डेमोक्रसी आफ बाईट्स’ मनि शन्कर अय्यअर माध्यमांमध्ये आज फक्त ‘आवाज दाखवण्याची’ अहमहमिका लागली आहे. कुणाचा आवाज ‘होण्यात’ त्यांना रस उरलेला नाही.कोणाशी काय बोलायचे, केव्हा बोलायचे, कोण कोणाशी आधी काय बोलेल. हे माध्यमांना माहीत असते आणि बरोब्बर टार्गेट करून ते माणसे निवडत असतात.
---काँग्रेसमध्ये तब्बल १८ प्रवक्ते आणि १२ वरिष्ठ मंत्र्यांची समिती आहे. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, माध्यमांसमोर जाणे, पत्रकार परिषदा घेणो. इत्यादी गोष्टी त्यांच्या अखत्यारीत येतात आणि त्यांनी ते करणे अपेक्षित आहे. तसे ते करतातही; पण माध्यमे त्यांच्याकडे न जाता दुसर्याच कुणाला तरी ‘पकडतात’ आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी त्यांच्याकडून वदवून घेतात. आपण ‘अधिकृत’ माणसाशी बोलले पाहिजे हे खरे तर माध्यमांनाही माहीत असते; पण त्यांना ‘बातमी’ हवी असते आणि त्याचमुळे ते ‘इझी टार्गेट्स’ शोधत असतात.माझेच उदाहरण. अनेकदा दूरचित्रवाहिन्या माझे बाईट घेतात. मला कॅमेर्यासमोर उभा करतात. मी त्यांना प्रत्येक वेळी सांगतो, आत्ता मी जे काही बोलतो आहे ते माझे व्यक्तिगत मत आहे. पक्षाचा प्रतिनिधी आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी बोलत नाही; पण तरीही मला असंबद्ध प्रश्न विचारले जातात. मीही धीटपणे माध्यमांना सामोरा जातो. कारण तो माझा स्वभाव आहे. शिवाय राजकारणी ही अशी जमात आहे ज्यांच्यासाठी प्रसिद्धी म्हणजे जगण्यासाठी लागणारा ‘प्राणवायू’ आहे. त्यामुळे कोणताही राजकारणी प्रसिद्धीच्या लालसेला अपवाद नाही. अगदी मीदेखील.संसदेत बोलत असताना खरे तर आम्ही काही कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करीत असतो. तिथे बोलताना ‘उचलली जीभ लावली टाळ्याला.’ असे करता येत नाही. कारण माध्यमांची करडी नजर आमच्यावर असते. तिथे विचार करून, तोलूनमापून, अभ्यास करूनच बोलावे लागते. अनेक जण अशी अभ्यासपूर्ण भाषणे आजही करतात. पण संसदेत प्रत्यक्षात किती खासदार ते ऐकत असतात? समजा माझ्यासारखा माणूस बोलत असेल, तर ५0-१00 सदस्य सभागृहात उपस्थित असतात. अरुण जेटली बोलत असतील तर ही संख्या साधारण २५0 च्या घरात जाते आणि लालूंसारखा वक्ता असला तर हीच ‘गर्दी’ पाचशेपर्यंत पोहोचते. पण लालूंसारख्या माणसालाही सभागृहात यापेक्षा जास्त श्रोते मिळवणे कठीण आहे. म्हणून मग सभागृहाबाहेरचे श्रोते आम्ही माध्यमांच्या मार्फत मिळवत असतो. आमचे मत अधिक व्यापक स्तरात पोचवण्याकरता आम्हाला माध्यमांवरच अवलंबून राहावे लागते. संसदेत अनेक खासदार आपल्या कामाचा ठसा उमटवतात. अभ्यासपूर्ण भाषणे होतात; पण माध्यमे काय चित्रित करतात? कशावर भर देतात? संसदेत जेव्हा गोंधळ चालू असतो, वादावादी सुरू असते अशाच गोष्टींचे चित्रण करण्यात, त्यांना प्रसिद्धी देण्यात माध्यमे आपले इतिकर्तव्य मानतात. सदस्यांच्या केवळ एकाच बाजूचे दर्शन ते घडवतात आणि त्याला ‘गुंडगिरी’ असे लेबल लावून मोकळे होतात. खरे तर सभागृहातला हा ‘गोंधळ’ चव्हाट्यावर मांडला जाऊ नये. कारण काही वेळा त्यामुळेच अधिकच्या गोंधळाला उत्तेजन मिळत असते. आणखी एक उदाहरण. संसदेत अभ्यासपूर्ण भाषण करणे, आपला मुद्दा पटवून देणे हे येरागबाळ्याचे काम नाही; पण ज्यांना हे जमत नाही, असे चर्चेला घाबरणारे लोक सभागृहातून पळ काढतात. संसद भवनाच्या बाहेर सावज गाठण्याच्या तयारीत असलेले माध्यमांचे कॅमेरेही नेमके त्यांनाच धरतात आणि त्यांचे ‘बाइट्स’ घेतात. संसदेत जे तोंड उघडू शकत नाहीत, ते मग इथे कॅमेर्यासमोर बोल बोल बोलतात.माध्यमे म्हणजे जनतेचाच नाही, तर संसदेचाही आवाज आहेत.
