मोबाईलचे व्यसन अहमदनगर (07-May-2012) Tags : Ahmednagar,Editorial,Mobile users, Habbit, Youth, Technology, Problemतंबाखू, बिडी, दारू आणि इतर प्रकारचे सारेच व्यसन जसे घातक आहे, तसे आजच्या तरुणाईला जडलेले मोबाईलचे व्यसन घातक आहे, म्हणावे लागेल. तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली ही अभिमानाची बाब आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा हल्ली तरुणाईकडून ती जरा जास्तच अतिरेक होतो आहे.तरुण मंडळीत मोबाईलचा विषय जरी निघाला तरी तो मोबाईल मल्टीमिडिया आहे का, त्यात इंटरनेट आहे का, खास करून फेसबुक आहे का याची प्रथम विचारपूस होते. मोबाईलचा महत्वाच्या कामांसाठी होणारा वापर एकवेळ समजू शकतो. मात्र आपण पहातो अनेक तरुण आणि मोठी माणसेही दुचाकी चालवताना मोबाईलवर संभाषण करीत करीत मान पार वाकडी होते. दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळते. अपघात होतो. पण यातून कोणी बोध घेतला, हे अद्याप तरी ऐकिवात नाही. तुम्ही आम्ही सारेच तरुण होतो, आहोत. पण आपल्याला मोबाईलचे इतके प्राणाघातक व्यसन जडले आहे का? मोबाईलसाठी आपण की आपल्यासाठी मोबाईल? हे साधे गणित न समजल्यामुळे आजची तरुणाई कोणत्या थराला जाते आहे, याचा कुठेतरी विचार व्हावा. दुचाकीवर जात असताना एखाद्याचा इनकमिंग कॉल येतो. इथपर्यंत ठीक आहे. पण तो कॉल चालता चालताच घ्यायला पाहिजे का? दुचाकी रस्त्याच्या एका बाजूला उभी करूनही आपण बोलू शकतो ना! पण आजचे तरुण आणि मोठी माणसे सर्रास दुचाकीवरून जात असताना मोबाईलवर बोलतात आणि धडकतात. प्रत्येकवेळी पोलिसांनी कारवाई केल्यावरच आपण ताळ्यावर येणार आहोत का? आपल्याला काहीच सामाजिक भान नाही का? आजच्या तरुणाईकडे आदर्श कोणाचा, हे एकदा तपासून पहायला हवे. एकवेळ तंबाखू आदींचे व्यसन सुटेल. पण तरुणाईला जडलेले मोबाईलचे हे व्यसन सुटण्याची शक्यता तशी कमीच दिसते. काय होते, की हल्ली प्रत्येकाचा आपल्या मनावर ताबा राहिलेला नाही. अमक्याने एखादी वस्तू घेतली की मला ती हवीच, असा आपला हट्ट असतो. पण एक लक्षात ठेवा जो मनाच्या अधीन झाला तो समस्यांच्या गर्तेत आकंठ बुडल्याशिवाय राहत नाही. यातून बाहेर यायचे असेल तर जरा नीट विचार करा आणि मनाला ताब्यात ठेवण्याचे त्याला विधायक कार्यात गुंतविण्याचे प्रयत्न करा. हे केले नाही तर सर्वांचाच सर्वनाश अटळ आहे, हे मात्र नक्की
No comments:
Post a Comment