सईद जैबुद्दिन अन्सारी ऊर्फ अबू हम्ज़ा ऊर्फ अबू जिंदाल
हा त्यातला अलीकडे ओळख झालेला दहशतवादी. त्याचे श्रेय आपल्या गुप्तचर खात्याऐवजी सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. हरकत नाही, आपल्या देशात हलकल्लोळ माजवणारे दहशतवादी कुणाच्याही प्रयत्नांमुळे सापडणार असतील तर त्याचे स्वागतच करायला हवे. सौदी अरेबियातून भारतात येताच या सईद जैबुद्दिन अन्सारीला - म्हणजेच अबू हम्ज़ाला अटक करण्यात आली. भारतीय गुप्तचर त्याच्या मागावर होते आणि अमेरिकेच्या आग्रहावरून सौदी अरेबियाने त्याला आपल्या हवाली केले, असे सांगण्यात येते आहे.
पाकिस्तानच्या तुरुंगातून सरबजीतसिंगऐवजी सुरजीतसिंगला सोडून देण्यात आल्यानंतर पाकिस्तानच्याच वृत्तपत्रांमध्ये अतिशय कडक भाषेत या विषयावर टीका करण्यात आली. प्रत्यक्षात अध्यक्षांच्या निवासस्थानातून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये सरबजीतसिंगला सोडून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते आणि मध्यरात्रीनंतर सरबजीत नव्हे, सुरजीत असे जाहीर करण्यात आले. सुरजीतसिंग जेव्हा भारतात वाघा सरहद्दीवर आला, तेव्हा त्याने आपण पाकिस्तानात हेरगिरी करायला गेलो होतो असे सर्व वृत्तवाहिन्यांसमोर सांगून भारताची प्रत्यक्षात नाचक्की केली.
वृत्तवाहिन्यांसमोर नाचक्की
तुरुंगातून सोडताना आय.एस.आय.च्या वतीने सुरजीतसिंगला भरपूर पढवून पाठवण्यात आले असले पाहिजे आणि त्यासाठी त्याच्याशी काही खास गोष्टीही कबूल केल्या असल्या पाहिजेत असे मानायला जागा आहे. त्याला पाकिस्तानने काय सांगितले किंवा काय नाही, हा जरी वादाचा विषय असला तरी त्याने वृत्तवाहिन्यांसमोर तोंड उघडण्यापूर्वी त्याला आपल्या गुप्तचर खात्याने ताब्यात घेऊन त्याची सलग काही दिवस चौकशी करण्याची आवश्यकता होती. नाहीतरी तो इतके दिवस लाहोरमध्ये तुरुंगात होताच, येथे येऊन त्याने आपल्या गुप्तचरांना माहिती देण्याने काहीही फरक पडणार नव्हता. त्याला तुरुंगात मिळालेल्या वागणुकीपासून ते त्याच्या तिथल्या अनुभवापर्यंतच्या साऱ्या माहितीची आपल्या गुप्तचर खात्याला आवश्यकता होती. यासंदर्भात 'एन.डी.टी.व्ही.'वर
झालेल्या एका चर्चेत, आपल्या गुप्तचर खात्याचे अपयश कशाकशात आहे ते स्पष्ट करण्यात आले. या वेळी असेही सांगण्यात आले, की गुप्तचर खात्याची माणसे पाकिस्तानात वा अन्य कोणत्याही देशात सांगून पाठवण्यात येत नाहीत. गुप्तचरांना पाठवायचे अनेक प्रकार आहेत, विशेषत: पाकिस्तान आणि भारत यांच्यात गुप्तचरांचा वापर अतिशय खुबीने करण्यात येतो. या दोन्ही देशांमध्ये सरहद्दीवर तस्करी जोरात चालते. भारताच्या बनारस पानांना लाहोरच्या बाजारात किती मागणी आहे, हे मी स्वत: अनुभवलेले आहे. तस्करी करणाऱ्यांच्या अनेक साखळया या दोन्ही देशांमध्ये काम करत असतात. त्यांच्यात हे हेर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काम करत असतात. पलीकडच्या बाजूला कोणत्या हालचाली चाललेल्या आहेत त्याची माहिती तस्करांमध्ये असणाऱ्या या हेरांकडून जमा केली जाते. दोन्ही बाजूंनी ती गोळा करण्याची पध्दत आहे. भारतात पाकिस्तानचे जे हेर येतात ते काही 'आपण हेर आहोत' असा बिल्ला छातीवर लटकवून काम करत नाहीत. भारतात येणारे हे हेर प्रत्यक्षात हेरगिरीबरोबरच दहशतवादी मार्गाने कोणकोणत्या ठिकाणी कारवाया करता येतील, याची माहिती गोळा करत असतात. त्याचप्रमाणे पैशाचा वारेमाप उपयोग करून ते माणसे विकत घेत असतात आणि तरुणांची मने भडकवून देत असतात. या चर्चेत असाही एक मुद्दा निघाला की, काही राजकारण्यांमध्येही पाकिस्तानकडून असे हेर पेरले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी मंत्री पातळीवर असे हेर काम करत असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, जे हेरगिरीच्या कामगिरीवर पाकिस्तानात किंवा अन्यत्र जातात त्यांना सांगून ठेवलेले असते, की जर तुम्ही पकडले गेलात तर 'तुमचा आमच्याशी काही संबंध नाही' असे आम्ही जाहीर करू. तुम्हीही यासंबंधात कोणतीही अधिक माहिती देता कामा नये. त्यासाठी त्यांना अतिशय मुबलक मोबदल्याचे प्रलोभन दाखवण्यात आलेले असते. सुरजीतसिंगच्या बाबतीतही आपला त्याचा काही संबंध नसल्याचे आपल्या गुप्तचर खात्याने जाहीर केले तरी तेव्हा त्यास बराच उशीर झालेला होता. मुळात त्याला ताब्यात घ्यायची गरज आपल्या गुप्तचर खात्याला का वाटली नाही, हे गूढच आहे. तो तसे काहीतरी बोलेल हे बहुधा त्यांनी गृहीत धरलेलेच नसावे. या सुरजीतसिंगला साखळदंडाने बांधून अगदी सरहद्दीपर्यंत आणलेले होते, हे आपण वृत्तवाहिन्यांवर पाहिलेले आहे.
