Total Pageviews

Friday 2 May 2014

BODO VIOLENCE ASSAM AJMAL BADRUDDIN OLD ARTICLE

बांग्लादेशी घुसखोरांच्या काँग्रेसी लाडाने आसाम पेटले,पुर्वांचल हादरले बोडो दहशतवाद्यांचे आसाममध्ये थैमान; 23 ठार गुवाहाटी - आसाममधील कोक्राझार आणि बाक्सा या धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या दोन जिल्ह्यांत काल (गुरूवार) रात्रीपासून नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट बोडोलॅंडच्या (एनडीएफबी) दहशतवाद्यांच्या हिंसाचारात महिला आणि मुलांसह किमान 23 जण ठार तर 14 जण गंभीर जखमी झाले. केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी आज मुख्यमंत्री तरूण गोगोई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. या घटनेत सहभागी असलेल्यांविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. कोक्राझार आणि बास्का जिल्ह्यांत अतिरिक्त दलांना पाठविले जाईल, असे गोगोई यांनी स्पष्ट केले. निमलष्करी दलाच्या सुमारे 1 हजार जवांनाना कोक्राझारमध्ये पाठविण्यात आले आहे. कोक्राझार आणि बाक्सा जिल्ह्यांत दिसताक्षणी गोळी झाडण्याचे (शूट ऍड साईट) आदेश देण्यात आले आहेत, तर चिरांग जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बाक्सा जिल्ह्यात आज सायंकाळी 6 वाजल्यापासून उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज सकाळी 40 बोडो दहशतवाद्यांनी एके-47 रायफलींसह कोक्राझार जिल्ह्यातील बालापारा गावातील तीन घरांत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये सात जण जागीच ठार झाले. आसामचे पोलिस अधिकारी आर. एल. बिश्नोई यांनी सांगितले, की मृत सात लोकांमध्ये दोन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे. दरम्यान, नंतर एका तीन वर्षाच्या मुलाचाही मृतदेह नंतर सापडला. यामध्ये 13 लोक गंभीर जखमी झाले आहेत. (इंट्रो)१९ जुलै पासून आसामच्या कोक्राझारसह बोडोलँड स्वायत्त परिषदेच्या भागात बांग्लादेशी घुसखोरांनी आरंभलेल्या तालिबानी हिंसाचारामुळे लाखो भूमीपुत्र बेघर झाले आहेत.बोडो जनजातीला हुसकावून लावले आहे. मूळ निवासिंची गावच्या-गाव लुटून त्यावर नियंत्रण मिळवून देश तोडण्याच्या हुजी,आयएसआय व आयएमच्या भारतविरोधी व्यापक धोरणाचा हा एक भाग मानला जात आहे.काश्मीर खोऱ्यातून पंडितांची ज्या सुनियोजित प्रकारे हकालपट्टी केली गेली; त्याच प्रकारे बांग्लादेशी घुसखोरीला समर्थन देऊन सुरवातीला आसाम व त्यांनतर पूर्वांचल हडपण्याची योजना आहे. गेली सुमारे २ आठवडे होत असलेला बोडो विरोधी अत्याचाराला राज्यातील कोंग्रेस सरकारच जबाबदार असल्याचे मेघालयाचे राज्यपाल रणजीत शेखर मुशहरी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.घुसखोरांकडून अश्या प्रकारचे घातपात होणार असल्याची माहिती सरकारला असताना मूळनिवासींना संरक्षण दिले नाही असे राज्यपाल मुशहारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर एका महत्वपूर्ण राष्ट्रीय समस्येचा घेतलेला वेध............. बांग्लादेशी घुसखोरीने आसामची सर्वसामान्य जनता भयग्रस्त झाली आहे.विशेषतः बोडो जनजातीवर हिंसक आक्रमण झाले आहे.आणखी एका फाळणीची मूळ वेगाने पसरता आहेत.