कॅप्टन थॉमस
कधीही करू शकतो जीवनाची नवी सुरुवात- एन. रघुरमन
थॉमस यांना नेहमी वाटत होते की, पूर्ण नावाऐवजी सर्वांनी त्यांना केवळ थॉमस म्हणून हाक मारावी. थॉमस या नावानेच भविष्यात आपली ओळख निर्माण करणार असल्याचेही ते शालेय जीवनात मित्रांना सांगायचे. त्यांनी अथक पर्शिम केले व पाच वर्षांच्या संघर्षानंतर सैन्यदलात सामील झाले. त्यानंतर ते कॅप्टन थॉमस झाले. इतर तरुणांप्रमाणे थॉमसही स्वत:साठी एक उत्तम जीवनसाथी शोधत होते. त्यांच्या वडिलांचीही मनोमन हीच इच्छा होती की, आपल्या मुलाने स्वत: भावी जोडीदार निवडावा. थॉमस यांचा सीमेवर अनेकदा दुश्मनांशी सामना व्हायचा. परंतु त्यांच्या वडिलांना याची थोडीही काळजी नव्हती. कारण, त्यांच्या पिढय़ान्पिढय़ांनी देशासाठी सेवा केलेली होती. त्यांच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य रणभूमीवर शहीद झाला नाही. मात्र, कॅप्टन थॉमसच्या बाबतीत असे घडले नाही. ते एकदा सुरुंगांचे प्रात्यक्षिक घेत होते. त्याचवेळी तेथे मोठा स्फोट झाला आणि त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. कॅप्टन थॉमस यांना विशेष उपचार मिळावेत यासाठी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत हवाईमार्गे पुण्यातील विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्टिफिशियल लिंब सेंटर (एएलसी) हे असेच एक विशिष्ट रुग्णालय आहे. या ठिकाणी युद्धात किंवा प्रशिक्षणात जखमी झालेल्या व हात-पाय गमावलेल्या धाडसी सैनिकांना कृत्रिम अंग, उपकरण आणि पुनर्वास सुविधा उपलब्ध करण्यात येते. थॉमस यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे ते पूर्णपणे खचून गेले होते. आपले लग्न कधी होणार व संसार कसा करायचा याची काळजी त्यांना वाटत होती. नर्सिंग ऑफिसर लेफ्टनंट मेरी ही एएलसीची इंचार्ज होती. ती अनेक रुग्णांना कधी प्रेमाने तर कधी कडक शब्दांत बोलून सांभाळायची. युद्धादरम्यान आपले अवयव गमावणार्या 99 टक्के रुग्ण एएलसीमधून गर्वाने आणि आत्मविश्वासाने तेथून जात असे. कृत्रिम अवयवासोबतही आनंदी जीवन जगता येते ही बाब मेरीने चार महिने थॉमस यांना समजावल्यानंतर ती गोष्ट त्यांना समजली. सहा महिन्यांनंतर ते कृत्रिम पायांवर उभे राहू लागले आणि तीन महिने झाल्यानंतर ते हळूहळू चालू लागले. तोपर्यंत दोघांनाही कळाले नाही की, ते एकमेकांवर प्रेम करू लागले होते. ते नेहमी रुग्णालयाच्या परिसरात एक-दुसर्यासोबत हसत-खेळत राहत असत. परंतु कोणीही त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत नव्हते. कारण, सर्वांना माहिती होते की, मेरी रुग्णाची खूप काळजी घेते. शेवटी कॅप्टन थॉमस यांचा डिस्चार्ज होण्याचा दिवस उजाडला. थॉमस तेथून जात असताना मेरीच्या डोळ्यांतून अर्शू येत होते. मेरी जवळपास एक आठवड्यापर्यंत निराश आणि गुमसुम राहत होती. बरोबर एक आठवड्यानंतर कॅप्टन थॉमस त्यांच्या फियाट कारने एएलसीमध्ये आले. कारवर एक बॅनर होता व त्यावर लिहिले होते, ‘मेरी, विल यू मॅरी मी ? युवर थॉमस.’ त्यानंतर जे झाले तो इतिहास आहे. आता 2012 मध्ये ब्रिगेडियर थॉमस आणि कर्नल मेरी सेवानिवृत्त झाले आहेत. त्या दोघांना सायंकाळच्या वेळी पुण्यातील साळुंके विहार कॉलनीत एकमेकांसोबत फेरफटका मारताना आपण पाहू शकतो.कधीही करू शकतो जीवनाची नवी सुरुवात- एन. रघुरमन
फंडा काय आहे?
शरीराचा कुठलाही अवयव गमावल्यानंतर जीवन समाप्त होत नाही. जीवनाची एक नवी सुरुवात आपण करू शकतो. परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर विद्यार्थी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतात ? याचा विचार केला तर मी स्तब्ध होऊन जातो
No comments:
Post a Comment