Total Pageviews

Tuesday, 16 October 2012

आदर्श’ दिलासा आणि saamna agrlekh
‘इत्तेहादुल’चा धोका!
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत नांदेडकरांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. ८१ सदस्य संख्या असलेल्या नांदेड महापालिकेत ४१ जागा जिंकून कॉंग्रेसने बहुमत मिळवले आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं ‘महायुती’ने १६ जागा जिंकून आपली चमक दाखवली. शिवसेनेचे १४ तर भाजपचे २ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेपुरते बोलायचे तर मागच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ११ शिलेदार निवडून आले होते. यावेळी शिवसेनेचे ३ नगरसेवक वाढले. नवनिर्माण पक्षही येथे नशीब अजमावायला म्हणा किंवा अस्तित्व दाखवायला उभा होता. पण नांदेड-वाघाळाकरांनी त्यांना साफ झिडकारले आहे. लोकांचा हा कौल आहे. त्यामुळे जिंकलेल्यांना व हारलेल्यांनाही तो स्वीकारावाच लागतो. ‘कमाल’ आहे ती कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची. महागाई आणि भ्रष्टाचार यामुळे कॉंग्रेसची देशभर छी-थू होत असताना त्यांनंी महापालिका जिंकली. तिकडे पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव काठावर निवडून येतात. कॉंग्रेसचेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री बहुगुणा यांचे चिरंजीव सपशेल पराभूत होतात आणि नांदेडची जनता मात्र कॉंग्रेसचे सगळे अपराध पोटात घालून अशोक चव्हाणांचा ‘हात’ हातात घेते, याचा ‘अर्थ’ कसा लावायचा? राष्ट्रवादीशी आघाडी न करता अशोक चव्हाणांनी स्वबळावर कॉंग्रेसला बहुमत मिळवून दिले. आता जनतेने हा कौल दिला आहे की, कॉंग्रेसच्या मंडळींनी काही ‘आदर्श’ युक्त्या वापरून हा कौल मिळविला आहे, याच्या खोलात शिरण्यामध्ये काही हशील नाही. कारण तुमच्या या लोकशाहीत जनमताचा कौल म्हटल्यावर त्याचा आदर हा करावाच लागतो. संपूर्ण प्रचारात नांदेड महापालिकेची निवडणूक ही
‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’ अशी असल्याचा उल्लेख वारंवार झाला ते खरेच होते. मतदारांना पैसे वाटून, आमिषे, प्रलोभने दाखवून निवडणुका जिंकण्याचे तंत्र आता रूढच होऊ लागले आहे. नांदेडातही तेच झाले. कॉंग्रेजी उमेदवारांसाठी थेट पैसे वाटताना पोलिसांनीच अनेकांना रंगेहाथ पकडले. एकंदर ८ ठिकाणी पोलिसांनी अशी कारवाई केली आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या २० कार्यकर्त्यांना अटकही झाली. लोकशाहीच्या बाजारातील मतांची ही खरेदी-विक्री आणि जनमताचा कौल याची सांगड घालायची तरी कशी? महापालिकेच्या निवडणुकीचे विश्‍लेषण आणखी आठवडाभर होत राहील, पण या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक आणि धोकादायक बाब आहे ती म्हणजे ‘एआयएमआयएम’ या कट्टरपंथी मुस्लिम संघटनेचा उदय! ‘ऑल इंडिया मुस्लिम इत्तेहादुल मुसलमीन’ या हैदराबाद आणि आंध्र प्रदेशात सक्रिय असलेल्या रझाकारी संघटनेचा या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात चंचूप्रवेश झाला आहे. ‘इत्तेहादुल’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मवेड्या मुस्लिमांना एकत्र आणून त्यांची राजकीय ताकद उभारण्याचा चंगच बांधला आहे. आंध्र विधानसभेच्या ८ जागा त्यांनी लढवल्या. त्यापैकी ७ आमदार निवडून आणले. हैदराबाद महापालिकेतही १५० पैकी ४३ नगरसेवक एकट्या ‘इत्तेहादुल’चे आहेत. आता नांदेडातही या पक्षाने तब्बल ११ जागा जिंकल्या आहेत. नांदेडमध्ये मुस्लिमांची संख्या २५ टक्क्यांच्या आसपास आहे. निवडून आलेल्या ८१ पैकी २४ नगरसेवक मुस्लिम आहेत. मुस्लिमांची वाढती लोकसंख्या आणि त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा दर्शवण्यासाठी हे आकडे पुरेसे बोलके आहेत. धर्माच्या नावाखाली
मुस्लिमांची भक्कम ‘एकजूट’
होत असताना हिंदू मतदार मात्र जाती-पातींच्या राजकारणातच मश्गूल आहे. पुन: पुन्हा कॉंग्रेसचा पदर हातात घेऊन तो आपल्याच हाताने पायावर कुर्‍हाड मारून घेतो. या देशातील हिंदू जातींच्या विळख्यातून बाहेर पडून ‘हिंदू’ म्हणून जोवर एकत्र येणार नाही तोपर्यंत हे असेच चालत राहणार!
नांदेड महापालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर अशोक चव्हाणांचा ‘जल्लोष’ सुरू आहे. जणूकाही ‘आदर्श’ घोटाळ्यातूनच ‘निर्दोष’ सुटका झाली, अशा थाटात चॅनल्सवर त्यांच्या मुलाखती झळकत आहेत. विकासाच्या मुद्यावर कॉंग्रेसने निवडणूक जिंकली, अशा बढाया अशोकराव आणि त्यांची कॉंग्रेस मारत असली तरी ‘जेएनयूआरएम’ आणि गुरूदा गद्दीच्या सोहळ्यासाठी केंद्राकडून आलेले १६०० कोटी आणि महाराष्ट्र सरकारचे १०० कोटी अशा एकूण १७०० कोटींच्या निधीची नांदेड महापालिकेतील कॉंग्रेसच्या राज्यकर्त्यांनी कशी ‘वाट’ लावली हे नांदेडमध्ये पाय ठेवल्याबरोबर लक्षात येते. एवढ्या प्रचंड निधीचा वापर नीट केला असता तर आज नांदेड ‘बकाल’ दिसले नसते. त्यामुळेच विकासाच्या या बाजारगप्पांना तसा काही अर्थ नाही. सरकारी निधी आणि त्याच्या कंत्राटातून विकास झाला तो फक्त कॉंग्रेसवाल्यांचा. तसे नसते तर कॉंग्रेसच्या या ‘विकास पुरुषा’ला ‘आदर्श घोटाळ्या’त घरी जावेच लागले नसते. ‘आदर्श’ प्रकरणात कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी अशोक चव्हाणांना कोणताही दिलासा न देता त्यांची खुर्ची काढून घेतली. नांदेडच्या जनतेने मात्र महापालिकेची सत्ता पुन्हा कॉंग्रेसच्या हाती सोपवून अशोकरावांना ‘आदर्श’ दिलासाच दिला, असेच आता म्हणायला हवे!


No comments:

Post a Comment