![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNLVaiScFCR59ITkrWUrcMnKg_Jr9IuLOa6TOPC-79WsOIIubi-XLPODjtdJ6AbmNdcWVmfG_K_plRMFtOS76zWWezyb0RJv6rkOUIDKlTXDCnZd9vKCF5hMfKYLVM4G9lS-Yha-Pum_SG/s320/Gawde-580x395-225x145.jpg)
![BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjGxQt-vm0AUa3FsfOTe6aAeUxh5GotmtaF85sfis78FYfCql3D-Gc75SVNui9SbhAonDJ3ev7clSwj-lkFc6WwU9RiPIckQNomT2egfLdlLPW_eF9QPYt_TuzgfHRStkYblKVgZVJP49S1/s840/COMBINED.jpg)
SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Saturday, 21 May 2016
लष्करातील जवान पांडुरंग गावडे यांना वीरगती -२०१६ मधे आता पर्यंत ३९ दहशतवादी मारण्यात आले आहेत.याची किंमत ९ सैनिकांचे बलिदान १९८८ पासुन २०१६ पर्यंत आतापर्यंत २३००७ दहशतवादी मारण्यात आले आहेत.याची किंमत ६१९५ अधिकारी आणि सैनिकांचे बलिदान
कुपवाडामध्ये पाच दहशतवादी ठार
रविवार, 22 मे 2016 -
हे.जैश-ए-मोहंमद संघटनेच्या दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेले भारतीय लष्करातील ‘राष्ट्रीय रायफल्स‘चे नायक पांडुरंग महादेव गावडे यांना आज (रविवार) वीरमरण आले.
जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागातील कुपवाडा जिल्ह्यात काल (शनिवार) जैश-ए-मोहंमदच्या अतिरेक्यांशी भारतीय जवानांची सुमारे नऊ तास चकमक चालू होती. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. 47 राष्ट्रीय रायफल्स, 41 राष्ट्रीय रायफल्स
संयुक्तपणे ही कारवाई केली होती. या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना 41 राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग महादेव गावडे, 47 राष्ट्रीय रायफल्सचे अतुल कुमार व इतर एक जवान हे गंभीर जखमी झाले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने गावडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सुपुत्र असलेले गावडे यांना हौतात्म्य आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पांडुरंग गावडे यांचे पार्थिव शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे.
पांडुरंग यांच्या चेहऱ्यावर गोळी लागली होती तर अतुल यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली होती. या दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत प्रथम ड्रगमुला येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर श्रीनगर येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले होते. तिथे उपचार घेत असतानाच आज पांडुरंग गावडे यांची प्राणज्योत मालवली.
अडीच महिन्यांचा मुलगा
आंबोली-मुळवंदवाडी (ता. सावंतवाडी) येथील पांडुरंग पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय रायफल्समध्ये भरती झाले होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा अवघा अडीच महिन्यांचा आहे. पांडुरंग यांच्या निधनाने गावडे कुटुंबासह आंबोली परिसरावरच शोककळा पसरली आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मी्रमधील कुपवाडा जिल्ह्यामध्ये सुरक्षारक्षकांबरोबर आज झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले. या वेळी दोन जवानही जखमी झाले. कुपवाडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने गावातील एका भागाला वेढा घातला. यानंतर शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी मारले गेले. या सर्व दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटायची आहे.
