Total Pageviews

Wednesday 15 June 2011

TAMIL NADU FROM FRYING PAN INTO FIRE

करुणानिधी यांना सत्तेवरून घालवून जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावर बसविणाऱ्या तामिळनाडूच्या जनतेची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या हिताचा कार्यक्रम राबविण्याच्या घोषणा करण्याऐवजी जयललिता यांनी सुडाच्या राजकारणाचे रणशिंग फुंकले आहे. दिल्लीत जाऊन त्यांनी विविध खात्यांच्या मंत्र्यांकडे राज्याच्या मागण्या मांडण्याऐवजी आपल्या राजकीय प्रभावाचे प्रदर्शन करण्यात धन्यता मांडली. केंदातील दमुकच्या मंत्र्यांची त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल चौकशी चालू आहे. भ्रष्टाचारात अडकलेली मंडळी सध्या जेलची हवा खात आहेत. या लोकांना पाठीशी घातल्याची शिक्षा जनतेने दमुकचे सवेर्सर्वा करुणानिधी यांना दिली आहे. कायदा आता आपले काम करतो आहे. त्यामुळे जयललिता यांनी निर्धास्त होऊन राज्याच्या विकासाकडे व जनतेच्या हिताच्या योजनांकडे लक्ष द्यायला हवे होते. पण दिल्लीत जाऊन त्यांनी मारन यांना हाकला, चिंदबरम यांना राजीनामा द्यायला सांगा, अण्णा दमुकचा पाठिंबा हवा असेल तर माझ्या नाकदुऱ्या काढा, अशी अहंमन्य भाषा सुरू केली आहे. राजकारणाचा एक भाग म्हणून त्यांना असे बोलणे भाग असले, तरी त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, हे त्या विसरल्या आहेत. जयललिता यांची निवड तामिळ जनतेने अन्य काही पर्याय नसल्यामुळे केली आहे. खरे तर करुणानिधी आणि जयललिता यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या कारभाराचा चांगला अनुभव तामिळ जनतेला आहे, पण ही जनता आलटून पालटून या दोघांनाच निवडून देते. सत्तेवर आल्यानंतर हे दोन्ही नेते लोकांना मोफत टीव्ही, तांदुळ वगैरे देत असतात, त्यावरच गरीब तामिळ जनता खूश होते आणि त्यांचे अपराध पोटात घालते. पण त्याचा अर्थ आपण जनतेत अफाट लोकप्रिय आहोत, असा हे दोन्ही नेते घेतात आणि एखाद्या अवतारी व्यक्तीसारखे हाताचा पंजा दाखवत आणि लोकांचे चरणस्पर्श स्वीकारत फिरत असतात. यात सामान्य माणसांच्या विकासाची कोणतीच कामे होत नाहीत. केंदातील नेत्यांचा पाणउतारा करणे, आपला राजकीय प्रभाव दाखविण्यासाठी केंदातील नेत्यांना अचानक अडचणीत आणणे, हे जयललिता यांचे प्रसिद्ध फंडे आहेत. आता पाच वषेर् त्यांचे हे असेच वागणे देशाला पाहावे लागणार

No comments:

Post a Comment