अंडर अचिव्हर पंतप्रधान!उसळत्या तुफानाचे नेतृत्व SAMANA कोण
करणार?
हिंदुस्थानचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग म्हणजे जागतिक पातळीवरील एक हास्यास्पद प्राणी बनला आहे. हिंदुस्थानचा मुका व बहिरा राष्ट्रीय प्राणी कोण?...तर मनमोहन सिंग! अशा प्रकारचे विनोद प्रसिद्ध झाले आहेत व या मुक्या-बहिर्या राष्ट्रीय प्राण्याची दखल आता ‘टाइम’ नियतकालिकाने घेतली आहे. अर्थात ‘टाइम’ने दखल घेतली म्हणजे एखादा माणूस लहान झाला किंवा महान झाला असे आम्ही मानत नाही. शेवटी त्यांच्याही धंद्याचा प्रश्न असतो. नरेंद्र मोदी हे हिंदुस्थानातील अत्यंत तिरस्करणीय व्यक्ती असल्याचे कोणी मुखपृष्ठावर प्रसिद्ध केले म्हणजे ते तसे आहेतच, असे मानता येणार नाही. हिंदुत्व विरोधकांसाठी ते तिरस्करणीय असू शकतील इतकेच. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्हीदेखील हे राष्ट्रीय भोग भोगीतच आहोत. पंजाबात खलिस्तानी चळवळ जोरात असताना आम्ही त्या खलिस्तान्यांच्या दृष्टीने अत्यंत तिरस्करणीय होतोच व त्यांच्या हिटलिस्टवर आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो. हा पहिला क्रमांक आम्ही शेवटपर्यंत सोडला नाही याचा आम्हाला आजही अभिमान वाटतो. देश तोडणार्यांच्या बाबतीत आमचे धोरण ठकास महाठक व ठोशास ठोसा असेच राहिले. इस्लामी अतिरेक्यांच्या बाबतीत आम्ही असेच तिरस्करणीय राहिलो व पाकिस्तानसारख्या देशात तर आम्ही त्यांचे पहिल्या क्रमांकाचे दुश्मन असल्याची माहिती नुकतीच लाहोर-कराचीमधील पत्रकारांनी मुंबईत येऊन दिली. पाकिस्तानशी दुश्मनी घेण्याची व सतत अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहण्याची आम्हास हौस नाही, पण आमच्यासाठी हे एक प्रखर राष्ट्रकार्य आहे. खरं तर हे कार्य देशाच्या पंतप्रधानांनी केले असते तर आम्ही खुशाल आमच्या आवडत्या मनपसंत व्यंगचित्रकलेत रमलो असतो. हाती कुंचला घेऊन भल्याभल्यांना फटकारले असते, पण देशात सध्या जे दुबळे नेतृत्व
खुर्च्या उबवत आहे व त्यामुळे देश ज्या पद्धतीने अराजकाच्या वाटेवर निघाला आहे तो सर्वच प्रकार चिंताजनक आहे. ‘टाइम’ नियतकालिकाने नेमके यावरच बोट ठेवले आहे. खरे म्हणजे फक्त आर्थिक धोरणांच्याच बाबतीत नव्हे तर मनमोहन सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहेत. आर्थिक धोरणे राबविण्याच्या बाबतीत त्यांची इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळे ते हिंदुस्थानला विकासाच्या मार्गावरून खाली खेचत असल्याचे ‘टाइम’ने म्हटले आहे. ‘अंडर अचिव्हर’ असा उल्लेख मनमोहन सिंग यांचा या नियतकालिकाने केला आहे. मनमोहन हे ‘अंडर अचिव्हर’ आहेत म्हणजे नेमके काय? असा प्रश्न आमच्या मराठमोळ्या वाचकांना पडू शकेल. आमच्या खास ‘ठाकरी’ भाषेत सांगायचे तर देशाचे पंतप्रधान हे राजकीयदृष्ट्या नपुंसक आहेत व