दहशतवादी हल्ले होऊच नयेत यासाठी यंत्रणा उभी करणे जास्त महत्त्वाचे
पाकिस्तानच्या एका मंत्र्याने भारतातील दहशतवाद्यांना भारत आवरू शकत नाही, असे विधान केले आहे. मुंबईवरील हल्ल्यातील एक मास्टर माईंड म्हणून ज्याला पकडले आहे तो जबीउद्दीन अन्सारी हा भारतातील बीड जिल्ह्यातील आहे .अबू हमजा ऊर्फ जबीउद्दीन अन्सारी भारतीय होता. भारतातील अशा नतद्रष्टांना हेरून त्यांना पोसण्याचे, त्यांना प्रशिक्षण देण्याचे, त्यांच्या हातून भारतातील माहिती काढून दहशतवाद्यांना प्रशिक्षित करून भारतात मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाठविण्याचे कारस्थान कोणाचे? पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन भारताच्या विरोधात दहशतवादी कारस्थाने रचणारा अबू तर धडधडा आता बोलू लागला आहे. तो सांगतो आहे की पाकिस्तानात कसा गेला, तेथे त्याला कसे प्रशिक्षण मिळाले? दहशतवादी कारवाया भारतात करण्यासाठी योजना कशी आखली? मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी कशा प्रकारे योजना केली? त्या अझमल कसाबसह अन्य अतिरेक्यांना अबूने आणि आयएसआयच्या अधिकार्यांनी कसे प्रशिक्षण दिले? कशा सूचना दिल्या? दहशतवादी भारतात धुमाकूळ घालत होते तेव्हा हा अबू कंट्रोल टॉवरमधून कशाप्रकारे त्यांना सूचना देत होता? कठपुतळ्यांचा हा दहशतवादी खतरनाक डाव खेळताना सूचना देण्यासाठी त्याच्यासोबत कंट्रोल टॉवरमध्ये कोणकोण उपस्थित होते? त्यामध्ये पाकिस्तान सरकारच्या आयएसआय गुप्तहेर खात्याचे अधिकारी कोण होते? मुंबईवर 2008 मध्ये 26/11 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागावर सय्यद झैबुद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल याने शिक्कामोर्तब केल्याच्या पार्श्वभूमीवर आता या दोन शेजारी देशांत बुधवारी परराष्ट्र सचिव पातळीवर बोलणी झाली. पण पाकिस्तानने ही बोलणी सुरू होण्याआधीच कांगावा तर सुरू केला , शिवाय या चर्चेदरम्यान "काश्मीर' हा विषय जिवंत राहावा, म्हणून नेहमीच्या खोड्याही सुरू केल्या आहेत. खरे तर "26/11'च्या हल्ल्यामधील पाकिस्तानचा सहभाग पहिल्या काही तासांतच उघड झाला होता; पण तेव्हा पाकिस्तानने हात वर केले होते.खुद्द अबूनेच या हल्ल्याच्या वेळी तो थेट कराचीतील कंट्रोल रूममध्येच बसला होता, असा गौप्यस्फोट केल्यानंतर पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. तरीही आपल्या भूमिकेतून पाकिस्तान बाहेर यायला तयार नाही, "दि एक्सप्रेस ट्रिब्यून' या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या या वक्तव्यात "मुंबईवरील हल्ल्यात 40 भारतीयांचा सहभाग होता आणि त्यांच्या साह्याशिवाय हल्ला प्रत्यक्षात येणे कठीण होते,' असा दावा करण्यात आला आहे. मुंबईवरील या हल्ल्याची नियोजनबद्ध आखणी करून समुद्रमार्गे पाकिस्तानातून आलेल्या दहा अतिरेक्यांना भारतातून स्थानिक पातळीवर काही साह्य मिळालेले आहे,
एकीकडे सचिव पातळीवरील चर्चेतून सामंजस्याच्या गोष्टी सुरू होत असतानाच, प्रसारमाध्यमांसमोर बेजबाबदार वक्तव्ये करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल भारताने चर्चेच्या प्रारंभीच पाक परराष्ट्र सचिवांना रोखठोक शब्दांत जाब विचारायला हवा. जिलानी यांच्या भारतदौऱ्याचे रहस्य काही वेगळेच दिसते! अन्यथा, मथाई यांना भेटण्यापूर्वीच त्यांनी काश्मीरमधील फुटीरतावादी गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याचे ठरवले नसते. मिरवैझ उमर फारुक यांच्या नेतृत्वाखालील हुरियत