Total Pageviews

Tuesday, 15 August 2023

#भारताच्या 75 वा स्वातंत्र्य दिनी स्वतःला विचारा, मी या देशासाठी काय करत...

हिंसक आंदोलनाचा मोठा दुष्परिणाम देशावर

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात, ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. शहरात हिंसाचार , दूध आंदोलन, शेतकरी आंदोलन, यामध्ये सामान्य माणसांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ज्यानी ही आंदोलने पुकारले, त्यामुळे देशाचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सरकारी संपत्ती,राज्य परिवहनच्या बसेस, खाजगी वाहाने आणि खाजगी संपत्तीचे नुकसान झाले आहे. एसटी हे गरीब जनतेच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यामुळे एसटी नुकसानीचा सर्वात मोठा दुष्परिणाम हा गरिबांवर होतो.

शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होते.रोजची रोटी रोज कमावणार्यांना रोजी रोटी मिळत नाही.आजारी पडलेल्याना हॉस्पिटल किंवा डॉक्टरांकडे जाता येत नाही. प्रवासाकरता गावाच्या बाहेर पडलेल्याचे रस्ते बंद पडतात.

राज्यातील महत्त्वाचे रस्ते बंद केल्यास अर्थव्यवस्थेचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होते. दिल्लीत झालेल्या तथाकथित शेतकरी आंदोलनामुळे दोन रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रेटर दिल्लीचे रोज हजारो कोटी रुपयांची नुकसान होत होते.एवढे नुकसान कुठल्याही प्रकारच्या दहशतवादामुळे झालेले नाही.

हिंसक आंदोलने हा  दहशतवादाचा प्रकार मानला पाहिजे. देशातील एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणुन हिंसा हा उपाय नाही. भारतीय कायदा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. एखाद्या समाजाला, संस्थांना सरकारकडून कोणतीही मागणी मान्य करुन घ्यायची असेल ती कायद्याच्या चौकटीत राहून केली पाहिजे.

येत्या २०२३-२४मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.मणिपूर मधल्या हिंसाचारामध्ये मैते यी जमातीला कुकी जमातीचे नुकसान आणि कुकी जमातीला मैतेयी जमातीचे नुकसान भरण्यास भाग पाडले पाहिजे. टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात .हिंसाचाराच्या बातम्यांना पान वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे.

No comments:

Post a Comment