म्हातारा नवरा गमतीला अशी त्यांची अवस्था झाली आहे. या अवस्थेतही जमेल तितका आनंद उपभोगण्याचे कार्य मनमोहन सिंग करीत आहेत. ‘भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि आर्थिक धोरणांना योग्य दिशा देण्यात आलेले अपयश यामुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारकडून निर्णयच घेतला जात नाही. त्यामुळे देशांतर्गत आणि परकीय गुंतवणूकदारही कोणताही निर्णय घेण्याचे धाडस दाखवत नाहीत. भडकलेली महागाई आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे मतदारांचाही या सरकारवरील विश्वास उडून गेला आहे!’ असे ‘टाइम’ने म्हटले आहे. म्हणजे कालपर्यंत देशी वृत्तपत्रे मनमोहन यांना टपल्या मारीत होती. आता परदेशी लाथा त्यांना मिळू लागल्याने तरी त्यांना सत्य कळून येईल. परदेशी व्यक्तीचे आदेश ऐकून ‘जी हुजुरी’ करण्याची त्यांना सवय आहे. त्यामुळे ‘टाइम’ने त्यांचे कान टोचले
हे बरे झाले. अर्थात, कोणी कितीही टोचले तरी मनमोहन अशा आध्यात्मिक अवस्थेस पोहोचले आहेत की त्यांचा तपोभंग होण्याची सुतराम शक्यता आम्हास वाटत नाही. सरकारचे वस्त्रहरण रोजच्या रोज होत आहे. ए. राजा महाशयांनी स्पेक्ट्रम घोटाळा केला. तेव्हा ‘मी काय करणार?’ आघाडीचे सरकार आहे. मी हतबल आहे,’ ही दुबळेपणाची भाषा जो पंतप्रधान करतो तो देशाला समर्थ नेतृत्व देऊ शकत नाही व संकटांपासून देशाचे रक्षण करू शकत नाही. लाल किल्ल्यावरून पोकळ व छापील गर्जना करणे म्हणजे साहस नव्हे. देशाला सिंहगर्जनेची व वाघाच्या झेपेची गरज आहे. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यातील काहीच नाही. ते ‘अंडर अचिव्हर’ आहेत. असे सरकार फार काळ दिल्लीत राहिले तर देश ‘अंडर अचिव्हर’ - म्हणजे नपुंसक बनेल. देशविघातक शक्ती उठाव करतील. या संधीचा फायदा घेऊन देशाचे आणखी तुकडेताकडे पडतील. लोकांना लढण्याची प्रेरणा मिळावी व त्यासाठी संघर्ष करणार्या नेतृत्वाची गरज आज देशाला आहे. त्यासाठी मनमोहन सिंग यांनी घरी बसावे. सोनिया गांधी यांच्या परिवाराची देश लुटण्याची हौस भागली असेल तर त्यांनीही त्यांच्या मातृभूमीस रवाना व्हावे आणि समस्त कॉंग्रेस व त्यांच्या बेगडी निधर्मी बगलबच्च्यांनी मक्का- मदिनेच्या तीर्थयात्रेस जावे. पाकिस्तानसारख्या दुश्मनांना, इस्लामी अतिरेक्यांना, धर्मांध शक्तींना ज्यांची भीती वाटते, कमालीचा तिरस्कार वाटतो अशा राष्ट्रवादी विचारांच्या लोकांनी सत्तेवर येण्याची हीच वेळ आहे. देशातील जनतेच्या मनात याच भावनांचे तुफान उठले आहे. त्या तुफानांचे नेतृत्व कोण करणार? शिवरायांचा भगवाच देशाला दिशा देऊ शकेल. महाराष्ट्र त्यासाठी सज्ज आहे काय? महाराष्ट्रातही ‘मनमोहन’छाप ‘अंडर अचिव्हर’ नेतृत्व राज्य रसातळाला नेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत उठाव करावाच लागेल

No comments:
Post a Comment