हे भारताचे सर्वात महत्त्वाचे युद्ध होते. ह्या युद्धामुळे 1962ला चीनबरोबर झालेला दारूण पराभव व 1965 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धाचा वाईट परिणाम 1971च्या लढाईमुळे मिटला व भारतीय सेनेला तिचा मान परत मिळाला.
1971चे युद्ध हे पाकिस्तानच्या स्वखुशी व चुकीमुळे झाले यात काही शंका नाही.
25 मार्च 1971मध्ये पाकिस्तानी प्रेसिडेंट (President)
जनरल याह्याखानने कुऱ्हाड उचलून पूर्व पाकिस्तानच्या बंगालीयांवर हल्ला चढविला व त्या दिवसापासून पाकिस्तानचे तुकडे होणार हे नक्की झाले.
पूर्व पाकिस्तानकडून जवळजवळ 100 लक्ष (एक कोटी) लोक पश्चिम बंगालमधून शरणार्थी म्हणून आले व तेथेच वसले. भारतावर यामुळे अर्थिक दडपण आले व हिंदू-मुसलमान ह्यांची भांडणे होणार ह्याचे लक्षण दिसू लागले व म्हणूनच भारताला या युद्धात उतरावे लागले.
ह्या लढाईत जिंकून भारताने फ्रिडम(Freedom) सेक्यूलरीजम (Secularism) व डेमोक्रसी (Democracy) ह्यांची रक्षा केली व जगात एक सुपर पॉवर ह्या नात्याने आपले स्थान मिळविले.
भारताने आपल्यापरीने खूप राजकीय व डिप्लोमॅटिक (Diplomatic) प्रयत्न केले, पण ते सगळे व्यर्थ गेले. 100 लक्ष शरणार्थींचा सर्व खर्च भारताने उचलला. कारण बाहेरच्या कुठल्याही मदत करणाऱ्या संस्थांना प्रवेश देणे हे धोक्याचे ठरले असते.
भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीनी युनोमध्ये मदतीसाठी आवाज उठविला. त्यावेळेचे युएन चिफ श्री यू थांट (U. Thant) होते. श्रीमती इंदिरा गांधीनी त्यांना निर्वासितांच्या शिबिरांना भेट देण्यास बोलाविले व त्यांची स्थिती पाहावी आणि मदत करावी म्हणून विनंती केली. लोकसभा व राज्यसभेमध्ये हे मंजूर झाले की पूर्व पाकिस्तानच्या शरणार्थींना भारताने आश्रय द्यावा. बंगाली स्वातंत्र्यवीरांना मदत करावी. त्याच्या मुक्तीवाहिनीस शस्त्र-अस्त्रांची मदत द्यावी. यामुळे पूर्व पाकिस्तानातील लोकांना दिलासा मिळेल.
हयाच कृती-कारणास्तव चीनचे पंतप्रधान श्री. चाऊइनलाय (Chow-En-Lai) यांनी पाकिस्तानला आपला पाठिंबा जाहीर केला. भारतालासुद्धा या स्थितीवर नव्याने विचार करावा लागला व 1 ऑगस्ट 1971ला इंडो-सोवियत (Indo-Soviet) करार झाला. ज्यामुळे हे नक्की झाले की जर भारतावर युद्ध लादले गेले तर रशिया भारताला साथ देईल. त्यामुळे पाकिस्तानला चीन-अमेरिकेचा जो पाठिंबा मिळणार ह्याचा भार कमी होईल.
भारतीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीवर सर्व बाजूकडून दडपण येण्यास सुरूवात झाली (आंतरराष्ट्रीय स्तरावरून) की हीच ती वेळ हाच तो क्षण की भारताने पूर्व पाकिस्तानवर हल्ला करून त्या प्रदेशाला मुक्त करावे.
परंतु भारतीय सेनेचे सरसेनापती जनरल सॅम माणेकशा हे मात्र लढाई करण्यास तयार नव्हते. कारण त्यांना त्यासाठी चार ते पाच महिन्यांचा वेळ हवा होता. इतक्या मोठ्या युद्धाकरिता चांगली जय्यत तयारी करणे जरूरीचे होते. त्यांना भारतीय सेनेची पूर्ण माहिती होती व त्यामुळे त्यांनी एकदम लढाईस नकार दिला. मात्र वेळ मागून तयारी सुरू केली.
युद्धाच्या पहिले (Prelude to war)
श्रीमती इंदिरा गांधीनी कॅबिनेट बोलावून लढाई संबंधी विचार-विनिमय केला. विचार-चर्चेअंती असे ठरले की भारताने एकदम युद्धात उतरावे. पण या वेळेस जनरल माणेकशाने आपले खरं मत व मन सरकार समोर मांडले व भारतीय सेनेची (1 जानेवारी ते 6 जून 1971) दयनीय स्थिती सरकारपुढे मांडली.