उद्या समजा, भारताने मागणी केल्याप्रमाणे खरोखरच सरबजीतसिंग सुटला आणि आपणही लाहोरमध्ये बाँबस्फोट करायलाच गेलो होतो असे त्यानेही सुरजीतसिंगप्रमाणेच म्हटले, तर भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या चिंध्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. पाकिस्तानशी संबंधित असलेल्या एका दहशतवाद्याला भारतात पकडण्यात आल्याने पाकिस्तानची जी कोंडी झालेली होती, त्या पार्श्वभूमीवर या सर्व घटनाचक्राला खूपच महत्त्व आहे. सौदी अरेबियातून आलेल्या सईद जैबुद्दिन अन्सारी ऊर्फ अबू हम्ज़ा ऊर्फ अबू जिंदाल याला भारतात पकडण्यात आल्यानंतर सुरजीतसिंगचा विषय गाजवण्यात आला. तो इतका की, 'भारतानेच सुरजीतसिंगचा विषय चर्चेतून दूर करण्यासाठीच जिंदालचा हा विषय उकरून काढला' असा आरोप करण्यापर्यंत पाकिस्तानची मजल गेली. सुरजीतसिंगला पाकिस्तानात हेरगिरी करायला पाठवण्यात आल्याबद्दल भारताने माफी मागितली पाहिजे, अशी हास्यास्पद मागणी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार रेहमान मलिक यांनी केलेली आहे. तीही त्यांनी लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली, यामागचे इंगित ओळखता आले पाहिजे.
पकडण्याचं श्रेय कोणाचं?
अबू हम्ज़ा म्हणून ज्याचा उल्लेख भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने केला जातो आहे, तो खरोखरचा अबू हम्ज़ा आहे का, ते पाहण्याची आवश्यकता आहे. अबू हम्ज़ा या नावाने वावरणारे दहशतवादी खरोखरच किती आहेत आणि ते जगातल्या कोणकोणत्या देशातले आहेत, तेही पाहण्याची गरज आहे. सईद जैबुद्दिन अन्सारी ऊर्फ अबू हम्ज़ा ऊर्फ अबू जिंदाल हा त्यातला अलीकडे ओळख झालेला दहशतवादी. त्याचे श्रेय आपल्या गुप्तचर खात्याऐवजी सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. हरकत नाही, आपल्या देशात हलकल्लोळ माजवणारे दहशतवादी कुणाच्याही प्रयत्नांमुळे सापडणार असतील तर त्याचे स्वागतच करायला हवे. सौदी अरेबियातून भारतात येताच या सईद जैबुद्दिन अन्सारीला - म्हणजेच अबू हम्ज़ाला अटक करण्यात आली. भारतीय गुप्तचर त्याच्या मागावर होते आणि अमेरिकेच्या आग्रहावरून सौदी अरेबियाने त्याला आपल्या हवाली केले, असे सांगण्यात येते आहे. दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी हा अबू हम्ज़ा कराचीमध्ये होता आणि तिथे निर्माण करण्यात आलेल्या 'कंट्रोल रूम'मध्ये त्याच्यासमवेत आय.एस.आय.चे काही अधिकारीही होते, असे त्यानेच आपल्या जबानीमध्ये सांगितले आहे. हा अबू हम्ज़ा महाराष्ट्रातल्या बीडचा. त्याने कसाबला आणि त्याच्याबरोबरच्या सर्व दहशतवाद्यांना, जुजबी का असेना, हिंदी शिकवले होते. त्याला पाकिस्तानने वेगळया नावाचा पासपोर्ट दिला होता आणि त्यावरच तो सौदी अरेबियाला गेला होता. मुंबईच्या हल्ल्याचा कट कुणी कुणी, कसा शिजवला होता, तेही त्याने स्पष्ट केले आहे.
26/11 मागचा खरा हेतू
पाकिस्तानी पत्रकार सईद सलीम शाहज़ाद याने लिहिलेल्या 'इनसाइड अल् काईदा ऍंड तालिबान' या पुस्तकाचा अनुवाद मी स्वत: अलीकडेच 'अल् काईदा ते तालिबान' या नावाने केला आहे. त्यात काश्मीरविषयक पाकिस्तानी कटकारस्थान्यांची इत्यंभूत हकिकत देण्यात आली आहे. त्यात मेजर हरून या नावाचा सातत्याने उल्लेख करण्यात आला आहे. त्याचा उल्लेख मात्र आपल्याकडे मुंबई किंवा काश्मीर यांच्यासंदर्भात अजूनतरी आलेला माझ्या पाहण्यात नाही. या हरूनचा भाऊ खुर्रम हा मारला गेला होता. तो सदानकदा इंटरनेटचा वापर करत असे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या 'ड्रोन' हल्ल्यात मारल्या गेलेल्या महमद इलियास काश्मिरी याच्या तो संपर्कात होता

No comments:
Post a Comment