सैन्याचे अभिनंदन
२०१६ मधे आता पर्यंत ३९ दहशतवादी मारण्यात आले आहेत.याची किंमत ९ सैनिकांचे बलिदान
१९८८ पासुन २०१६ पर्यंत आतापर्यंत २३००७ दहशतवादी मारण्यात आले आहेत.याची किंमत ६१९५ अधिकारी आणि सैनिकांचे बलिदान
Fatalities in Terrorist Violence 1988 - 2016
' Incidents Civilians Security Force Personnel Terrorists Total
1988 390 29 1 1 31
1989 2154 79 13 0 92
1990 3905 862 132 183 1177
1991 3122 594 185 614 1393
1992 4971 859 177 873 1909
1993 4457 1023 216 1328 2567
1994 4484 1012 236 1651 2899
1995 4479 1161 297 1338 2796
1996 4224 1333 376 1194 2903
1997 3004 840 355 1177 2372
1998 2993 877 339 1045 2261
1999 2938 799 555 1184 2538
2000 2835 842 638 1808 3288
2001 3278 1067 590 2850 4507
2002 NA 839 469 1714 3022
2003 NA 658 338 1546 2542
2004 NA 534 325 951 1810
2005 NA 521 218 1000 1739
2006 NA 349 168 599 1116
2007 NA 164 121 492 777
2008 NA 69 90 382 541
2009 NA 55 78 242 375
2010 NA 36 69 270 375
2011 NA 34 30 119 183
2012 NA 16 17 84 117
2013 NA 20 61 100 181
2014 NA 32 51 110 193
2015 NA 20 41 113 174
2016 NA 2 9 39 50
Total* 47234 14726 6195 23007 43928
*Data till May 15, 2016
सागरी सामर्थ्यात नव्या अध्यायाची नांदी
- शशिकांत पित्रे
गुरुवार, 19 मे माझगाव डॉकमध्ये तयार झालेल्या "कलवरी‘ क्लावसच्या पहिल्या पाणबुडीने अलीकडेच समुद्रचाचणीसाठी प्रस्थान ठेवले. सर्व चाचण्या पूर्ण केल्यावर ती नौदलात दाखल होईल. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या आक्रमणशक्तीत लक्षणीय वाढ होणार आहे.
ऑगस्टा हेलिकॉप्टर प्रकरणाच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात तमाम जनतेच्या नजरेआड झालेली एक ठळक घटना म्हणजे माझगाव डॉकमध्ये बनवलेल्या "कलवरी‘ क्लाासच्या पहिल्या पाणबुडीचे समुद्रचाचणीसाठी प्रस्थान. जवळजवळ दीड दशकापूर्वी भारताने फ्रान्सच्या "डीसीएनएस‘ या प्रसिद्ध उद्योगाच्या साह्याने भारतीय नौदलासाठी सहा "कलवरी‘ क्लारस स्टेल्थ पाणबुड्या माझगाव डॉकमध्ये उभारण्याचा "पी 75‘ नामक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला; पण वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची प्रगती वारंवार खुंटत गेली. अखेरीस त्यातील पहिली पाणबुडी - "कलवरी टायगर शार्क‘ पूर्णतः तयार झाल्यावर वेगवेगळ्या अंतिम चाचण्यांसाठी अरबी समुद्रात प्रविष्ट झाली. अपेक्षित चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ती भारतीय नौदलात दाखल होईल. "कलवरी‘ क्ला्सच्या या सहा आक्रमक पाणबुड्या (अटॅक सबमरीन्स) नजीकच्या भविष्यात उपलब्ध झाल्यावर भारतीय नौदलाच्या आक्रमणशक्तीत लक्षणीय वाढ होणार आहे.
कोणत्याही नौदलाच्या सामर्थ्याची तीन परिमाणे असतात. समुद्रतळावर तरंगणाऱ्या फ्रिगेट, विनाशिका, कॉरव्हेट वगैरे लढाऊ नौका; शत्रूच्या नौदलावर आकाशमार्गे हल्ला करण्यासाठी विमानवाहू नौकांवरून समुद्रावर उड्डाण करणारी नौदलाची विमाने; आणि पाण्याखाली संचार करू शकणाऱ्या पाणबुड्या. यातील प्रत्येकाचा सहभाग समसमान; परंतु पाण्याखाली गुप्तपणे वावरत अचानक अवतरून शत्रूच्या महाकाय लढाऊ नौकेवर जोरदार हल्ला चढवणारी चपळ पाणबुडी या तिन्हींमध्ये सर्वाधिक भीतिप्रद. याबरोबरच देशाच्या अण्वस्त्रसज्जतेनंतर पाणबुडीला आणखी एक बिनीचा मानदंड लाभला आहे. अण्वस्त्रवाहक प्रक्षेपणाचा मारा आकाशमार्गे, जमिनीवरून किंवा पाण्याखालून केला जाऊ शकतो. परंतु, यातील सर्वाधिक सुरक्षित पर्याय म्हणजे पाण्याखाली दडवलेल्या क्षेपणास्त्राचा. त्याचे कारण एकदा का अण्वस्त्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेला, की सर्वांत अग्रगण्य लक्ष्य म्हणजे शत्रूने अण्वस्त्रे ठेवलेली ठिकाणे (सायलो). आधुनिक तंत्रज्ञानामुळे जमिनीवरील या साठ्यांचा वेध घेणे अशक्ये राहिलेले नाही; परंतु हेच अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र समुद्रतळाखाली गुप्तपणे वावरू शकणाऱ्या आणि आपले स्थान वेगाने बदलू शकणाऱ्या चपळ पाणबुडीवर ठेवले, तर ते शत्रूच्या आवाक्यारबाहेर राहील आणि आपल्या इच्छेनुसार योग्यवेळी त्याचा उपयोग करता येईल.
