Total Pageviews

Tuesday, 1 August 2023

आयएस’च्या विळख्यातून बाहेर पडण्याकरता उपाय योजना PART 2

 मागच्या दशकात शहरात कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता आणि फरासखाना येथे बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या होत्या. अत्यंत वर्दळीच्या दगडूशेठ गणपती मंदिराजवळ बॉम्बस्फोटाचा प्रयत्न झाला होता. या घटनानंतर काही वर्षे घातपातापासून सुरक्षित राहिलेल्या पुण्यात दहशतवाद्यांचा वावर काळजी वाढविणारा आहे. पुण्यात पूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिदीनचा सहभाग होता. ही संघटना वेगवेगळ्या नावाने पुन्हा सक्रिय झाल्याने धोका वाढला आहे.

कोंढवा केंद्रस्थानी

वारंवार दहशतवादी सापडल्यामुळे कोंढवा परिसर पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. वर्षभरात पकडलेल्या दहशतवाद्यांपैकी बहुसंख्य आरोपी कोंढव्यात वास्तव्यास होते. कोंढव्यासह दापोडी, बोपोडी या भागात दहशतवाद्यांचे स्लिपर सेल सक्रिय झाले आहे. दाट वस्तीत या आरोपींचा शोध घेणे यंत्रणांसाठी आव्हानात्मक असते.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी परिसरातून जुनैद महंमद अता महंमद (वय २८, रा. दापोडी) याला तसेच त्याचा साथीदार आफताब हुसैन शाह (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू काश्मीर) याला किश्तवाड येथून अटक केली होती. एटीएसने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कोंढव्यातील कार्यालयावर छापा टाकून अब्दुल कयूम शेख (रा. साहिल सर्वदा, कोंढवा) आणि रझी अहमद खान (रा. अशोका म्यूज, कोंढवा) यांना अटक केली होती. अशोका म्यूज येथे पूर्वी आरोपी पकडण्यात आल्याने ही सोसायटी चर्चेत आहे. महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने नुकतीच अटक केली. तसेच त्यांना राहण्यासाठी खोली देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२ रा, कोंढवा) याला ‘एटीएस’ने अटक केली.

पुण्यात शिकून डॉक्टर झाला, नामवंत रुग्णालयात भूलतज्ज्ञ, पण कृत्य भयंकर

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ‘इस्लामिक स्टेट’च्या (आयएस) मॉड्यूलप्रकरणी डॉ. अदनानली सरकार (वय ४३) याला कोंढवा परिसरातून गुरुवारी अटक केली. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली आहे.

हडपसर भागातील नामवंत वैद्यकीय रुग्णालयात भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली सरकार हा 'इस्लामिक स्टेट'च्या (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूलचा प्रमुख असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 'आयएस'शी संबंधित देशभरात आतापर्यंत अटक केलेल्यांचा सरकार याच्याशी संबंध कसा आला, याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सुरू केला आहे. तरुणांची माथी भडकवून त्यांना 'आयएस'मध्ये भरती करण्याचे काम महाराष्ट्र मॉड्यूलद्वारे करण्यात येत होते.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने डॉ. सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून त्याला गुरुवारी अटक केली. त्याच्या घरातून लॅपटॉप, हार्ड डिस्क, सीमकार्ड, तसेच आयएसशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. डॉ. सरकार तरुणांची माथी भडकावून त्यांना 'आयएस'मध्ये भरती करीत असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली . डॉ. अदनान अली पंधरा वर्षांपासून तो वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्याने पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

पुण्यात ग्राफिक्स डिझायनर म्हणून वावर

कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दोघा दहशतवाद्यांचा म्होरक्या फरारी महंमद शहनवाज आलम (वय ३१) हाच असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. तिघे दहशतवादी पुण्यात काही घातपात घडविणार होते . आलमचा शोध घेण्यात येत असून 'एनआयए' आणि 'एटीएस' या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत.

'एनआयए' शोध घेत असलेल्या दोघा दहशतवाद्यांना पुणे पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री अटक केली. कोथरूड पोलिस ठाण्यातील शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री गस्त घालत असताना, तिघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत दिसले. संशयावरून खान आणि साकी यांना ताब्यात घेण्यात आले. त्या वेळी आलम फरारी झाला.

स्फोटके बाळगल्याप्रकरणी 'एनआयए'ने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर दीड वर्षांपासून ते कोंढव्यात वास्तव्यास होते. आलम याच्या इशाऱ्यावर साकी आणि खान काम करीत असल्याचा संशय आहे.आलम याचे नाव पहिल्यांदाच समोर आले आहे.

साकी आणि खान ग्राफिक्स डिझायनर म्हणून वावरत होते. या कामाच्या बहाण्याने ते विविध ठिकाणी वावरत होते. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या वर्षी कोंढव्यात छापा टाकून बंदी असलेल्या 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या (पीएफआय) दोघांना अटक केली होती; तसेच दापोडीतून जुनैद महंमद अता महंमद याला अटक केली होती. 


No comments:

Post a Comment