http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=240718:2012-07-28-15-39-04&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13
स्थानिक विरुद्ध घुसखोर यांच्यातील वादाने आसाममध्ये हिंसक रूप धारण केले आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि व्यापक कारवाई करण्याबाबतची उदासीनता यांमुळे चिघळलेल्या या प्रश्नाची उकल करणारा हा लेख..
गुवाहाटीसारख्या राजधानीत एका युवतीवर जमावाने केलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे हादरलेला आसाम सावरत असताना आता बोडो भूमीत िहसाचाराचे लोण पसरले आहे. आताचा वाद ‘स्थानिक विरुद्ध परके’ असा आहे.
त्यातच या वादाला जमिनीच्या मालकीची पाश्र्वभूमी आहे. धुबरी जिल्हय़ातून गेली अनेक वष्रे अल्पसंख्याक समाजातील (आता ते बहुसंख्याक झाले आहेत ) लोक कोक्राझार जिल्हय़ात येत आहेत. त्याचा स्थानिकांना राग आहे आणि त्यातून संघर्षांची ठिणगी पडली. मुळात आसाम हे काही प्रगत राज्य नाही. िहसाचाराचा हा आगडोंब उसळल्यामुळे राज्य सरकारचा ढिसाळपणा उघड झाला आहे.
आपल्याला संधी मिळावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आणि त्यात बाहेरच्यांची घुसखोरी; अशी स्थिती निर्माण झाल्याने तिचे पर्यवसान िहसाचारात होते. स्थानिकांच्या वेदना जाणून घेऊन त्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. केवळ चच्रेच्या आश्वासनातून काही साध्य होणार नाही. बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवूनच या समस्येवर समाधानकारक तोडगा काढणे हाच शांततेचा खरा मार्ग ठरेल.

No comments:
Post a Comment