सॅमनी सांगितले की जून-जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस येणार व या कालावधीत पूर्व पाकिस्तानात युद्ध करणे अशक्य. यावेळी हिमालयातील पासेस माऊंटन (Himalayan Passes) गरमीमुळे वितळतील त्यामुळे चीनचे सैन्य पूर्व पाकिस्तानच्या मदतीस येऊ शकते. त्यांनी नोहेंबर 1971चा शेवटचा आठवडा निवडला. पंतप्रधानांना विश्वासात घेऊन सांगितले की मी 14 दिवसात पूर्व पाकिस्तानला मुक्त करून देईन. हे आश्वासन सरकारने मान्य केले. माणेकशा आपल्या कामात गढून गेले. त्यांनी वायुसेना प्रमुख पी. सी. लाल, नौसेना प्रमुख एस.एम. नंदा ह्या दोघांना विश्वसात घेऊन युद्धाची तयारी सुरू केली.
वेस्टर्न फ्रंट (Western Front) वर पाकिस्तानची सेना तयार होतीच. इथे माणेकशाने खास बंदोबस्त तयार करायला सुरूवात केली.
पंतप्रधानांच्या पाठिंब्यामुळे भारतीय सेनेला पूर्ण सामग्री व सरकारी मदत मिळाली. युद्धाची तयारी योग्य पातळीवर झाली. 30 नोव्हेंबरला भारतीय सेना जनरल फिल्डमार्शल माणेकशाच्या नेतृत्वाखाली कूच करू लागली. पंतप्रधानांनी युद्धाची सरकारी परवानगी भारतीय सेनेला दिली व ठरले की 4 डिसेंबरला पहाटे भारतीय सेनेने हल्ला चढवावयाचा आणि वायुसेनेने सूर्य उगवताच हल्ला करावा. मेजर जनरल इंदरजीतसिंग गील हे जनरल माणेकशाना मदत करत होते. दोघे वॉररूममध्ये सज्ज होते. इतक्यात खबर आली की पाकिस्तानाने 5 वाजता संध्याकाळी भारतीय सीमेवर, वेस्टर्न फ्रंटवर हल्ला केला.
यावेळी मान. पंतप्रधान श्रीमती इंदिराजी कलकत्याला गेल्या होत्या, तर रक्षामंत्री मान. श्री. जगजीवनराम हे बंगलोरला होते.
जनरल माणेकशानी स्वत:च निर्णय घेऊन भारतीय सेनेला, वायुसेनेला व भारतीय नौसेनेला युद्धास जाण्याचा आदेश दिला.
भारतीय सेनेच्या ठरलेल्या आराखड्यानुसार भारतीय सेना पूर्व पाकिस्तानात शिरली. शत्रू सैन्याची एकेक पोस्ट जिंकून त्यांना कोंडीत पकडले. विरोधकांना मातीत लोळविले तर काहींना यमसदनास पाठविले. शरणार्थींना बंदी करून विजयी सेना विजयाचे चौघडे वाजवित पूर्व पाकिस्तानचे अत्यंत महत्वाचे शहर ढाक्क्याकडे कूच करीत निघाली.
वाटेत कोमिला, खुलना, काक्स बझार ही शहरे काबीज झाली. पुढे 13 डिसेंबर पर्यंत दिनाजापूर, रंगपूर, सेहलत, मायानमती आणि चितगाव ही सर्व शहरे भारतीय सेनेच्या हातात आली.
आपल्या प्लॅन प्रमाणे 16 डिसेंबरला सकाळी 9.15ला ढाका शहर पडले. पाकिस्तानने युद्ध विराम केला. भारतीय सेनेचा परम विजय झाला.
या ऐतिहासिक सरेंडरकरिता फिल्डमार्शल जनरल माणेकशानी इस्टर्न सेक्टर विजयाचे श्रेय स्वत:कडे न घेता त्यांचे चीफ जनरल जगजितसिंह अरोरा यांना दिले. येथे सॅम म्हणजेच माणेकशांचा मोठेपणा दिसून येतो. त्या पश्चिमी क्षेत्रात भारतीय सेनेने 55 गावे व 52 चौ. मैलाचे क्षेत्रफळ गमावले पण पाकिस्तानची 630 गावे आणि 419 चौ. मैलाचा प्रदेश जिंकला.
शरणागत
1971ची भारत-पाक लढाई ही पूर्व पाकिस्तानच्या शरणागतीने संपली. शरणागती 16 डिसेंबर 1971ला ढाक्का येथे रेसकोर्सवर झाली.
पाकिस्तानचे नव्वद हजार कैदी व अफाट युद्धसामुग्री भारताच्या ताब्यात आली. अफझलखानाच्या वधानंतर अशीच प्रचंड प्रमाणात युद्धसामुग्री छत्रपतींच्या हातात आली होती. त्याची पुनरावृत्ती या युद्धात पुन्हा झाली असेच म्हणावे लागेल.
निष्कर्ष
भारतीय सेनेचा हल्ला अचूक व अगदी वेळेवर केलला हल्ला होता. 13 दिवसात पूर्व पाकिस्तान हा स्वतंत्र झाला. बंगाली माणसाला याह्याखानच्या चंगुलातून सुटका मिळाली.
भारतीय सेनेने हा विजय एका पराक्रमी व अत्यंत चतुराईने केलेल्या योजनेनुसार यशस्वी केला.
No comments:
Post a Comment