सोमाली चाच्यांना वेसण घाला
२०१० मध्ये आदेनचे आखात आणि भारतीय उपसागरात चाचेगिरीचे ४५० प्रकार घडले. त्यातून सुमारे २४ कोटी डॉलरची खंडणी उकळण्यात आली. सध्या या चाच्यांनी ५१ जहाजे वा बोटींचे अपहरण करून ८०० जणांना ओलीस ठेवले आहे. एका जहाजामागे साधारणपणे साडेपाच कोटी डॉलरची खंडणी चाच्यांकडून मागितली जाते. एखाद्या ओलिसाच्या सुटकेसाठी २००९ मध्ये सरासरी ५५ दिवस लागत असत आणि ३४ लाख डॉलर मोजावे लागत असत. हाच काळ २०१० मध्ये सरासरी १५० दिवस असा वाढला. सोमालियातील अराजक, पराकोटीचे दारिद्य्र, बेरोजगारी ही चाचेगिरी वाढण्याची कारणे होत. सोमालियात सध्या मध्यवर्ती सरकार नावाची चीजच अस्तित्वात नाही. पोटापाण्याचे साधन नसल्याने येथील टोळ्या लुटमारीकडे वळलेल्या दिसतात. या चाच्यांच्या वस्त्यांवर थेट हल्ले करून त्यांना नष्ट केले पाहिजे. त्यासाठी भारतीय नौदालानेच पुढाकार घ्यायला हवा आणि त्या समुद्री चाच्यांच्या घरात घुसून हल्ला करायला हवा .सोमालियात मध्यवर्ती सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नाही तर भीती कोणाची? आपण सोमालियाचा का एवढा विचार करतो हे कळत नाही . धोका एवढा वाढला आहे कि काही दिवसांपासुन समुद्री व्यापार मुशकील झाला आहे. काही ठराविक बंदरे आहेत जिथून हे चाचे कार्यरत आहेत. पहिला उपाय म्हणजे त्या बंदरांवर आरमाराने तोफांचा भडीमार करणे. चाच्यांना बर्याचदा पकडण्यात येते पण या पकडलेल्या चाच्यांच काय करायचं याबाबत अंतर राष्ट्रीय पातळीवर मतभेद आहेत. त्यामुळे त्यांना काही दिवसांनी सोडून देण्यात येते. मानवी हक्क वगैरे बाजूला ठेवून तत्क्षणी गोळ्या घालण्यात याव्यात. चाचेगिरीवर उपायअरबी समुद्रात सोमाली चाच्यांच्या उपदवाला आळा घालण्याचा प्रयत्न भारतीय नौदल करीत असले तरी चाच्यांचा उपद्रव थांब ण्याची फारशी शक्यता दिसत नाही. उलट नौदलाने ताब्यात घेतलेल्या चाच्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात अनेक अडचणी येत आहेत. ही कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत या चाच्यांना पोसण्याची जबाबदारी मात्र सरकारवर येऊन पडली आहे. दोन वेळा खायची भ्रांत असलेले आणि समुदात जीव धोक्यात घालून वाटमारी करणारे हे चाचे मुंबईच्या जेलमध्ये सध्या मजेत दिवस कंठीत आहेत. चाच्यांची समस्या त्यांना पकडून अथवा शिक्षा करून सुटणारी नाही. सोमालिया हा यादवीत उद्ध्वस्त झालेला देश आहे. त्यामुळे तेथील जनतेचे हाल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात दारिद्य, बेकारी यामुळे सोमाली जनतेला हाताशी धरून आंतरराष्ट्रीय माफिया ही चाचेगिरी घडवून आणीत आहेत. सोमाली चाच्यांनी जहाजे पळवून त्यातील कर्मचारी ओलिस ठेवल्यानंतर खंडणीची मागणी कुठल्या तरी भलत्याच देशातून येते आणि खंडणीची रक्कम तिसऱ्याच देशात पोहोचवावी लागते. थोडक्यात, सोमाली चाचे हे कुठल्या तरी अन्य देशातल्या माफियांचे बाहुले आहेत, हे उघड आहे. जोपर्यंत हे माफिया पकडले जात नाहीत, तोपर्यंत सागरी चाचेगिरीचा उपदव थांबण्याची शक्यता नाही. चाचेगिरीला आळा घालण्यासाठी सध्या फक्त भारत प्रयत्न करीत आहे, कारण त्याच्या समुदात हे प्रकार चालू आहेत. पण याबाबत आंतरराष्ट्रीय सहकार्य होणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रांनी यात लक्ष घालून आंतरराष्ट्रीय समुदात पकडल्या जाणाऱ्या चाच्यांवर कारवाई करण्याचे कायदे तयार करणे आवश्यक आहे. शिक्षा झालेल्या चाच्यांचे काय करायचे हेही ठरवणे आवश्यक आहे. मुळात सोमालियातील परिस्थिती सुधारावी व तोच चाचेगिरी थांबविण्याचा खरा उपाय आहे.सरकारच्या घोशणा उत्तम पण --सोमालियन चाच्यांचा उपद्रव व त्यांच्याकडून वेळोवेळी भारतीय व इतर नागरिकांना ओलिस ठेवून खंडणी उकळण्याच्या वाढत्या घटनांसंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक झाली. यात राजनैतिक पातळीवरील, तसेच सक्रिय उपायांच्या संदर्भात विविध निर्णय करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री यांनी संसदेत निवेदनाद्वारे दिली.एडनचे आखात आणि सोमालियाची किनारपट्टी या भागात होणाऱ्या चाचेगिरीला आळा घालण्यासाठीच्या विविध प्रस्तावांवर या बैठकीत चर्चा करण्यात येऊन विविध अशा प्रशासकीय, कायदेशीर आणि सक्रिय (ऑपरेशनल) स्वरूपाच्या उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. जलपरिवहन, परराष्ट्र आणि संरक्षण या तीन मंत्रालयांतर्फे संयुक्तपणे मध्यम व दीर्घ मुदतीच्या कृतियोजना करण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत मान्यता देण्यात आली.
एकंदर पाच जहाजांवरील 53 भारतीय खलाशी किंवा नाविक चाच्यांच्या ताब्यात आहेत. समितीने या ओलिसांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त करून त्यांच्या सुटकेच्या संदर्भात सर्व ते उपाय करण्याचा निर्णय केला. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली आंतरमंत्रालय गटाची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्न व उपायांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्याची जबाबदारी या गटाकडे देण्यात आली आहे. भारतीय नौदलासाठी उचित कृतीसाठी नियम व एडनच्या आखातातील मित्र देशांच्या नौदलांबरोबर चाचेगिरीच्या विरोधात सहकार्य वाढविणे, अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.सरकारच्या घोशणा उत्तम आहेत पण अमल बजावणि जास्त महत्वाची आहे.याच काळात चाच्यांनी १३भारतीयाचे अपहरण करून गेले २ वर्श त्याना ओलीस ठेवले आहे.
No comments:
Post a Comment