Total Pageviews

Monday, 7 August 2023

चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग यांना पदावरून का हटवले?

 चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्या गच्छंती मागचे गूढ

 दि . २५ जून रो जी झा लेल्या रशिया , व्हिएतनाम आणि श्रीलंका या देशांच्या प्रतिनिधीं सोबत किन गँग यांनी बैठकीत भाग घेतला होता . ही किन गँग यांची चीनचे परराष्ट्रमंत्री म्हणून झालेली शेवटची बैठक होती . त्या बैठकीनंतर किन गँग चीन मधील सार्वजनिक सरकारी कार्यक्रमांमध्ये परत दिसलेच नाहीत. किन गँग यांना खरं तर शी जिनपिंगपिं यांनीच पुढे येण्याची संधी दिली . किन गँग हे चिनी सरकारचे प्रतिनिधी असले, तरी अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणून काम करत असताना बास्केट बॉल वगैरे क्रीडा प्रकारात त्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता . चिनी सरकारचा प्रतिनिधी एवढा ‘आऊट स्पोकन’ असणे, हे अमेरिकेतील लोकां साठी मुळात आश्चर्यजनक. किन गँग यांच्या अमेरिकेतील कार्यकाळातच कोरोना विषाणूच्या जगभर प्रसाराची घटना घडली होती . त्या काळातची नवर सर्व देश आरोप करीत असताना चीनची बाजूसा वरून घेण्याची जबाबदारी त्यांनी यशा योग्य पार पाडली होती . शी जिनपिंगपिंयांच्या खास मर्जीतले किन गँग यांना त्यांच्या सात महिन्यांच्या कार्यकाळानंतर दूरदू व्हावे लागले, हे आश्चर्यजनकच. मागील महिन्यात म्हणजे जूनमध्ये किन गँग यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅऩ्थनी ब्लिंकन यांच्याबरोबर चर्चेत भाग घेतला होता . एखाद्या देशाच्या नवीन परराष्ट्रमंत्र्याशी संवाद निर्माण करताना दीर्घकाळासाठी आणि भविष्याकडे लक्ष ठेवून टप्प्या टप्प्याने विश्वास निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण, येथे तर सात महिन्यांच्या कारकिर्दी नंतर परराष्ट्रमंत्र्याला हटविले गेले आहे. तैवान बद्दल चीन करीत असलेल्या हालचालींची माहिती तसेच चीन मधील अर्थव्यर्थवस्थेचे वास्तवचित्र, संकटे, आव्हाने ब्रिटिश गुप्तहेरखा त्याला मिळाली असण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे. ज्यामुळे किन गँग यांच्यावर संशयाची सुई वळल्यानेच त्यांची ताबडतोब परराष्ट्र मंत्रिपदावरून हकालपट्टी झाली असावी . चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या दि . २५ जुलै रोजी झालेल्या ’पॉलिट ब्यूरो’च्या मिटिंग टिं पाठोपाठ दि . २५ जुलै रोजी झालेल्या ’नॅशनल पीपल्स काँग्रेस कमिटी’च्या मीटिंगटिंनंतरकिन गँग याना हटविण्याची घोषणा करण्यात आली . चीन मधील कम्युनिस्ट पक्षाच्या अपारदर्शी कारभारामुळे, या अशा घटनांमागील सत्य जगासमोर येणे तसे अशक्यच! तरी अशा प्रकारे नामुष्कीजनक पद्धतीने आपल्याच देशाच्या परराष्ट्रमंत्र्याला बाजूला करण्याची वेळची नवर ओढवली , म्हणजे ही नक्कीच साधीसुधी गोष्ट नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे.


No comments:

Post a Comment