Total Pageviews

Wednesday, 1 June 2011

muslims in jail

समाजात अल्पसंख्य गुन्हेगारीत बहुसंख्य!तुरुंगातले मुस्लिम मटा सिरीज - भाग संदीप शिंदे , ठाणे मुंबई - ठाणे ही शहरे झपाट्याने वाढू लागली तशी या शहरांतील गुन्हेगारीही . मात्र , या गुन्हेगारीत ' बहुसंख्य ' वाटा समाजात अल्पसंख्य असणा - या मुस्लिमांचा असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली असून हाती बेड्या पडलेल्या राज्यातील एकूण मुस्लिम कैद्यांपैकी ४३ टक्के कैदी ठाणे आणि मुंबईच्या जेलमध्ये आहेत आरोप सिद्ध होऊन शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांची संख्या ठाण्यात १९ . तर मुंबईत १८ . टक्के इतकी असून कच्च्या कैद्यांची संख्या ५२ टक्क्यांच्या आसपास आहे .
मुस्लिमांमधील गुन्हेगारी या मुद्द्यावर राज्य अल्पसंख्यांक आयोगाने अहवाल तयार करवून घेतला असून त्यात हे खळबळजनक वास्तव आहे . टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेने हा अहवाल तयार केला . संस्थेच्या सेंटर फॉर क्रिमिनॉलॉजी अॅण्ड जस्टिस या विभागात कार्यरत असलेल्या डॉ . विजय राघवन आणि रोशनी नायर यांनी दीड वर्षांच्या सखोल अभ्यासाअंती तो तयार केला आहे .
महाराष्ट्रात मुस्लिमांची लोकसंख्या ११ टक्क्यांच्या आसपास असली तरी तुरुंगातली कैद्यांमध्ये मुस्लिमांचा टक्का ३२ . इतका आहे गुजरातमध्ये हीच संख्या अनुक्रमे . आणि २५ टक्के इतका आहे . राज्यातल्या जेलमधील ७७ . टक्के मुस्लिम कैदी हे स्थानिक असून उर्वरीत २२ . टक्के उत्तरप्रदेश ( . ), बिहार ( . ), पश्चिम बंगाल ( . ) आदी राज्यातून आलेले आहेत . विशेष म्हणजे , मूळचे परराज्यातले असलेले अनेक कैदी सध्याच्याच वास्तव्याचा पत्ता देत असल्याने राज्यातल्या कैद्यांचा आकडा जास्त असल्याचे हा अहवाल सांगतो . बांंगलादेशच्या २८९ , नेपाळचे चार , दक्षिण अफ्रिका , नायजेरीया आणि टांझानियाचे प्रत्येकी दोन आणि पाकिस्तान , दुबई जॉर्डनच्या एका कैद्याचा त्यांच्यात समोवश आहे .
३३ . टक्के मुस्लिम कैदी हे एकत्रिक कुटुंबात तर ६५ टक्के विभक्त कुटुंबात राहत होते . २६ टक्के कैद्यांच्या घरात दुसरे कुणीही कमावणारे नव्हते . ६८ टक्के कैद्यांच्या कुटुंबांचे उत्पन्न सहा हजार रुपयांपेक्षा कमी तर , टक्क्यांचे उत्पन्न ५० हजारांपेक्षाही जास्त आहे . अटकेनंतर ३१ टक्के कैद्यांच्या कुटुंबांची अर्थिक कोंडी झाली असून २० टक्के कुटुंब भावनिकदृष्ट्या खचलेली आहेत . साडे सात टक्के कैद्यांच्या मुलांना वडिलांच्या अटकेमुळे शाळा सोडावी लागली आहे . ३० टक्के कैद्यांच्या भेटीला जेलमध्ये कुणीही नातलग येत नाहीत तर ५० टक्के कैद्यांच्या कोर्टातील तारखेला कुणीही जवळची व्यक्ती उपस्थित नसते . ( क्रमश :)
.
.

No comments:

Post a Comment