सावधान! रात्र वैर्याची आहे22
ब्रिगेडियर .हेमंत महाजन (निवृत्त)? 9096701253मे 2012 ला जाहीर झाले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाब याला आता यापुढे आर्थर रोड कारागृहात मांसाहारी जेवण आणि बिर्याणी मिळणार नाही. यापुढे कसाबला फक्त शाकाहारी जेवण देण्यात येणार असल्याचे सांगितले. कसाबवर गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले. या दहशतवादी हल्ल्याची शिकार बनलेल्यांसाठी मात्र केवळ 16 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कसाबच्या बाबतीत लवकरात लवकर पावले टाकली तरी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी व दयेच्या अर्जप्रक्रियेसाठी चार-पाच वर्षे लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत त्याला ऑर्थर रोड तुरुंगातच ठेवले जाणार असल्यामुळे कसाबवरील खर्च एक अब्जावर जाणार आहे.
नक्षलवाद्यांनी चालवलेले अपहरणसत्र आणि हल्ले (सीआयएसएफचे 7 जवान 14 मे 2012 ला मारले गेले) आणि सीमेवरील घुसखोरी (13 मे 2012 ला सीमेवर 6 आतंकवादी मारले गेले) यामुळे देशातील जनतेचा होत असलेला कोंडमारा, देशात चाललेले अराजक आणि होणारे आघात अन् अत्याचार या गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत. देशाच्या सद्यस्थितीविषयी शासनाला खडसावून विचारणारा कोणी तरी पुढे येणे जनतेला आवश्यक वाटत आहे. नुकताच केंद्रीय गुप्तचर विभागाने (आयबी) इशारा दिला आहे की, पाच अतिरेकी मुंबईत घुसले असून ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी तसेच मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर अतिरेकी हल्ले करू शकतात. दहशतवाद्यांची रेखाटलेली छायाचित्रेही महाराष्ट्र पोलिसांना मिळाली आहेत. अतिरेकी हल्ले व्हायची शक्यता असली तरी ऑक्टोबरमध्ये होणार्या 'चॅम्पियन्स लीग टी-20' स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी बीसीसीआयने पाक संघाला आमंत्रण देत पाक खेळाडूंसाठी भारताचे मैदान मोकळे केले. या निर्णयामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या पाक बोर्डाला आधार मिळणार आहे.
भाक्रा-नांगल धरण उत्तर भारतातील सतलज नदीवर भाक्रा-नांगल हा देशातील सर्वात मोठा धरण प्रकल्प आहे. भाक्रा-नांगल प्रकल्पावर पाकिस्तानमधील 'जमात-उद-दावा' ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) काही दिवसांपूर्वी दिला. या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबा आपल्या दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण देत आहे. आयबीच्या या इशार्यामुळे प्रकल्पाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. जर हे धरण फुटले तर जवळपास 1,500 गावे पाण्यात बुडण्याची तसेच सहा महिने या भागात शेती न करता येण्याची परिस्थिती उद्भवू शकते. औरंगाबाद येथे काही महिन्यांपूर्वी दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर बीड जिल्ह्यातील परळीचे औष्णिक विद्युत केंद्र, वैद्यनाथ मंदिर, कोयनेसह इतर धरणे, माजलगाव धरण यासह जिल्ह्यातील दहा ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. माजलगाव धरण आणि केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला. कोयना धरणही दहशतवाद्यांच्या नजरेत आहे. प्रश्न आहे की आपण कुठे कुठे पोलीस पहारा लावणार ?
भारताला बुडवण्यास शत्रू राष्ट्रे आणि देशद्रोही टपून बसलेले जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या दिवशी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उडवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार्या दहशतवादी मोहम्मद कतिल सिद्दिकीच्या पोलीस कोठडीत 21 मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश दहशतवादविरोधी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिले आहेत. मोहम्मद सिद्दिकी हा कात्रज परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी तपासात उघडकीस आणले आहे. मोहम्मद कातिल सिद्दिकी ( बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे. हा सिमी व इंडियन मुजाहिद्दीन या घोषित अतिरेकी संघटनेचा सदस्य आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी नोव्हेंबर 2011 मध्ये अटक केली होती. आज भारताच्या चारही बाजूंनीच नव्हे तर अंतर्गतही भारताला बुडवण्यासाठी हीमनगासमान शत्रू राष्ट्रे आणि देशद्रोही टपून बसलेले आहेत. चीन, पाकिस्तान, बांगलादेश यांच्या पंक्तीत आता श्रीलंका आणि मालदीवही बसू लागले आहेत. भारतावर बाहेरून आक्रमण होऊ शकते, त्याची काळजी नसावी. सेना देशाचे बाहेरून आक्रमण रोकण्याकरिता समर्थ आहे. मात्र या देशात स्वातंर्त्यापासून अंतर्गत आक्रमणे प्रतिदिन होत आहेत.