१९५२ साला पासून बोडो विरुद्ध भारत विरोधी मुसलमान असा दंगा झाला होता.तेथूनच स्वदेशी विरुद्ध आक्रमक परकीय अश्या चकमकी वारंवार घडत आहेत.परन्तु असे घुसखोर "पाक" असल्याने त्याविरोधात ठोस भूमिका घेणे पंडित नेहरू या शान्तिदुताला आवश्यक वाटले नाही."नेहरू डॉकट्रीन" आदर्श मानून सर्वांनी त्याची री ओढली गेली.परिणामी, पुर्वांचल व तेथील समस्या दुर्लक्षित राहिल्या.नागरिकांना मुख्यधारेत आणण्याचे प्रयत्न झाले नाही.किंबहुना,उर्वरित देशाविषयी स्थानिक जनजातींची "वेगळी" मानसिकता निर्माण झाली.राष्ट्रविरोधी शक्तींना तेथे काम करणे सोपे झाले.विदेशी चर्चच्या जोडीला जिहादी इस्लामिक वृत्तीची साथ मिळाली.धर्मांतर,सांस्कृतिक आकुंचन,गाव-जमीन ताब्यात घेणे,मूलनिवासिंना हुसकावणे आणि वेगळ्या स्वतंत्र भूमीची मागणी करणे असा अ-राष्ट्रीय प्रवास राजकारणी व प्रशासन यांच्या सोयीस्कर(?) भूमिकेने सुरु आहे.ताजा हिंसाचार हा त्याचाच एक भाग आहे.घटना मोठी असल्याने देशात सर्वत्र पोहचली. १९९३,१९९४,२००८ साली असेच घूसखोर पुरस्कृत मोठे दंगे झाले होते.१९८३ ते १९८५ दोन वर्ष आसाममध्ये बांग्लादेशी घुसखोरी विरोधात मोठे आंदोलन झाले होते.त्यातून घुसखोरीची भीषण समस्या देशासमोर आली होती.अभाविपने याबाबत देशव्यापी जनजागरण केले होते. आंदोलन करणाऱ्या प्रफुल्लकुमार महंत व त्यांच्या सहकार्यांना या मुद्यावर सत्ता मिळाली होती. सत्ता मिळाल्यावर आसाम गण परिषदेची राजवट घुसखोरांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवू शकली नाही. मात्र; रा.स्व.संघ,वनवासी कल्याण आश्रम,विहिंप यांच्यासह पुर्वांचलातील विविध देशप्रेमी स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक विविध जनजाती यांनी या घुसखोरांना विरुद्ध कायदेशीर लढाई चालवली आहे.विशेष म्हणजे न्यायालयनेही घुसखोरांना तात्काळ हुसकावून लावण्याचे आदेश दिले आहेत.परंतु, काँगेसचे "अल्पसंख्याक(?) लांगुलचालन धोरण" आणि "मतपेटीचे राजकारण" यातून सत्ता हस्तगत करणे यामुळे घुसखोरी निर्विघ्नपणे सुरु आहे.घुसखोरीद्वारे भारतविरोधी आंतरराष्ट्रीय तत्व एकत्रितपणे पूर्वांचलातील बहुतांश जनजातींच्या विरोधात सातत्याने हिंसक कारवाया करत आहेत.यासाठी लागणार मेंदू,पैसा,मनुष्यबळ सीमेपलीकडून येत असल्याचे आसाममधील अनेकांचे स्पष्ट मत आहे. १९ जुलै रोजी झालेली दंगल ही ऑल मायनोरीटी स्टुडनट्स युनियन(एएमएसयु) आणि ऑल बोडोल्यांड मायनोरीटी स्टुडनट्स युनियन(एबीएमएसयु) यांच्या आपसातील वादातून झाली असल्याचे चित्र आहे. १९ जुलै रोजी एबीएमएसयुचा अध्यक्ष मोहिबुल इस्लाम आणि त्याचा सहकारी अब्दुल सिद्दिक शेख यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन बंदुकधारी इसमांनी गोळीबार केला. विशेष म्हणजे गोळ्या गुडघ्याखाली झाडल्या.ही घटना कोक्राझार शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मगुरमारी या गावात घडली.मोहिबुल इस्लामवर गुन्हेही दाखल झालेले आहेत.याचा फायदा बांग्लादेशी घूसखोर मुस्लिमांनी त्वरित उठविण्याचे योजले. बोडोंवर कुऱ्हाड कोसळली.सुलतानी संकटाने बोडो घेरले गेले. २० जुलै रोजी घुसखोरांच्या जमावाने बोडो जनजातीच्या चारजणांची अमानुष कत्तल केली.त्यांचे असे तुकडे केली की त्यांची ओळख पटणे मुश्कील झाले.