Total Pageviews

Wednesday, 21 May 2014

आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे-ब्रिगेडिअर हेमंत महाजन युद्ध-सेवा-मेडल भारताची अंतर्गत सुरक्षेची अवस्था – भारतास भेडसावणारे पाच धोके काश्मीरचा वापर भारतप्रवेशाचे महाद्वार म्हणून करून घेण्याचा निर्धार इस्लामाबादने केलेला आहे. भारतास भेडसावत असणारे पाच मुख्य धोके पुढीलप्रमाणे आहेत. १. माओवाद/ नक्षलवाद/ डावा दहशतवाद २. ईशान्येचे बांगलादेशीकरण ३. किनारी प्रदेशातील दहशतवाद ४. काश्मीरमधील छुपे युद्ध ५. समाजाचे मूलतत्त्वीकरण/ जातीय दंगे जम्मू-आणि-काश्मीरमधील छुपे युद्ध सुरक्षादले, प्राथमिकतः भारतीय भूदलाने स्वातंत्र्यप्राप्तीपासून जम्मू-आणि-काश्मीरचा प्रत्यक्ष ताबा राखलेला आहे. राज्यातून जर भूदलास काढून घेतले तर, कितीही पोलीस, निमलष्करी दले दिली तरी ती राज्य सांभाळू शकणार नाहीत. राजकारणी आणि नोकरशहा ह्यांनी परिस्थितीवर तोडगा काढण्याकरता काहीही केलेले नाही. त्यामुळे धोका अनेक पटींनी वाढलेला आहे. काश्मीर खोर्यादतील निरनिराळ्या हुरियत कॉन्फरन्सच्या मोर्चांतून आणि दगडफेकी आंदोलनांतून, हजारोंच्या संख्येने येणार्या्, लष्कर-ए-तय्यबा, हिज्बुल-मुजाहिद्दीन, ऑल-पार्टीज-हुरियत-कॉन्फरन्स ह्यांच्या समर्थकांद्वारे फडकविल्या जाणार्या झेंड्यांनीच हा धोका प्रदर्शित होत असतो. शांतता प्रयत्नांच्या बुरख्याआड, पाकिस्तानच्या साहाय्याने, लष्करी-गुप्तवार्ता-आस्थापने शस्त्रास्त्रसज्ज घुसखोरांना काश्मिरात घुसवतच आहेत. सध्या ते दबा धरून आहेत, भारतीय संघराज्यावर अनेक आघाड्यांवर क्रूर-हिंसक-हल्ले करण्याच्या सुयोग्य संधीची वाट पाहत आहेत. हुरियत कॉन्फरन्सने आयोजित केलेल्या मोर्चांमधून अशा सूप्त शक्तींनी डोके वर काढले होते. पिपल्स-डेमॉक्रॅटिक-पार्टी आणि नॅशनल-कॉन्फरन्स ह्यांमधील राष्ट्रविरोधी राजकारण्यांकडून अशा शक्तींना सशक्त समर्थन मिळत असते. त्याचवेळी, इस्लामाबादेच्या मार्गदर्शनाखाली खेळल्या जात असलेल्या मनोवैज्ञानिक युद्धप्रयासांचा एक भाग म्हणून, ह्या वा त्या मुद्द्यावरून, भारतीय भूदलाची प्रतिमा मलीन करण्याची एक मोहीमही सुरू आहे. एवढी युद्धे आणि दहशतवादाची निर्यात करूनही इस्लामाबादला काश्मीर जिंकून घेता आलेले नाही, ह्याचे कारण भारतीय भूदलच आहे. त्यामुळेच, काश्मीर मधून निर्लष्करीकरणाबाबतची बोलणी आणि भूदल-विशेषाधिकार-कायदा रद्द करण्याची मोहीम, काश्मीरबाबतची त्यांची उद्दिष्टे साध्य करण्याचे केवळ बहाणे आहेत. काश्मीरमधील स्वातंत्र्य-लढ्याच्या बुरख्याआडचा इस्लामिक दहशतवाद हा, म्हणूनच संपूर्ण देशास अस्थिर करणारा आहे. काश्मीरचा उपयोग उर्वरित भारताकरताचे प्रवेशद्वार म्हणून करून घेण्याचा इस्लामाबादचा निर्धार आहे. हे पुस्तक, काश्मिरातील छुप्या युद्धावरील सम्यक समाधान शोधून काढण्याबाबतचे आहे. भारतासमोरील इतर सुरक्षा-आव्हाने १. पंथीय आणि जातीय हिंसाचार २. संघटित गुन्हेगारीः चित्रपट, बांधकाम उद्योग, इतर, आंतरराष्ट्रीय संबंध ३. अवनती: आजवर २०० आय.एस.आय.गटांचा शोध घेऊन त्यांचा नायनाट केला गेलेला आहे. अवनतीप्रत पोहोचलेले राजकारणी, नोकरशाही, पोलीस हेही आहेत ४. अति-महत्त्वाच्या-व्यक्तींना दिल्या जाणार्याह सुरक्षेस दिले जाणारे अतिरेकी महत्त्व. ५० ते ६०% पोलीसबळ ह्याकरता वापरले जाते, ज्यामुळे सामान्य माणसांच्या सुरक्षिततेस दहशतवादी, नक्षलवादी आणि गुन्हेगारांवर सोडून दिले जात असते. दहशतवादाची नवीन स्वरूपे १. सायबर दहशतवाद २. प्रारणशास्त्रीय-प्रसार-साधने (रेडिओलॉजिकल-डिस्पर्सल-डिव्हायसेस - आर.डी.डी.एस.) ३. भारतीय आण्विक आस्थापनांना असलेला धोका ४. भारताच्या किनारी संपत्तीस (किनार्याेवरील तेलफलाट, व्ही.एल.सी.सी.सारखी प्रचंड तेलवाहू जहाजे, आकर्षक व्यापारी लक्ष्ये) असलेला धोका ५. जैव आणि आण्विक दहशतवाद ६. दहशतवादी ई-मेल्स, एस.एम.एस. भारतीय सुरक्षेस असलेले गैर-लष्करी धोके १. शासनविहीनता २. मूलतत्त्ववाद ३. अन्न-सुरक्षा ४. ऊर्जा-सुरक्षा ५. पाणी-सुरक्षा ६. अंमली पदार्थांची युद्धे ७. तंत्रज्ञान नियंत्रक राजवटी ८. भ्रष्टाचार ९. अपयशी ठरणार्यां संस्था, नोकरशाही, न्यायव्यवस्था, पोलीस उपाय सर्व राजकीय पक्षांचा सुरक्षिततेकरताचा सामायिक किमान कार्यक्रम असणे आवश्यक आहे. हे पुस्तक माधवी-प्रकाशन-पुणे येथे, खालील पत्त्यावर विक्रीस उपलब्ध आहे. किंमत रु.२२५/-. चंद्रशेखर जोशी,दत्तकुटी, १४१६ सदाशिवपेठ, पुणे ४११०३०,दूरध्वनीः २४४७४७६२, २४४७५३७२, भ्रमणध्वनीः ९३२५०९७८९४,ई-मेलः madhavipublisher@gmail.com

No comments:

Post a Comment