अत्यंत धीम्या गतीने चालणारी न्याययंत्रणा
गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात 'कसाबला आणखी किती काळ सांभाळायचा?' असा प्रश्न केला आहे. अतिमहत्त्वाच्या खटल्यांतही अत्यंत धीम्या गतीने निकालापर्यंत पोहोचणार्या न्याययंत्रणेला त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. प्रत्यक्ष गृहमंर्त्यांना हा प्रश्न जाहीरपणे विचारावासा वाटतो, यावरूनच कायदा-सुव्यवस्थेच्या दयनीय अवस्थेची कल्पना येईल. जनक्षोभाची फिकीर न करता, लोकमानसाची पर्वा न करता न्यायव्यवस्था आपल्या 'गज'गतीने पुढची पावले टाकत राहिल्या. कसाबविरोधात प्रत्यक्ष 'पुरावे' गोळा होऊन खटला उभा राहायलाही जवळपास एक वर्षाचा कालावधी गेला आणि गेली 3 वर्षे तो चालूच आहे. विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी आपले केस पांढरे होईपर्यंत आपण सरकारी पाहुणचार झोडू शकतो, याची कसाबला कल्पना आहे. 'आपल्यावरील सुनावणी मोकळय़ा वातावरणात झाली नाही,' अशी तक्रार करत तो फाशीच्या शिक्षेविरोधात
सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची हिंमत करतो आणि सर्वोच्च न्यायालयही यावरचा निकाल राखून ठेवून न्यायदेवतेपुढे सगळे खटले सारखेच असल्याचा संदेश देते.
कणखर भूमिकेची गरज नक्षलवाद्यांच्या अपहरण रणनीतीला सामोरे जाण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन यांच्याजवळ कोणतेही ठोस धोरण नाही. नक्षलवादी आमदार, जिल्हाधिकारी आणि परदेशी पर्यटक यांचे अपहरण करून शासनाच्या नाकीनऊ आणतात, ही लज्जास्पद गोष्ट आहे. सर्वसामान्य जनता, पंचायत सदस्य, पोलीस, आमदार यांचे अपहरण करत करत नक्षलवादी जिल्हाधिकार्यांपर्यंत पोहोचले. आता पंतप्रधानांचे अपहरण व्हायचे बाकी आहे. नक्षलवाद्यांचा उपद्रव कोणत्या थराला गेला आहे, हे समजून घ्यायला लायक नेते नाहीतच का ? अपहृतांच्या सुटकेसाठी आतंकवादी संघटनांपुढे झुकण्याची सवय शासनाला लागली आहे. इंदिरा गांधी यांच्या कणखर भूमिकेची आज गरज आहे. इंदिरा गांधी यांनी भारतीय मुत्सद्दी रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण करणार्या आतंकवाद्यांना भीक न घालता काश्मिरी आतंकवादी मकबूल भट्ट याला बेधडक फासावर चढवले होते. बांगलादेश सीमेवरून होत असलेली घुसखोरी तर अधिकृतच झाली आहे. भारतीय हद्दीत घुसखोरी करणार्यांवर गोळ्या न झाडण्याचा आदेश सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिले गेले असून ते जवान तेथे असून नसल्यासारखेच आहेत.
प्रत्येक नागरिक सैनिक व गुप्तहेर सध्या अशी स्थिती निर्माण झाली आहे की, प्रत्येक नागरिक सैनिक व गुप्तहेर व्हायला हवा. त्याला कारण दहशतवाद्यांना शोधून काढण्याचे काम पोलिसांवर आहे पण सर्व ठिकाणी पोलीस तत्पर राहू शकत नाहीत, अशा ठिकाणी सर्वसामान्यांनी पोलीस होणे आवश्यक आहे. कुठे संशयास्पद अशा हालचाली दिसल्या तर तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात एक जागृत नागरिक म्हणून कळवावे लागेल. तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे, त्यावरच जर कटाक्षाने लक्ष दिल्यास ही देशसेवा आपल्या हातून घडू शकते! केवळ संशयीवृत्तीने एकमेकांकडे न पाहता अचूक हालचाली टिपण्याची कला अवगत करून घेतली पाहिजे. सावधानता बाळगून कुणाला त्रास होणार नाही यासाठीही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी महत्त्वाचे म्हणजे प्रथम आपण शिस्तीने वागायला हवे . सर्वानी आपले डोळे व कान उघडे ठेवल्यास पोलिसांचे काम हलके होऊ शकेल

No comments:
Post a Comment