.पण माध्यमांनाही आज फक्त ‘आवाज’ दाखवायचा आहे, कुणाचा आवाज होण्यात त्यांना रस उरलेला नाही.दूरचित्रवाहिन्यांवरचा अँकर म्हणजे तर ‘सर्वश्रेष्ठ शहाणा’! समोर कोणीही असो, कितीही गांभीर्याने कुणी काही बोलत असो; पण अँकर त्याच्यापेक्षा ‘श्रेष्ठ.’ इतरांचे बोलणे मधेच तोडण्याचा, नवीन काहीतरी घुसडण्याचा, इतरांना थांबवण्याचा, त्यांचा अपमान करण्याचा जणू त्याच्याकडे मक्ताच असतो! कारण काय दाखवायचे, काय नाही, कोणी किती बोलायचे, कोणी बोलायचेच नाही हे ठरवण्याचा अधिकारही त्याने आपल्याकडेच घेतलेला असतो.चर्चेला आलेली व्यक्ती समजा असेलही वाद्ग्रस्त, पण तिचा असा अपमान करण्याचा अधिकार माध्यमांना कुणी दिला?चर्चेचे वातावरण इतके बिघडून गेले आहे, की गंभीर, अभ्यासू व्यक्ती अशा चर्चांपासून दूर राहणेच पसंत करू लागल्या आहेत. हे हितावह नाही. या वातावरणात जाणीवपूर्वक बदल केला गेला, तर माध्यमे अधिक सकारात्मक चर्चा घडवू शकतील. निकोप लोकशाहीसाठी ते गरजेचे आहे. मात्र त्यासाठी माध्यमांनी आपले वर्तन सुधारले पाहिजे. कृतीतून स्वत:विषयीचा आदर प्रतिबिंबित केला पाहिजे, मला खात्री आहे, तसे झाले तर माध्यमांमध्ये उमटणारे समाजाचे चित्रही अधिक चांगले दिसेल!आणखी एक.तांत्रिक प्रगतीमुळे माध्यमांना मोठय़ा प्रमाणावर भांडवलाची गरज पडते. आणि मग माध्यमे पैसे ओतणार्या गुंतवणूकदारांच्या दावणीला बांधली जातात. मी माझ्या मतदारसंघात पंचायत राजचे मोठे काम केले असेन, पण ते आपल्या वाहिनीवरून दाखवायला राजदीप सरदेसाई तयार होतील का? - नाही! कारण त्यांच्या जाहिरातदारांना अपेक्षित असणार्या प्रेक्षकांना ते बघण्यात रस नसतो ना!
- पण या असमानतेलाही आता पर्याय उभे राहू लागले आहेत- स्थानिक वर्तमानपत्रे, स्थानिक वाहिन्या! त्यांना स्थानिक प्रश्नांमध्ये रस असतो आणि त्यांना प्रेक्षक / वाचकही मिळतात.माध्यमांमध्ये कार्पोरेट गुंतवणुकीवर र्मयादा असली पाहिजे, हे मला तत्वत: पटते, पण ही नियंत्रणे लागू करणे सोपे नाही. जोवर परदेशातून प्रसारीत होणार्या भारतीय वाहिन्यांना असले आडवळणाचे मार्ग उपलब्ध आहेत, तोवर भारतीय आणि परकीय भांडवलदार त्या मार्गाने आत शिरणार हे उघड आहे.अखेरीस भांडवल आणि भांडवलदार हे दोघेही सारखेच लोचट असतात. शासन यंत्रणांशी संधान बांधून ते एक नवीच मायावी भांडवलशाही जन्माला घालतात.भांडवलदार आणि माध्यमसंस्थांचे मालक मिळून जन्माला घालतात ती पत्रकारिताही अखेरीस मायावीच असणार.आपण जगतो आहोत तो काळच असमान आणि अस्वच्छ आहे, त्याला काय करणार?
-तरीही ‘सत्यमेव जयते’ हेच कोणत्याही काळाचे अंतिम सत्य असते, यावर माझा विश्वास आहे. मुसक्या बांधणार्या हुकुमशाहीपेक्षा तात्पुरते चावे घेणारी ‘डेमोक्रसी आफ बाईट्स’ परवडली!
(लेखक ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि खासदार आहेत.)

No comments:
Post a Comment