कॉन्फरन्सच्या गटाबरोबर "बात करूनच ते पुढच्या चर्चेचा मार्ग ठरवणार आहेत. मिरवैझ यांच्याबरोबरच सैय्यद अली शाह गिलानी आणि यासिन मलीक यांनाही त्यांनीही त्यान्ची भेटी घेतली. पण अधिकृत स्तरांवर भारतीय परराष्ट्र सचिवांशी होणाऱ्या बोलण्यांपूर्वी जिलानी यांनी या फुटीरतावादी नेत्यांच्या गाठीभेठी घेणे, हा भारताची कुरापत काढण्याचा प्रकार आहे . अर्थात, पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे हे वर्तन आपल्यासाठी नवे नाही. जून 2011 मध्ये त्यांच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार भारतात आल्या होत्या, तेव्हा त्यांनीही फुटीरतावादी नेत्यांची भेट घेतली होतीच. प्रश्न या संदर्भात आपण कधी तरी ठाम भूमिका घेणार की नाही, हा आहे. खरे तर काश्मीर प्रश्न बाजूस ठेवून, व्यापार आणि आर्थिक प्रश्नांवर चर्चा झाल्यास समझोत्याचे आणि सामंजस्याचे वातावरण तयार होऊ शकते; पण प्रत्यक्षात अशा प्रत्येक चर्चेच्या आधी भारतात दहशतवादी कारवाया तरी घडून येतात, वा अशा कारवायांमधील नवनवे सत्य बाहेर येत राहते आणि चर्चेचा सारा अजेंडाच बदलून जातो. गेल्या काही वर्षांतील बोलण्यांच्या आधीची अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. त्यामुळेच आताच्या या चर्चेत या साऱ्या बाबींचा "पर्दाखोल' झाला, तरच त्या बोलण्यांना काही अर्थ राहील. अन्यथा, चर्चा गेल्या 65 वर्षांप्रमाणेच पुढची 65 वर्षेही सुरूच राहतील.
पाकिस्तानचा हात अधिक उघड दहशतवादी हल्ले झाल्यानंतर अतिरेक्यांना पकडण्यात आपल्याला यश येते, हे अबू हमजाच्या अटकेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पण, हल्ले होऊच नयेत यासाठी यंत्रणा उभी करणे जास्त महत्त्वाचे आहे. हमजाच्या अटकेमुळे भारतावरील दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा हात अधिक उघड होईल.मुंबईवर 26/11 च्या हल्ल्याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात तपास यंत्रणांना यश आल्याने त्यांचे अभिनंदन करावे लागेल. या हल्ल्यातील पाकप्रशिक्षित दहशतवाद्यांचा मार्गदर्शक अबू हमजा या लष्करे तैयबाच्या अतिरेक्याला पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. हे एक मोठे यश म्हणावे लागेल. मुंबईत लोकल गाडय़ांमध्ये 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटासह अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या खटल्यांमध्ये आरोपी असलेल्या हमजाच्या अटकेमुळे तपास यंत्रणांना अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. या हल्ल्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांना कोणत्या भारतीयांनी मदत केली, याबाबतची माहिती मिळण्याची शक्यता आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला होत असताना हमजा सॅटेलाईट फोनवर मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांना मार्गदर्शन करत होता. अजमल कसाबला हिंदी शिकवण्याचे काम हमजानेच केले होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर स्वत:चा बचाव करण्यासाठी हमजाने दहा-बारा नावे बदलून ब-याच देशांमध्ये मुक्काम केला होता. मात्र, अखेर ‘कायद्याचे हात’ त्याच्यापर्यंत पोहोचलेच. अबू हमजा हा महाराष्ट्रातील बीडमधील रहिवासी आहे. त्यामुळे त्याला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांची चांगली माहिती आहे. नावे बदलण्यात तो माहिर आहे. त्याच्या इशा-यावरूनच दहशतवाद्यांनी मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी हल्ले केले होते. या हल्ल्यांच्या दरम्यान 166 लोक मारले गेले आणि असंख्य लोक जखमी झाले आहेत. चकमकीत नऊ दहशतवादी मारले गेले. मात्र अजमल कसाब हा दहशतवादी जिवंत सापडला. त्याने दिलेल्या जबानीवरूनच ही गोष्ट लक्षात आली की, या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्येच प्रशिक्षित करण्यात आले होते. भारतातील प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असतो. पण, पाकिस्तान मात्र त्या गोष्टीचा पहिल्यापासूनच इन्कार करत आहे. अलीकडेच काश्मीर सीमेवरून पन्नास ते शंभर अतिरेक्यांनी भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पण, सेनेच्या सजगतेमुळे तो फसला. स्थानिक लोकांची मदत त्यामुळेच आजकाल दहशतवादी स्थानिक लोकांची मदत घेऊन कारवाया करण्याची रणनीती आखत आहेत. दहशतवाद्यांना स्थानिक लोकांची मदत मिळत आहे, ही गोष्ट हमजाच्या अटकेमुळे स्पष्ट झाली आहे. मुंबईप्रमाणेच अहमदाबाद, औरंगाबाद, जयपूर, बंगळुरु अशा ठिकाणी जे बॉम्बस्फोट झाले होते, त्यामध्ये स्थानिक लोकांनी केलेल्या मदतीची मोठी भूमिका होती. हमजाकडून पाकिस्तानचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. लष्करे तैयबा आणि इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनांशी त्याचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. 002 मध्ये झालेल्या गुजरातमधील दंगलीनंतर हमजा हा जिहादी झाला. तो प्रथम सिमी संघटनेमध्ये सामील झाला. काही काळ तो इंडियन मुजाहिदीनसोबत सक्रिय होता. त्यानंतर तो पाकिस्तानस्थित लष्करे तैयबामध्ये दाखल झाला. इंडियन मुजाहिदीन आणि लष्करे तैयबा यांच्यातील तो महत्त्वाचा दुवा मानला जातो. औरंगाबादमध्ये 2006 मध्ये स्फोटके, आरडीएक्स आणि शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्यानंतर त्याचे नाव प्रथम चच्रेत आले. त्यावेळी तो पोलिसांना चकवून मुंबईत आला आणि तेथे त्याने लोकल गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामध्ये 180 जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही तो पोलिसांना हवा होता. पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातही त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. जाता जाता कसाब ,अफझल गुरूस फासावर लटकवाराष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांना पाच वर्षांत अफझल गुरूस फासावर लटकवता आले नाही . निदान आता जाता जाता याना फासावर लटकवा .कसाबला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण, त्याची अजून अमलबजावणी झालेली नाही. याच प्रकारे संसदेवर हल्ला करणा-या अफजल गुरुच्याही फाशीची अमलबजावणी झालेली नाही. कसाबला तुरुंगात एका विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्याच्या खाण्यापिण्यावर आणि सुरक्षेवर रोज हजारो रुपये खर्च केले जात आहेत. गेल्या तीन वर्षामध्ये कसाबवर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. देशाशी विश्वासघात आणि शेकडो लोकांचे जीव घेणा-यांना कोणतीही दया न दाखवता त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेची अमलबजावणी करून सामान्य लोकांच्या भावनांचा सन्मान राखला पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा दिल्यानेच इतर दहशतवाद्यांच्या आणि त्यांना मदत करणा-या स्थानिक लोकांच्या मनात भीती उत्पन्न होऊ शकेल. हमजाच्या अटकेमुळे आता त्याच्याकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अबू हमजाला आपल्या ताब्यात देण्यासाठी सौदी अरेबियाने आपल्याला मदत केली आहे. जो देश अतिरेक्यांना एरवी प्रोत्साहन देतो, त्या देशाने ही मदत केली आहे, हे महत्त्वाचे आहे. जे अतिरेकी भारतात दहशतवादी कारवाया करतात त्यांना मदत करू नये, अशी भूमिका सौदी अरेबियाच्या सरकारने घेतल्याचे दिसते. कारण, तसे न करता अतिरेक्यांना मदत करत राहिल्यास उद्या त्याचे परिणाम आपल्याच देशावर होणार आहेत, हे सौदी अरेबियाला कळून चुकले असावे. पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र आहे हे घोषित कराआता हमजाच्या अटकेमुळे भारतावरील दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा हात अधिक उघड होईल. त्यामुळे याबाबत भारताकडे पुरावे नाहीत, असे पाकिस्तान म्हणू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर आता भारताने अमेरिकेसह इतर राष्ट्रांची पर्वा न करता पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे घोषित केले पाहिजे. त्यासाठी अमेरिकेसारख्या देशांची वाट पाहण्याची गरज नाही. मुंबईत ताज हॉटेलवर झालेला हल्ला हा केवळ मुंबईवर झालेला हल्ला नव्हता तर तो सा-या देशावर झालेला हल्ला होता. त्यामुळे भारताने ठोस भूमिका घेऊन पावले उचलणे गरजेचे आहे. पाकिस्तानमार्फत होणारे हे हल्ले केवळ दहशतवाद्यांनी केलेले नसून ते भारताविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे, असे मानून त्याविरुद्ध लढण्याची तयारी केली पाहिजे. अमेरिकेने लादेनला शोधण्यासाठी पाकिस्तानमध्ये जशी कारवाई केली, तशीच आपणही केली पाहिजे. केवळ हल्लेखोर दहशतवाद्यांना फाशी देऊन ज्यांचे बळी गेले त्या शेकडो लोकांचे जीव परत येणार नाहीत. या पार्श्वभूमीवर आता सरकार काही करेल, अशा भ्रमात न राहता जनतेनेही आवाज उठवला पाहिजे. स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय दहशतवादी असे हल्ले करूच शकत नाहीत. आता हमजा सापडला असला तरी आणखीही अनेक स्थानिक लोकांचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. त्याची माहिती हमजाकडून काढून घेऊन अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई केली गेली पाहिजे. समाजाने अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. असे संदेश जात नाहीत तोपर्यंत स्थानिक लोकही दहशतवाद्यांना मदत करत राहतील आणि आणखी दहशतवादी हल्ले होत राहतील. पाकिस्तानच्या उलट्या बोंबा!मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरही ज्या अंतुले, दिग्विजयसिंग, अजिज बर्नी यासारख्या लोकांनी अकलेचे तारे तोड्ले होते, त्यांच्यावर आता सरकारने देशद्रोहाचे खटले दाखल केले पाहिजेत. देशांतर्गत कमजोरी बुजवून मग पाकिस्तानकडून केला जाणारा प्रत्येक वार निकामी करत पाकिस्तानची खोड मोडण्याची रचना भारताने केली पाहिजे. भारतातील दहशतवादी कारवायांमागील पाकिस्तानचा हात इतक्या वेळा उघड झाल्यानंतरही त्यांच्याशी सचिव पातळीवर, मंत्री पातळीवर, पंतप्रधान पातळीवरच्या चर्चा बंद केल्या पाहिजेत. पाकिस्तानसोबत भोळसट, सात्त्विक धोरणाचा काही उपयोग नाही. सतर्क, मुत्सद्दी, आक्रमक, सामर्थ्यानिशी व्यवहार केला पाहिजे. पाकिस्तानच्या प्रत्येक चालीला नेस्तनाबूत करत, त्यांची बदमाशी जगात उघडी करत, सामर्थ्यानिशी आणि मुत्सद्देगिरीने त्यांचा पराभव करत त्यांना अद्दल घडविणारा धडा स्वबळावर शिकवण्याची सदैव तयारी ठेवावी लागेल.http://brighemantmahajan.blogspot.com /
http://hemantmahajan12153.globalmarathi.com/index.htm

No comments:
Post a Comment