Total Pageviews

Tuesday 15 August 2023

हिंसाचार थांबवायचा असेल तर Manipur Violence Manipur Violence Expl 1...

भारताच्या 75 वा स्वातंत्र्य दिनी स्वतःला विचारा, मी या देशासाठी काय करतो?

कुठलाही देश महाशक्ती बनण्यामध्ये, देशाच्या सामान्य नागरिकांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असतो .महाशक्ती असलेल्या देशांचे नागरिक कायदे पाळतात, नियम पाळतात,त्यांचे देशावरती प्रेम असते आणि हे प्रेम ते कृतिशील जबाबदार नागरिक, बनून व्यक्त करतात. देशापासून काही मागण्यापेक्षा, मी देशाकरता काय करू शकतो, यावर त्यांचा जास्त विचार असतो. असे असेल तर भारतीय देशाप्रती आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण पणे निभावत आहे का? तर उत्तर नाही ,असे  आहे.

जबाबदार नागरिक बना

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मी काहीही लिहू शकतो, बोलू शकतो, भडकावु पोस्ट सोशल मीडिया वरती टाकू शकतो ,त्यामुळे हिंसाचार झाला तरी पर्वा नाही.भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्ये सुद्धा दिली आहेत. बर्याच वेळेला या कर्तव्यांकडे अनेक  दुर्लक्ष करतात.

 सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा बहुतेकांना  विसर पडतो. सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं , जागा मिळेल तिथं मलमूत्र विसर्जन करणं ,सार्वजनिक अस्वच्छता हा नवीन विषय नाही. कार मधून रस्त्यावर प्लास्टीक आणि शीतपेयांच्या बाटल्या भिरकावल्या जातात,  किनाऱ्यावर दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच असतो, हे आपल्यातलेच काही सुशिक्षित लोक करतात .परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे,आपल्याकडील कचरा सर्रास रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी आपण टाकतो.येथे स्वच्छता राखा, असे लिहिलेल्या पाटीखालीच कचर्याचा डोंगर असतो. म्हणजे नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशी आपली धारणा आहे.

पान खाऊन चहूकडे थुंकणे तर काहींचा छंद आहे. कानीकपाळी ओरडून, दंड आकारुनसुद्धा हे  ऐकत नाहीत. आपण इतके बेजबाबदार आहोत की काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी सरकार जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढतो. आज प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही, पण तरीही नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे रुप आलेले दिसते. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात. तरीही हा नियम अनेक पायदळी तुडवतात. आपण जबाबदार नागरिक का बनत नाही?

शहरांमधील वाहतुकीला शिस्त लावा

वाहतुकीचे नियम जितके आपल्याकडे मोडले जातात, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ओव्हरटेक करणे ,अगदी छातीटोकपणे आपल्याकडे केले जाते. नियम मोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर, हेच आपले दुर्दैव आहे.रस्त्यावरील वाहतूक अडवून लग्नाच्या मिरवणुकीत नाचणं, वेगवेगळ्या मिरवणुका काढून शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी अजून कठीण करणे चालूच आहे. 

रस्त्यानं नीट आणि वेग मर्यादित ठेवून वाहन चालवणं, रस्ता क्रॉस करणाऱ्यांना रस्ता ओलांडू देणं, आपल्या वाहनाची धडक बसून कोणी  जखमी होणार नाही, मरणार नाही अशी सावधगिरी बाळगणं जरुरी आहे.

शहरांमधील रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम केली जावी. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोर करावे यासाठी वाहतूक पोलिसांची मजबूत फळी असावी. वाहतूक नियम तोडणार्या नागरिकांना शिक्षा द्यावी.वाहतुकीचे नियम पाळुन आपण प्रचंड प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलची बचत करू शकतो आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मदत करू शकतो. 

No comments:

Post a Comment