गोसईगाव ओनथईबरी येथील पुरातन ब्रह्मा मंदिर जाळण्यात आले.आणि त्यानंतर घूसखोर समूहाने बोडो विरोधी दंगा पेटवत गेले.पोलिसांच्या बंदुका हिसकावून,संचारबंदी झुगारून कोक्राझार,बक्सा,चिरांग,उदालगुडी आदि परिसरातून त्यांनी बोडोना उद्वस्त केले.धुब्री येथे हिंदू मुलांचे वसतीगृह जाळण्यात आले.२४ जुलै रोजी राजधानी एक्सप्रेसवर हल्ला झाला.हा घुसखोरांचा भारतविरोधी वणवा तब्बल ४०० खेड्यात पसरला आहे.सुमारे लाखो भूमिपुत्र बेघर झाले आहेत.यासर्व घटना एका विशिष्ट सूत्राचा भाग आहे असे आसाममध्ये प्रकाशित झालेल्या निवेदनातून स्पष्ट दिसते. दोन वर्षापूर्वी होवरियापेट गावातील काली मंदिराच्या जागेत आक्रमण करून मदरश्यासाठी शौचालय बांधण्याचा पर्यंत झाला होता.त्यावेळी मोठे आंदोलन झाले होते.२ बंगाली हिंदू तरुण आंदोलकांची हत्या केली गेली.एका अन्य घटनेत एका घूसखोर मुस्लीम तरुणाने एका घरात घुसून एका मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.संतप्त जमावाने त्याला मारहाण केली. दरम्यान काही मुस्लीम युवक आले आणि त्यांनी या तरुणाला ठार केले.मुस्लीम तरुणाच्या मृत्यूच्या निषेधार्थ घुसखोरांनी भूमिपुत्रांची घरे जाळून त्यांना गावातून हाकलून दिले.बाजारातील किरकोळ वादातून आदिवासिंची घरे पेटवली गेली.या सगळ्या घटनांच्या मागे मुस्लीम युनायटेड लिबरेशन टायगर्स ऑफ आसाम ही संघटना असल्याचे अनेकांचे मत आहे. बोडोलँड टेरीटोरियल कौन्सिलचे मुख्य कांपा बोर्गोयारी यांनी या दंगलीला बांग्लादेशातून होणारी घुसखोरी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.त्यांनी एका पत्रकार परिषदेत निवेदन दिले आहे.आसामच्या सीमेलगत असलेल्या बांग्ला देशातून घुसणारयानी स्थानिक जनतेच्या अस्तित्वाला आव्हान दिले आहे असे बोर्गोयारी यांनी सांगितले आहे.बोडोलँडचे गठन केले पण पुरेसे अधिकार दिले नाहीत अशीही टीका त्यांनी केली आहे.एआययुडीएफचे आमदार बद्रुद्दिन अजमल यांनाही त्यांनी जबाबदार धरले आहे. बोडोलँड पिपल्स प्रोग्रेसिव्ह फ्रंटने केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करताना घुसखोरी बोडोंच्या मूळावर उठल्याचे म्हटले आहे.हीच भूमिका उल्फा गटाचे मृणाल हजारिका यांनी घेतली आहे.या दंगलीकरिता बांग्ला देशातून मोठ्या प्रमाणात शस्त्र बोटीतून ब्रह्मपुत्रा नदीतून धुब्री येथे आणली गेली.ही बाब राज्य सरकारने गंभीरपणे घेतलेली नाही;असेही त्यांनी म्हटले आहे.बोडो टेरीटोरिअल कौन्सिलचे हग्रमा मोहिलारी यांनीही बांग्लादेशी घुसखोरी हेच अशांततेचे कारण असल्याचे म्हटले आहे.वरील सर्व घटनाक्रम आणि वक्तव्य सीमा असुरक्षित असल्याचे सिद्ध करतात. यात युनायटेड मुस्लीम न्याशनलीस्ट आर्मी(युएमएनए)हा नवा पैलू आता जोडला गेला आहे.बोडो ल्यांड टेरीटेरी वेलफेअरचे जनमोहन माशेहारी यांनी या आर्मीला राज्यातील १३ मुस्लीम बहुल जिल्हे स्वतंत्र भूमी म्हणून हवी असल्याचे म्हटले आहे.ही आर्मी जबरदस्ती कर वसुली करता आहे.यासाठी संपूर्ण सिमावर्ती भागातून बोडोना नष्ट केले जात आहे.आता पुनर्वसन करताना विशेष खबरदारी घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.