भारताचे दोन्ही प्रतिस्पर्धी भारताप्रमाणेच अण्वस्त्रसज्ज आहेत. त्यापैकी चीनची अण्वस्त्रक्षमता अतुलनीय आहे. परंतु, भारत आणि पाकिस्तान सर्वसाधारणतः समसमान आहेत. त्यापैकी भारत आणि चीन या दोघांनी "आपण अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही‘ ("नो फर्स्ट यूज‘) असे जाहीर केले आहे. परंतु, पाकिस्तानने मात्र या धोरणाशी स्पष्ट असहमती दर्शवली आहे. त्याचे कारण स्पष्ट आहे. अण्वस्त्रवापराच्या धमकीखाली दहशतवादी कृत्यांनी भारताला जर्जर करणे, हा पाकिस्तानच्या सामरिक धोरणाचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच पाकिस्तानने आपल्यावर पहिला अण्वस्त्र हल्ला (फर्स्ट स्ट्राइक) केला, तर आपली अण्वस्त्रे सुरक्षित राखून त्याच्यावर आपण प्राणघातक प्रतिहल्ला चढवू शकतो (सेकंड स्ट्राइक) ही जरब प्रतिस्पर्ध्याला बसवणे अत्यावश्यसक आहे आणि हे उद्दिष्ट केवळ पाणबुडीच साधू शकते.
माझगाव डॉकने याबाबतीत लक्षणीय योगदान दिले आहे. स्वतःच्या युद्धनौका स्वदेशात बनवणाऱ्या, हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यात देशांच्या यादीत भारताने सात फेब्रुवारी 1992 रोजी "आयएनएस शल्की‘ माझगाव डॉकमध्ये उभारून प्रवेश केला. त्यानंतर माझगाव डॉक लिमिटेडने "लिअँडर‘ आणि "गोदावरी‘ क्ला्सच्या फ्रिगेट, "कुकरी‘ क्लाेसच्या कॉरव्हेट, "दिल्ली‘ आणि "कलकत्ता‘ क्ला सच्या विनाशिका आणि "शिवालिक‘ क्ला‘सच्या स्टेल्थ फ्रिगेट बनवल्या आहेत. त्याबरोबर "सिंधुघोष‘ क्ला‘सच्या रशियन बनावटीच्या नऊ पाणबुड्या आणि "शिशकुमार‘ क्लागसच्या जर्मन बनावटीच्या चार पाणबुड्याही उभारल्या. या सर्व युद्धनौका भारतीय नौदलात कार्यरत आहेत. या सर्वांत माझगाव डॉकच्या शिरपेचातील सर्वांत मानाचा तुरा म्हणजे त्यांनी उभारलेली भारताची पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी "आयएनएस अरिहंत‘. या प्रकल्पात चार पाणबुड्यांचा समावेश आहे. "अरिहंत‘ म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ! पहिल्या "अरिहंत‘ पाणबुडीचा भारतीय नौदलात 23 फेब्रुवारी 2016 रोजी प्रवेश झाला. त्यावरून भारतीय बनावटीची बारा के- 5 सागरिका क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात.
