https://youtube.com/shorts/ZrQU3cHbe6k?si=HOpG6p9v_yjU7GZJ
चीनचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी तैवान सातत्याने प्रयत्नशील आहे. यासाठी कधी अमेरिका तर कधी भारताकडून तैवानला काही बाबतीत सहकार्य केले जाते. तैवानमधील लोकांचे सरासरी वयोमान वृद्धत्वाकडे झुकल्यामुळे कामगारांची संख्या कमी होत आहे. भारताकडून कामगार घेण्याची योजना तैवानने बनविली होती, यावर उभय देशांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती ब्लुमबर्ग या वृत्त संकेतस्थळाने दिली. भारताकडून लाखभर कामगार पुढल्या महिन्यात तैवानला जातील, अशी बातमी बाहेर आल्यानंतर तैवानमधील सोशल मीडियावर चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय कामगार बलात्कारी आहेत अशा आशयाच्या पोस्ट आणि दिल्लीमधील निर्भया प्रकरणाची माहिती तैवानमधील सोशल मीडियावर व्हायरल केली गेली. या अपप्रचारामागे चीनचा हात असल्याचे समोर आले आहे.
No comments:
Post a Comment