१९७१ च्या मतदारयादीत ज्यांची नावे आहेत,ज्यांच्या नावावर जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे आहेत,ज्यांची नवे न्याशनल रजिस्ट्रार ऑफ सिटीझन मध्ये आहेत अश्यांचेच पुनर्वसन करावे अशी मागणी जनमोहन माशेहारी यांनी केली आहे.तसेच,धुब्री हा सीमावर्ती भाग बफरझोन म्हणून वापरण्याची योजना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान सध्या सुरु झालेल्या पुनर्वसन शिबिरातही घुसखोरी करून सरकारी मदत मिळविण्याचे सामुहिक प्रयत्न पद्धतशीरपणे होत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे.बेघरांच्या आकडेवारीची उलट-सुलट चर्चा आहे.२४४ गाव,५००० घर बेचिराख झाल्याची नोंद आहे.तर विस्थापितांचा आकडा ४ लाख,१.५ लाख,आणि ७० हजार असा आहे. आसाम मधील ४२ विधानसभा या मुस्लीम बहुल आहेत.सुमारे ८१ लाखापेक्षा अधिक मुस्लिमांची संख्या आहे.एकूण ३१% प्रमाण आहे.काही ठिकाणी हे प्रमाण ७५ % आहे.२००१ साली दंगलग्रस्त भागातील मुस्लीम-हिंदू प्रमाण ७५ : २५ होते. ते आता ८०:२० झाले आहे.यातील बहुतांश बांग्लादेशी घूसखोर आहेत.या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारची भूमिका बोटचेपी आहे.पंतप्रधान मनमोहनसिंग यांची आसाम भेट निव्वळ उपचार होता.केवळ सरकारी धर्मनिरपेक्ष देखावा उभा केला गेला.तरुण गोगाई यांचे सरकार सत्ता टिकविण्यासाठी फुटीरतावादी संघटना व घूसखोर याबात ठोस भूमिका घेत नसलयाचे जाणवते. आंतरराष्ट्रीय संरक्षण व कुटनीतीज्ञ बी.रमण यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.घुसखोरीला राजकारणी व प्रशासन यांचा आशीर्वाद असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.विदेशी स्वयंसेवी संस्था व इस्लामिक देशातील संघटना या घुसखोरीचे समर्थन करता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.भारत व बांग्लादेश सीमेवर सर्वत्र तातडीने कुंपण घालणे आणि प्रत्येक घुसखोराला शोधून हाकलून देणे हाच उपाय आहे.घुसखोरी नियमांत बसविणे हा मार्ग नाही;असे रमण यांचे म्हणणे आहे. दरम्यान,पूर्वांचलातील ५० विविध जनजाती संस्था या जिहादी घुसखोरांविरोधात एकत्र आल्या आहेत.१९५१ च्या आधारे न्याशनल रजिस्टार ऑफ सिटीझन नव्याने तयार करावे.कोणाही परक्यांना यात स्थान देऊ नये.सीमा सुरक्षेचे प्रभावी उपाय योजावे,संवेदनशील भागावर विशेष लक्ष द्यावे आणि मूळ निवासिंना संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.या संस्थांचे असे राष्टीय उद्दिष्टा करिता एकत्र येणे हे आपत्तीत सुचिन्ह मानले पाहिजे. या त्यांच्या भूमिकेला सरकार व प्रशासनाने पाठबळ देण्याची गरज आहे. भाजपचे जेष्ठ नेते,देशाचे माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी हा संघर्ष स्वदेशी विरुद विदेशी असा असल्याचे म्हटले आहे.पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन या विषयावर राष्टीय सहमती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यासाठी भाजप संसदेत पुढाकार घेईल असे त्यांनी म्हटले आहे.भाजपने या राष्ट्रसुरक्षेच्या मुद्यावर देशभर "इश्यू-बेस्ड" चळवळ उभारलयास एक दुर्लक्षित विषय माहित होईल.पूर्वांचल व तेथील विविध प्रश्न आणि पैलु अजेंड्यावर आणणे गरजेचे आहे. मकरंद सुधाकर मुळे

No comments:

Post a Comment