात असतो. शहीद जवानांच्या विधवा (widow) पत्नी-मुलांसाठी सरकार मदत करतेच पण त्याचबरोबर सामाजिक संस्थानीसुद्धा हातभार लावावा. वीरगती प्राप्त झालेल्या तरुण विधवांना नोकरीत प्राधान्य द्यावे किंवा त्यांच्या लहानग्या चिमुरड्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलावा. समाजसेवी संस्था-मंडळांनी याचा जरुर विचार करुन त्यांचे अश्रू पुसण्याचा, त्यांना आधार देण्याचा प्रयत्न व्हावा. फक्त कृतज्ञता काय कामाची ! त्याने जीवन जगता येत नाही.देशाने दिले. मी कशाला? देश म्हणजे तरी कोण? समाजच ना ! देशाने दिले समाजाने काय दिले? शहिदांच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करणे. समाजातील प्रत्येक घटकाचे आद्य कर्तव्य आहे. तरुण युवक-युवतींनी भारतीय सेना दलात भरती व्हावे, हवे ते क्षेत्र निवडावे. भारतमाता तुम्हांला खुणावते आहे. आपली जन्मदात्री आई संकटात असेल तर आईची आपण किती काळजी घेतो. भारतमाता ही आपली दुसरी आई आहे. तिच्यावर किती आत्याचार होतात.याचे तुम्हाला काहीच वाटत नाही? तिचे लचके तोडणाऱ्यांची कट-कारस्थाने हाणून पाडा. आपल्या पूर्वजांनी दिडशे वर्षे लढा दिला तेव्हा ती गुलामगिरीतून मुक्त झाली. युवकांनो उठा, सेनेत भर्ती व्हा! ""मॉं भारती तुम्हें बुला रही है।'' मरण तर कुणालाच चुकलेले नाही परंतु वाघासारखे जगावे आणि वाघासारखे मरावे यातच खरा पुरुषार्थ आहे. घर-संसारातील मृत्यू आणि सीमेवरील वीरगती हे समजून घ्यावे, यातील फरक ओळखला जावा.महाराश्ट्राततील अनेक गावे
"
, या गावात प्रत्येक कुटुंबातील एक तरी व्यक्ती आर्मित असते. "माझा मुलगा शहीद झाला म्हणजे माझा मुलगा देशासाठी गेला ही भावना तिथं आहे मग तुमच्या-आमच्या कुटुंबात का नाही? जयहिंद ! जय महाराष्ट्र !! आचरणात हवा.महाराष्ट्र हा भारताचा "खड्‌गहस्त झाला पाहिजे' हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे शब्द सत्यात तेव्हा उतरतील जेव्हा महाराष्ट्रातील तरुण-तरूणी सेनेतील नोकऱ्यांकडे वळतील. सेनेत अनेक नोकऱ्या व पदांच्या रिक्त जागा आहेत. सर्व प्रकारच्या नोकऱ्या भारतीय सेनेत उपलब्ध असतात. युवक युवतींनी सेनेतील नोकऱ्यांकडे वळावे. उच्च पदाधिकारी व्हावे. सेनेत बुद्धिमान तरुणांची गरज आहे. म्हणून तुम्ही गुणवत्ता वाढवा. शरीर सुदृढ बनवा. व्यसनासूराला जवळ फिरकू देऊ नका. निवृत्त सेवा देशासाठी समाजासाठी द्या. ती नाही देता आली तरी नाना-नानी बनून नात-नातूना शूर, वीर शौर्य-त्यागाच्या पराक्रमाच्या,वैज्ञानिक कथा सांगा असे वागलात तर म्हातारपण नको देऊ देवा ! अशी म्हणण्याची वेळ येणार नाही. मुलांच्या वयानुरुप जे चांगले देता येईल ते द्या. त्यांना मायेच्या पंखात घ्या. प्रेमाची ऊब द्या. मग पहा चमत्कार! मुलगा आणि सून तुमच्याकडे लोहचुंबकासारखे आपोआप येतील नाहीतर हल्ली मुलांना सांभाळायला आहे तरी कोण?मी माझ्या देशाला काय देऊ शकतो?असा प्रश्न भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. .पी.जे. अब्दुल कलाम यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात विचारला होता. हाच प्रश्न आपण आत्ता या क्षणी वाचता-वाचता थोडे थांबून आपल्या मनाला विचारुन बघा-""देशासाठी आपल्या जवळ दहा मिनिटे आहेत का?''डॉ.कलामांचा हा प्रश्न प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. गतीमान धावपळीच्या जीवन शैलीत कुटुंबातच एकमेकाला वेळ द्यायला "वेळ' नाही मग देशाचे काय? कुठेतरी हे चित्र, ही मानसिकता बदलायला हवी.सर्वप्रथम मी या देशाचा आहे हा विचार, ही भावना रुजवायलाच हवी, ते काम आपण आज, आत्ता स्वत:पासून सुरू करुया! "कल करे सो आज, आज करें सो अब' ही उक्ती सार्थ व्हावी.हे मी का सांगितले ? तर जो देशासाठी करतो, शहीद होतो त्याच्याबद्धल आस्था ठेवा. त्याच्या कुटुंबाला विसरु नका. त्यांच्या मुलांना हस्ते-परहस्ते मदत करा.समारोपाला पूर्ण विराम देण्यापूर्वी माझ्या देश बांधव, तरुणाईला मी आवाहन करतो की, आपल्यातील भेदाभेद सोडून एक व्हा. देश संकटात असताना अभेध्य व्हा. वज्रमूठ करा. एकीची साखळी मजबूत करा. असे झाले तर भारत बुलंद होईल. 2020 पर्यंत भारत महाशक्तिशाली राष्ट्रांत गणला जाईल. त्याचे श्रेय तुम्हा सर्वांकडे, तेव्हा जवानांच्या नसानसातून रोमांच उठेल, कंठातून शब्द, घोषणा बाहेर पडतील. हर हर महादेव ! भारत माता की जय !! वंदे मातरम्‌!!! ब्रिगेडियर, हेमंत महाजन युध्हा सेवा मेडल (निवृत्त) 

1 comment:

  1. Hemant, Congratulations! Great piece of work.
    Regards,
    Vinayak

    ReplyDelete