अठरा हजार कोटी रुपयांचा "ऍडव्हान्स टेक्नॉपलॉजी व्हेसल‘ (एटीव्ही) प्रकल्प 2001 मध्ये हाती घेण्यात आला. त्यासाठी अणुऊर्जेवर चालणारी भारतीय बनावटीची छोटेखानी अणुभट्टी बनवण्यात भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरने (बीएआरसी) अमूल्य सहकार्य दिले. अशा प्रकारची अणुऊर्जित पाणबुडी बनवणाऱ्या रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स या पाच अण्वस्त्रशक्तींनंतर भारत हा सहावा देश आहे. "अरिहंत‘च्या पाठोपाठ "आयएनएस अरिदमन‘ माझगाव डॉकमध्ये आकार घेत आहे. या वर्गाच्या चारही पाणबुड्या 2023 पर्यंत भारतीय नौदलामध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. या अणुऊर्जित पाणबुड्यांवरील अधिकारी आणि जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी भारताने रशियाकडून "अकुला‘ क्ला सची "आयएनएस चक्र‘ ही पाणबुडी याआधीच भाडेतत्त्वावर घेतली आहे. अशा प्रकारे भारतीय नौदलाच्या दोन विमानवाहू नौका, नऊ "एलएसटी‘, दहा विनाशिका, 14 फ्रिगेट्स, 14 कॉरव्हेट्स, गस्त घालण्यासाठी 10 ऑफशोअर नौका, चार फ्लिट टॅंकर, एक अणुऊर्जित पाणबुडी आणि 14 इतर पाणबुड्यांच्या लढाऊ ताफ्यात आता सहा "कलवरी‘ क्ला,सच्या पाणबुड्या आणि तीन अणुऊर्जित पाणबुड्यांचा समावेश पुढील आठ-दहा वर्षांत होणार आहे. हा शस्त्रसंभार म्हणजे भारताच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी लक्षणीय प्रतिरोधशक्ती आहे, यात शंका नाही.
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात दिवसेंदिवस होणाऱ्या या लक्षणीय वाढीबाबत आणि त्यात माझगाव डॉकने केलेल्या तंत्रज्ञानातील असामान्य योगदानाबद्दल फार थोड्यांना कल्पना असेल. "कलवरी‘ पाणबुडीच्या प्रवेशाने आपल्या देशासाठी एका नव्या स्फूर्तिदायक अध्यायाची नांदी झाली आहे.
माऊंट एव्हरेस्ट लष्कराने जिंकले
माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर सर करण्याचा मान भारतीय लष्कराच्या गिर्यारोहकाच्या तुकडीने गुरुवारी मिळवला.
काठमांडू- माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर सर करण्याचा मान भारतीय लष्कराच्या गिर्यारोहकाच्या तुकडीने गुरुवारी मिळवला. विशेष म्हणजे हवामान चांगले असल्याचा फायदा घेऊन जवळपास १५० गिर्यारोहकांनी जगातील अत्युच्च शिखर सर केले. लष्कराच्या या यशस्वी मोहिमेचे लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी कौतुक केले.
लेफ्टनंट कर्नल रणवीर जामवाल यांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या गिर्यारोहण पथकाने माऊंट एव्हरेस्ट जिंकले. सकाळी ६.०७ वाजता हा पराक्रम त्यांनी केला, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी दिली. ३० मार्च रोजी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एम. एम. राय यांनी लष्कराच्या गिर्यारोहण मोहिमेला झेंडा दाखवला होता.
लेफ्टनंट कर्नल जामवाल हे नामवंत गिर्यारोहक आहेत. गेल्यावर्षी भूकंप झाला तेव्हा ते एव्हरेस्ट बेसकॅम्पवर होते. लष्करी पथकाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मदत व बचाव कार्य हाती घेतले, असेही ते म्हणाले. दरम्यान, नेपाळने यंदा एव्हरेस्टसाठी २८९ परवाने दिले आहेत. ही मोहीम एप्रिल ते मे अखेपर्यंत पूर्ण करता येते.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNLVaiScFCR59ITkrWUrcMnKg_Jr9IuLOa6TOPC-79WsOIIubi-XLPODjtdJ6AbmNdcWVmfG_K_plRMFtOS76zWWezyb0RJv6rkOUIDKlTXDCnZd9vKCF5hMfKYLVM4G9lS-Yha-Pum_SG/s320/Gawde-580x395-225x145.jpg)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment