बोडालॅन्ड वाचवा: देश वाचवा!
आसाम हिंसाचाराचे राजकारण
बोडो बंडखोरांचा अलीकडेच आसामच्या कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यांत हिंसाचार या पार्श्वडभूमीवर राज्य सरकारने बांगलादेशीना स्वरक्षणासाठी शस्त्र उपलब्ध करून देण्याचा अफलातून निर्णय घेतला.बोडो बंडखोरांचे प्राबल्य असलेल्या भागांमधील बांगलादेशीनी स्वरक्षणाकरिता शस्त्र परवाना प्राप्त करण्यासाठी अर्ज करावेत’, असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले .भविष्यात अशा हल्ल्यांपासून बांगलादेशीना स्वत:चे रक्षण करणे शक्य व्हावे यासाठी त्यांना शस्त्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारचे मत आहे. मुस्लिमांनी शस्त्र परवान्यांसाठी शक्य तितक्या लवकर अर्ज करावे, असे राज्याचे वनमंत्री रकीबुल हुसेन यांनी सांगितले.आज आसाममध्ये ४०-४५ % मतदार बांगलादेशी आहेत.बांगलादेशी नागरिकांना स्वसुरक्षेची हमी देण्यासाठी थेट त्यांच्या हातात शस्त्र सोपविण्याची नामी शक्कल हुशार नेत्यांनी शोधून काढली आहे. नेमक्या बांगलादेशी घुसखोरांच्या रक्षणार्थ ही शक्कल लढवायला अन् ती अमलात आणायला कसे सरसावले हुशार राजकारणी? काश्मीरच्या बाबतीत कधीच कुणाला का नाही आठवला हा उपाय?उलटे किश्तवार दंग्यानंतर व्हिलेज डिफ़ेंन्स कमिटीची शस्त्रे काढून घेण्यात आली.
केंद्रात सत्तेवर आल्यानंतर देशात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना हाकलून लावू, अशी भूमिका नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर पश्चिलम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘बांगलादेशी नागरिकांना हात लावूनच दाखवा,’ असे आव्हान मोदी यांना दिले.असा इशारा ममता बॅनर्जींनी देऊन बांगलादेशी मतदारांच्याप्रति सहानुभूतीची लाट निर्माण केली.कारण साफ़ आहे पश्चिनम बंगालमध्ये सध्या ४०% मतदार बांगलादेशी आहेत.हा हिंसाचार म्हणजे व्होटबँकेच्या राजकारणाची फलश्रुती आहे.
घुसखोर,भूमिपुत्र बोडो यांच्यातील संघर्ष
No comments:
Post a Comment